PM Narendra Modi Oath Ceremony Live Updates, 9 June 2024 : नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवन येथे झालेल्या कार्यक्रमाला देश आणि जगभरातून ८००० निमंत्रित उपस्थित आहेत. ७ वाजून १५ मिनिटांनी मोदींसह प्रमुख सहकाऱ्यांचाही शपथविधी संपन्न होत आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९५२, १९५७ आणि १९६२ अशा तीन निवडणुकांमध्ये बहुमत गाठून सलग तीनदा पंतप्रधानपद भुषविले होते. त्यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे व्यक्ती ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, जेपी नड्डा, शिवराज सिंह चौहान, निर्मला सीतारमन यांनीही आज कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

Live Updates

Narendra Modi Swearing-in Ceremony Delhi Rashtrapati Bhavan | नरेंद्र मोदी आज राष्ट्रपती भवन येथे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत

21:12 (IST) 9 Jun 2024
PM Narendra Modi Oath Taking Ceremony Live Updates: नरेंद्र मोदींचा शपथविधी; कोल्हापुरात आनंदोत्सव

कोल्हापूर : नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळाचे थेट प्रेक्षपण भाजपा कार्यालय, नागाळा पार्क याठिकाणी करण्यात आले. याच ठिकाणी लाडू, साखर पेढे वाटून आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आज सायंकाळी भाजपा कार्यालय, नागाळा पार्क येथे कार्यकर्ते जमले होते. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ दिल्ली या ठिकाणी घेतली. हा कार्यक्रम भाजपा जिल्हा कार्यालयात सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नेते मंडळींनी एकत्रित बसून पाहिला. भाजपा जिल्हा कार्यालयामध्ये याप्रसंगी मोठी स्क्रीन लावण्यात आली होती. मोदी यांची शपथ पूर्ण होतात भाजपाच्या विजयाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी लाडू एकमेकांना भरवून त्याचबरोबर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

20:58 (IST) 9 Jun 2024
Narendra Modi Oath Taking Ceremony Live Updates: एकही खासदार, आमदार नाही; तरीही आठवलेंना सलग तिसऱ्यांदा राज्यमंत्रीपद

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी तिसऱ्यांदा राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आठवले गटाचा एकही खासदार किंवा आमदार नसतानाही तिसऱ्यांदा त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली आहे.

20:41 (IST) 9 Jun 2024
PM Narendra Modi Oath Taking Ceremony Rashtrapati Bhavan : शिवसेना शिंदे गटाची बोळवण? प्रतापरावज जाधव यांना राज्यमंत्री पद

शिवसेना शिंदे गटाचे बुलढाणा लोकसभेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती भवनात त्यांनी हिंदीतून शपथ घेतली.

20:31 (IST) 9 Jun 2024
PM Narendra Modi Oath Taking Ceremony Rashtrapati Bhavan : रामविलास पासवान यांचे सुपुत्र चिराग पासवान यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

बिहारमधील लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे नेते आणि रामविलास पासवान यांचे सुपुत्र चिराग पासवान यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

20:28 (IST) 9 Jun 2024
“मैं नरेंद्र दामोदरदास मोदी…”, मोदींनी पंतप्रधानपदासाठी घेतलेली शपथ नेमकी काय आहे? वाचा काय म्हटलंय शपथेमध्ये!

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेताना?

वाचा सविस्तर

20:14 (IST) 9 Jun 2024
PM Narendra Modi Oath Taking Ceremony Rashtrapati Bhavan : केवळ एक खासदार असलेल्या जीतन राम मांझी यांना कॅबिनेट मंत्रीपद

राष्ट्रवादी काँग्रेसला ठेंगा पण केवळ एक खासदार असलेल्या हिंदुस्तानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) च्या जीतन राम मांझी यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे.

19:54 (IST) 9 Jun 2024
PM Narendra Modi Oath Taking Ceremony Live Updates : प्रज्ज्वल रेवण्णाचे काका, JDSच्या एचडी कुमारस्वामींना कॅबिनेट मंत्रीपद

केवळ दोन खासदार असलेल्या जेडीएसच्या एचडी कुमारस्वामी यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे. कुमारस्वामी हे सेक्स टेप प्रकरणात अटकेत असलेल्या प्रज्ज्वल रेवण्णाचे सख्खे काका आहेत.

19:46 (IST) 9 Jun 2024
PM Narendra Modi Oath Taking Ceremony Live Updates : शिवराज सिंह चौहान यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

19:38 (IST) 9 Jun 2024
PM Narendra Modi Oath Taking Ceremony Live Updates : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

19:35 (IST) 9 Jun 2024
PM Narendra Modi Oath Taking Ceremony Live Updates : नितीन गडकरी यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ

भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

19:34 (IST) 9 Jun 2024
PM Narendra Modi Oath Taking Ceremony Live Updates : मोदींचे जवळचे सहकारी अमित शाह यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ

मोदींचे जवळचे सहकारी अमित शाह यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

https://twittercom/ANI/status/1799804311859499251

19:31 (IST) 9 Jun 2024
PM Narendra Modi Oath Taking Ceremony Live Updates : राजनाथ सिंह यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ

माजी संरक्षण मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

19:26 (IST) 9 Jun 2024
Narendra Modi Swearing-in Ceremony Updates : नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी उपस्थितांनी मोदी, मोदी असा जयघोष केला.

19:05 (IST) 9 Jun 2024
Narendra Modi Swearing-in Ceremony Updates : नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी मुकेश अंबानी, शाहरुख खान यांची हजेरी

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी उद्योगपती मुकेश अंबानी, अभिनेते शाहरुख खान यांनी राष्ट्रपती भवनात हजेरी लावली आहे.

18:17 (IST) 9 Jun 2024
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ; थोड्याच वेळात शपथविधी सोहळ्याला सुरुवात

नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असून थोड्याच वेळात शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही ‘लोकसत्ता’च्या युट्यूब चॅनेलवर बघू शकता.

शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण बघण्यासाठी इथे क्लिक करा..

18:09 (IST) 9 Jun 2024
नरेंद्र मोदींच्या संभाव्य मंत्रीमंडळाची पहिली यादी समोर; ‘हे’ नेते घेणार मंत्रीपदाची शपथ

नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असून राष्ट्रपती भवनात थोड्याच वेळात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, मोदींच्या मंत्रीमंडळात कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळाची पहिली संभाव्य यादी समोर आली आहे. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

वाचा संपूर्ण यादी

17:16 (IST) 9 Jun 2024
नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात स्थान मिळाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आज ३० वर्षांनंतर…”

PM Narendra Modi Oath Taking Ceremony Updates : नरेंद्र मोदी हे आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या मंत्रीमंडळात महाराष्ट्रातील पाच खासदारांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये पहिल्यांच पुण्याचे खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांचाही समावेश आहे. त्यांना मिळालेल्या संधीनंतर पुण्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येतो आहे. दरम्यान, मंत्रीपद मिळाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सविस्तर वाचा

16:29 (IST) 9 Jun 2024
Narendra Modi Swearing-in Ceremony Updates : नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात वर्णी लागलेल्या खासदारांचे फडणवीसांकडून अभिनंदन; म्हणाले…

नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पियुष गोयल, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव आणि रिपाईचे रामदास आठवले यांना संधी मिळाली आहे. देवेंद्र फडणवीसांनी या खासदारांचे अभिनंदन केलं आहे.

सविस्तर वाचा..

16:24 (IST) 9 Jun 2024
Narendra Modi Swearing-in Ceremony Updates : नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात जीतन राम मांझी यांची वर्णी

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात बिहारचे माझी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांना संधी देण्यात आहे. ते एनडीएचा घटकपक्ष असलेल्या हिंदुस्थान आवाम मोर्चाचे प्रमुख आहे. ते आज नरेंद्र मोदी यांच्याबरोबर मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती हिंदुस्थान आवाम मोर्चाचे प्रवक्ते दानिश रिझवान यांनी दिली.

16:05 (IST) 9 Jun 2024
नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात अजित पवार गटाला स्थान नाही; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण; म्हणाले “आम्ही…”

PM Narendra Modi Oath Ceremony Updates, 9 June 2024: नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून आज त्यांच्या मंत्रीमंडळात भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला स्थान मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. आज दिल्लीतील महाराष्ट्र सदनात भाजपाच्या खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

सविस्तर वाचा

15:18 (IST) 9 Jun 2024
Narendra Modi Swearing-in Ceremony Updates : पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपद; देवेंद्र फडणवीसांची माहिती

पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ हे आज मंत्रीपदाची शपध घेणार आहेत. यासंदर्भातील माहिती देवेंद्र फडणवीसांची यांनी दिली आहे. आज दिल्लीतील महाराष्ट्र सदनात भाजपाच्या खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

15:10 (IST) 9 Jun 2024
Narendra Modi Swearing-in Ceremony Updates : नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे दिल्लीत दाखल

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे दिल्ली दाखल झाले आहेत.

15:03 (IST) 9 Jun 2024
Narendra Modi Swearing-in Ceremony Updates : नरेंद्र मोदींच्या शपथविधीपूर्वीच ममता बॅनर्जींचा मोठा दावा; चंद्राबाबू अन् नितीश कुमारांचं नाव घेत म्हणाल्या, “उद्या…”

लोकसभा निवडणुकीत एनडीए सरकारला बहुमत मिळाले. परंतु, इंडिया आघाडीकडूनही सत्तास्थापनेसाठी प्रयत्न सुरू होते. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली तरीही इंडिया आघाडी सत्तास्थापन करू शकते, असा सूचक इशारा इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांनी दिला होता. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनीही असाच सूर लावला आहे. तसंच, नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी जाणार नसल्याचंही त्यांनी आज स्पष्ट केलं. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

सविस्तर वृत्त वाचा

15:02 (IST) 9 Jun 2024
: नरेंद्र मोदींच्या शपथविधीपूर्वीच ममता बॅनर्जींचा मोठा दावा; चंद्राबाबू अन् नितीश कुमारांचं नाव घेत म्हणाल्या, “उद्या…”

लोकसभा निवडणुकीत एनडीए सरकारला बहुमत मिळाले. परंतु, इंडिया आघाडीकडूनही सत्तास्थापनेसाठी प्रयत्न सुरू होते. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली तरीही इंडिया आघाडी सत्तास्थापन करू शकते, असा सूचक इशारा इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांनी दिला होता. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनीही असाच सूर लावला आहे. तसंच, नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी जाणार नसल्याचंही त्यांनी आज स्पष्ट केलं.

सविस्तर वृत्त वाचा

14:31 (IST) 9 Jun 2024
Narendra Modi Swearing-in Ceremony Updates : नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया; म्हणाले..

नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी संभाव्य मंत्र्यांची बैठक पार पडली असून या बैठकीनंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. आज नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. यावेळी मला जे काही मंत्रिपद दिले जाईल त्याचा मला आनंद आहे, असे ते म्हणाले. तसेच आजच्या बैठकीला एनडीएचे ६० नेते उपस्थित होते, अशी माहितीही त्यांनी दिली.

13:53 (IST) 9 Jun 2024
PM Narendra Modi Oath Taking Ceremony Live Updates : मोदींच्या निवासस्थानी संभाव्य मंत्र्यांची बैठक सुरू, व्हिडीओ आला समोर

नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी संभाव्य मंत्र्यांची बैठक सुरू झाली असून नरेंद्र मोदी बैठकीला संबोधित करत आहेत. या बैठकीला उपस्थित असलेल्या खासदारांना आज शपथ दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

13:23 (IST) 9 Jun 2024
Narendra Modi Swearing-in Ceremony Updates: अजित पवार गटाला एकही मंत्रीपद नाही? देवेंद्र फडणवीस सुनील तटकरेंच्या घरी; दिल्लीत घडामोडींना वेग!

PM Narendra Modi Oath Taking Ceremony Updates: अजित पवार गटाला पहिल्या शपथविधीमध्ये एकही मंत्रीपद मिळणार नसल्याचं सांगितलं जात आहे.

वाचा सविस्तर

13:16 (IST) 9 Jun 2024
सुनेला मंत्रिपदाची संधी मिळाल्यावर सासऱ्यांचे डोळे पाणावले; रक्षा खडसेंना आमंत्रण आल्यावर एकनाथ खडसे म्हणाले…

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार रक्षा खडसे यांना मंत्रिपदात स्थान मिळणार आहे. मंत्रिपदाची शपथ घेण्याकरता भाजपा पक्षनेतृत्त्वाकडून रक्षा खडसे यांना आज फोन आला होता. त्यानुसार, त्या आज शपथविधीसाठी दिल्लीला जाणार आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे सासरे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेही दिल्लीत दाखल होणार आहेत. दरम्यान, सूनेला मंत्रीपदाची संधी मिळाल्यानंतर वडिलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. दाटलेल्या कंठातून त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

सविस्तर वाचा

13:05 (IST) 9 Jun 2024
PM Narendra Modi Oath Taking Ceremony Live Updates : मल्लिकार्जुन खरगे मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण प्राप्त झाल्यानंतर काँग्रेसकडून माहिती देण्यात आली आहे.

12:45 (IST) 9 Jun 2024
Narendra Modi Swearing-in Ceremony Updates : नरेंद्र मोदी यांच्या निवास्थानी पोहोचलेल्या संभाव्य मंत्र्यांची संपूर्ण यादी

नरेंद्र मोदी यांच्या निवास्थानी पोहोचलेल्या खासदारांची संपूर्ण यादी

संभाव्य मंत्रिपदासाठी ज्या ज्या खासदारांना नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बोलाविण्यात आले आहे. त्यांची यादी खालीलप्रमाणे.

भाजपाचे खासदार

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान (ओडिशा)

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी (धारवाड, कर्नाटक)

बंदी संजय कुमार (करीमनगर, तेलंगणा)

हर्ष मल्होत्रा (पूर्व दिल्ली)

श्रीपाद नाईक (उत्तर गोवा)

अजय टम्टा (उत्तराखंड)

अर्जुन राम मेघवाल (राजस्थान)

सुरेश गोपी (केरळ)

माजी मंत्री हरदीप सिंग पुरी

रवनीत सिंग बिट्टू (पंजाब)

नितीन गडकरी (महाराष्ट्र)

पियुष गोयल (महाराष्ट्र)

रक्षा खडसे (महाराष्ट्र)

रामदास आठवले (महाराष्ट्र)

एनडीए मधील घटक पक्ष

एचडी कुमारस्वामी (जेडीएस, कर्नाटक)

रामनाथ ठाकूर (जेडीयू, बिहार)

राम मोहन नायडू (टीडीपी, आंध्र प्रदेश)

चंद्र शेखर पेम्मसनी (टीडीपी, आंध्र प्रदेश)

जीतन राम मांझी (हिंअमो, बिहार)

प्रतापराव जाधव (शिवसेना शिंदे गट, महाराष्ट्र)

चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांना काय मिळणार? (फोटो – ANI)

चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांना काय मिळणार? (फोटो – ANI)[/caption]