10 August 2020

News Flash

Parbhani सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार

परभणी हा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. १९८९ पासून २०१४ पर्यंत फक्त १९९८चा अपवाद वगळता सात वेळा या मतदारसंघातून शिवसेनेचा खासदार निवडून आला आहे. परभणी मतदारसंघ आणि शिवसेना हे समीकरण तयार झाले. शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी या मतदारसंघातून निवडून येणारे खासदार पुढील निवडणुकीत शिवसेनेत राहात नाहीत. अशोक देशमुख, सुरेश जाधव, तुकाराम रेंगे, गणेश दुधगावकर अशी ही मोठी मालिका आहे. अगदी गेल्या वेळी गणेश दुधगावकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. या तुलनेत सुरेश जाधव हे विद्यमान खासदार मात्र शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले आहेत. निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली की जालना जिल्ह्य़ातील काही नावे या लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी चर्चेला येतात. त्या अनुषंगाने भाजपचे उमेदवार म्हणून पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांचीही चर्चा सुरू झाली आहे. गेल्या वर्षी लोणीकरांनी सगळी प्रशासकीय यंत्रणा वापरून ‘समाधान शिबीर’ घेतले. जिल्ह्य़ाच्या विकासासाठी भाजपने कोटय़वधी रुपयांचा निधी आणला हे या वेळी सांगितले गेले. प्रत्यक्षात त्या वेळी भूमिपूजन झालेली रस्त्यांची अनेक कामे अजून सुरूच व्हायची आहेत. स्वतंत्रपणे लोकसभा लढविण्याची भाजपची तयारी अनेकदा पक्षाचे नेतेही बोलून दाखवितात.मात्र भाजपचे कार्यकर्त्यांची यंत्रणा तितकी सक्षम नाही. जि.प. सदस्य मेघना बोर्डीकर, राजश्री जामगे याही भाजपच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा संघर्ष राष्ट्रवादीशी आहे. मागील निवडणुकीत विजय भांबळे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी होती. भांबळे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी जिंतूर विधानसभा मतदारसंघापुरतेच आपले लक्ष केंद्रित केले. सध्या आमदार असलेले भांबळे या वेळी लोकसभेसाठी इच्छुक नाहीत, तसे त्यांनी पक्षनेतृत्वाला सांगितले आहे. गेल्याच आठवडय़ात मुंबईत पक्षनेतृत्वाने घेतलेल्या बैठकीत उमेदवारीच्या अनुषंगाने जी नावे चर्चिली गेली त्यात जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांचे नाव अग्रभागी आहे. लोकसभेच्या अनुषंगाने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांनीही नुकतीच बैठक घेतली. माजी खासदार तुकाराम रेंगे यांच्यासह काही नावे उमेदवारीसाठी पक्षीय पातळीवर असली तरीही आघाडीच्या वाटपात हा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कोटय़ात आहे. जर वरिष्ठ पातळीवर नेतृत्वानेच अदलाबदल केली तरच हा मतदारसंघ काँग्रेसकडे येईल अन्यथा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असाच जुना संघर्ष या निवडणुकीत पाहायला मिळेल. परभणी लोकसभा मतदारसंघात ‘ओबीसी’ मतदारांची संख्या निर्णायक आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या मराठा उमेदवारांच्या मतविभागणीत ‘ओबीसी’ मतदारांचे ध्रुवीकरण करण्याच्या हालचालींनाही प्रारंभ झाला आहे.

parbhani Lok Sabha Election 2019 Result

Name
Party
Status
Jadhav Sanjay (bandu) Haribhau
SS
WON
*The election result data is provided by C-Voter on a real time basis and is not altered or moderated by loksatta.com in any way.

Parbhani 2019 Candidate List

Candidate Name
Party
Criminal Cases
Education
Age
Assets / Laibilities (Rs.)
Alamgir Mohammad Khan
Vanchit Bahujan Aaghadi
1
Graduate
38
1.94 Cr / 0
Bobade Sakharam Gyanba
IND
0
Graduate
43
10.97 Lac / 0
Dr.Appasaheb Onkar Kadam
Swatantra Bharat Paksha
0
Graduate Professional
54
1.68 Cr / 6.45 Lac
Dr.Vaijnath Sitaram Phad
BSP
1
Doctorate
62
12.81 Cr / 30.27 Lac
Govind Ramrao Deshmukh
IND
1
8th Pass
37
12.43 Lac / 0
Harishchandra Dattu Patil
Sangharsh Sena
0
Graduate
59
51.88 Lac / 10 Lac
Jadhav Sanjay (Bandu) Haribhau
SHS
6
10th Pass
52
4.1 Cr / 45.2 Lac
Kishor Baburao Munnemanik
IND
0
12th Pass
35
2.21 Lac / 2.2 Lac
Kishor Namdeo Gaware
Bharatiya Praja Surajya Paksha
0
12th Pass
27
1.38 Lac / 0
Rajan Ramchandra Kshirsagar
CPI
15
Graduate
52
58.54 Lac / 9.9 Lac
Rajesh Uttamrao Vitekar
NCP
0
Graduate
39
5.26 Cr / 46.79 Lac
Sangita Kalyanrao Nirmal
IND
0
Literate
42
5.92 Lac / 29 Thousand
Santosh Govind Rathod
Bhartiya Bahujan Kranti Dal
0
Graduate
35
16.07 Lac / 50 Thousand
Shaikh Salim Shaikh Ibrahim
Bahujan Maha Party
0
5th Pass
45
50 Thousand / 0
Subhash Ashokrao Ambhore (Dudhgaonkar)
ANC
0
Others
31
50 Thousand / 0
Uttamrao Pandurangrao Rathod
BMUP
0
Graduate Professional
66
95.89 Lac / 0
Yashwant Rambhau Kasbe
Bahujan Republican Socialist Party
0
Post Graduate
51
14.05 Lac / 3 Lac

Parbhani सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल

* Bye Election Result
Year
Winner
Party
Vote%
1999
Jadhav Suresh Ramrao
SHS
38.39%
2004
Tukaram Ganpatrao Renge Patil
SHS
50.2%
2009
Adv. Dudhgaonkar Ganeshrao Nagorao
SHS
44.26%
2014
Jadhav Sanjay (bandu) Haribhau
SHS
49.77%
2019
Jadhav Sanjay (bandu) Haribhau
SHS
43.02%

Parbhani मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

Constituency Siting MLA Party
JINTURBhamale Vijay ManikraoNCP
PARBHANIDr.rahul Vedprakash PatilSHS
GANGAKHEDMadhusudan Manikrao KendreNCP
PATHRIFad Mohan MadhavraoIND
PARTURBabanrao Dattatray Yadav LonikarBJP
GHANSAWANGIRajeshbhaiyya TopeNCP

सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी

Just Now!
X