अमरावती लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे. त्यामुळे आज (दि. २४ एप्रिल) प्रचाराचा शेवटचा दिवस असून सर्वच पक्षांच्या वतीने जोर लावला जात आहे. आज अमरावती येथे भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा संपन्न झाली. मात्र बच्चू कडू यांनी आरक्षित केलेल्या मैदानावर सदर सभा होत असल्यामुळे कालपासून अमरावतीमध्ये तणावाचे वातावरण होते. बच्चू कडू यांनी काल पोलिसांसमोर ठिय्या मारून जोरदार आंदोलन केले. तसेच आज एक लाख लोकांना घेऊन अमित शाह यांची सभा होत असलेल्या मैदानावर धडकणार असल्याची घोषणा केली. पण प्रत्यक्षात दोन्ही सभा वेगवेगळ्या ठिकाणी संपन्न झाल्या. यावेळी बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्यावर हल्लाबोल केला.

बच्चू कडू यावेळी म्हणाले की, रवी राणा यांनी सभेचं मैदान बदललं असलं तरी निवडणुकीचं मैदान आम्ही मारल्याशिवाय राहणार नाही. मैदान कोणतंही असलं तरी रवी राणा यांना हरविल्याशिवाय राहणार नाही. आम्ही परवानगी घेऊन आरक्षित केलेले मैदान हिसकावून घेतल्यानंतर आम्ही आक्रमक व्हावं, अशी त्यांची इच्छा होती. आक्रमक झाल्यानंतर आमच्या हातून काहीतरी चूक व्हावी, म्हणजे मला आणि उमेदवार दिनेश बुब यांना तुरुंगात टाकणे सोपे होईल, असे त्यांची योजना होती. पण ही योजना तुमच्या-आमच्या समजंसपणामुळे फोल ठरली.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Nitin Gadkari Faints during Speech at Yavatmal Lok Sabha Election 2024
Show Must Go On : नितीन गडकरींना भरसभेत भोवळ, औषधोपचारानंतर पुन्हा भाषणाला सुरुवात!
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
Bachhu Kadu amravati rally
अमरावतीमध्ये राडा; अमित शाह यांच्या सभेला बच्चू कडूंचा विरोध, पोलिसांसमोर ठिय्या
ajit pawar sharad pawar
विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांबरोबर एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, “साहेब जर आम्हाला…”
ajit pawar narendra modi
नरेंद्र मोदींच्या शरद पवारांवरील ‘अतृप्त आत्मा’ टीकेवर अजित पवार म्हणाले, “मी पुढच्या सभेत मोदींनाच…”
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
Kiran Mane on Ujjwal Nikam
“दोन पक्षांवर दरोडे पडले तेव्हा हा भामटा…”, किरण मानेंची उज्ज्वल निकम यांच्यावर टीकात्मक पोस्ट

“आम्ही जर अमित शाह यांच्या सभेची ठिकाणी आंदोलन सुरू ठेवले असते तर आमच्या सभेचा मंडप जाळून टाकण्याची तयारी करण्यात आली होती. इतक्या खालच्या पातळीवरचे राजकारण खेळण्याची तयारी सुरू केली होती. त्यामुळे मी माघार घेतली. राजकारणाचा हिशोब नंतरही पूर्ण करता येईल. पण आता निवडणूक झाल्यावर त्यांना पाहू. राणा यांनी दिनेश बुबची सभा रद्द नाही केली तर लोकशाहीचा खून केला. २३ आणि २४ एप्रिल रोजी प्रहार जनशक्ती पक्षाला मैदान दिले होते. २३ तारखेला सकाळी सीईओंनी रवी राणा यांचा मंडप काढून टाकण्याचे आदेश पोलिसांना दिले. पण त्याच सीईओंनी संध्याकाळी आमची सभा रद्द केली”, असा आरोप बच्चू कडू यांनी केला.

ही लढाई आता दिनेश बुब आणि बच्चू कडू यांच्यापुरती मर्यादीतनाही. एका बाजूला कायदा तोडणारे आणि दुसऱ्या बाजूला कायदा पाळणाऱ्यांची ही लढाई आहे, असेही बच्चू कडू म्हणाले.

अमरावतीमध्ये आज पब सुरू झाला आहे. जुगार आणि सट्टे सुरू आहेत. अमरावतीचे पोलीस आयुक्त स्वाभिमानी युवा पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत. आमच्या कष्टकरी जनतेच्या पैशांवर तुम्ही हात टाकत असाल तर निवडणुकीनंतर तुम्हाला सोडणार नाही, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला.

त्यांचा पैसा बाहेर येतोय यातच आम्हाला आनंद

तसेच बच्चू कडू पुढे म्हणाले की, आजचा आणि उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. मतदानाच्या आधी पैसा वाटला जाण्याची शक्यता आहे. मी निवडणुकीला उभा असताना माझ्या विरोधात उषाताई उभ्या होत्या. तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांनी “आजीचा बटवा खाली करा आणि बच्चू कडूला जिंकून आणा”, अशी घोषणा दिली होती. तसा मलाही आनंद होत आहे की, या निवडणुकीत राणांचा पैसा बाहेर येत आहे. हा पैसा सामान्य लोकांमध्ये चालला असल्यामुळे आम्ही जिंकलो आहोत. अनधिकृत मार्गाने कमावलेला पैसाही जात आहे आणि खासदारकीही जाईल.