Prakash Ambedkar Marathi Kunbi Candidates Assembly Election : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा कुणबी उमेदवारांना मत देऊ नका असं आवाहन जनतेला केलं होतं. यावरून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रकाश आंबेडकरांना पक्षाची भूमिका विचारल्यावर ते पत्रकारांवरच संतापल्याचं पाहायला मिळालं. तसेच ते म्हणाले, “या राजकारणातला मी बाप आहे”. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रकाश आंबेडकरांना विचारलं होतं की तुम्ही जनतेला मराठा कुणबी उमेदवारांना मत न देण्याचं आवाहन करत आहात, मग आगामी विधानसभा निवडणुकीत तुमचा पक्ष एकही मराठा कुणबी उमेदवार उभा करणार नाही का?” या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी प्रकाश आंबेडकर संतापल्याचं पाहायला मिळालं.

प्रकाश आंबेडकरांनी राज्यातील जनतेला मराठा कुणबी उमेदवारांना मत न देण्याचा आव्हान केलं असलं तरी त्यांच्या पक्षाची भूमिका मात्र ते स्पष्ट करू शकले नाहीत. वंचितचे प्रमुख म्हणाले होते, “येत्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी सर्वांनी आपल्या डोक्यात एक खूणगाठ बांधून घ्या की या निवडणुकीत केवळ ओबीसी उमेदवारांनाच मत देणार. ओबीसींना मत देत असताना कोणत्याही कुणबी मराठा उमेदवाराला मत देणार नाही. हे पक्कं ठरवा, कारण कुणबी मराठा उमेदवार हा दोन भूमिकांमध्ये असतो.”

हे ही वाचा >> Uddhav Thackeray : “काँग्रेसची हुजरेगिरी करूनही उद्धव ठाकरेंचे हात रिकामे”, भाजपाचा टोला; म्हणाले, “मराठा आरक्षणप्रश्नी दिल्लीत…”

वंचित बहुजन आघाडीची भूमिका विचारताच प्रकाश आंबेडकर संतापले

दरम्यान. प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला केलेल्या या आव्हानानंतर पत्रकारांनी प्रकाश आंबेडकरांना विचारलं की तुम्ही जनतेला सांगताय, मराठा कुणबी उमेदवारांना मत देऊ नका. असं असेल तर या विधानसभा निवडणुकीत तुमचा पक्ष एकही मराठा कुणबी उमेदवार उभा करणार नाही का? त्यावर प्रकाश आंबेडकर पत्रकाराला म्हणाले, “तुझे तेवढं वय नाही… तू तेवढी पत्रकारिता अजून केलेली नाहीस… इथे पैसे घेऊन प्रश्न विचारणारे लोक आहेत… असे प्रश्न तुम्ही इतरांना विचारा. मला नका विचारू. कारण मी या राजकारणातला बाप आहे हे लक्षात ठेवा.”

हे ही वाचा >> Prakash Ambedkar : “खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच”, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; उद्धव ठाकरेंबाबत म्हणाले…

दरम्यान, यावेळी प्रकाश आंबेडकरांना बांगलादेशमधील अराजकता व भारतातीत स्थितीबाबत प्रश्न विचारली. बांगलादेशात सध्या सुरु असलेल्या राजकीय ताणावावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “भारतीय जनता पार्टी ज्या ज्या वेळेस सरकारमध्ये आला आहे किंवा काँग्रेसचे सरकार असताना देखील आपण पाहिलं हे की, यांची परराष्ट्र धोरणं नेहमीच अपयशी ठरली आहेत.