Lok Sabha ELection Result 2024 : १८ व्या लोकसभेचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत इंडिया आघाडीने मोठी मुसंडी मारली आहे. एनडीएला बहुमत मिळालं असलं तरी इंडिया आघाडीने २३५ जागा जिंकून एनडीएसमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे. निवडणुकीचा प्रचार करताना ४०० पारचा नारा देणारी एनडीए ३०० जागाही जिंकू शकली नाही. मागील दोन्ही निवडणुकीत बहुमत मिळवणाऱ्या भाजपाचा वारू २४० जागांवर रोखण्यात इंडिया आघाडीला यश मिळालं आहे. तर काँग्रेसचे ९९ उमेदवार विजयी झाले आहेत. समाजवादी पार्टीने ३७, तृणमूल काँग्रेसने २९, द्रविड मुन्नेत्र कळघमने २२, तेलुगू देशम पार्टीने १६, संयुक्त जनता दलाने १२, शिवसेनेच्या ठाकरे गटाने ९, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने ८ जागा जिंकल्या आहेत.

दरम्यान, या निवडणुकीपूर्वी जाहीर झालेले जवळपास सर्वच एक्झिट पोल्स चुकीचे ठरले आहेत. सर्व एक्झिट पोल्समध्ये भाजपाला २८० ते ३५० जागा मिळतील, तसेच एनडीएला ३२० ते ३८० जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र हे सर्व पोल्स चुकीचे ठरले आहेत. दुसऱ्या बाजूला राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी वर्तवलेला अंदाजही चुकीचा ठरला आहे. भाजपा २०१९ पेक्षाही यंदा अधिक चांगल्या पद्धतीने बहुमत मिळवेल, असा अंदाज प्रशांत किशोर यांनी वर्तवला होता, जो चुकीचा ठरला आहे. कारण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ३०२ जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदा त्यांनी केवळ २४० जागा जिंकल्या आहेत.

Shocking video Stray Dog Suddenly Bites Man After He Pets It For A Minute, Dramatic Video
भयंकर! आधी प्रेमाने जवळ आला, व्यक्तीने हात लावताच थेट लचका तोडला; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कोणाची?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
sanjay roy kolkata doctor rape & murder accused
Kolkata Doctor Rape Case: मुख्य आरोपी संजय रॉयचा निर्दोष असल्याचा दावा; वकिलांना म्हणाला, “मी…”
history of women’s wrestling in India
Women’s Wrestling: रक्त, घाम आणि अश्रूंचा प्रवास! महिला कुस्तीपटूंची ३ दशकांची संघर्षगाथा
Eight people sat on the body of a huge crocodile, the thrill of the rescue team that caught the giant crocodile Video Viral
आधी दोरखंडाने महकाय मगरीचा जबडा बाधंला मग ८ जणांनी मिळून केलं असं काही की…; रेस्क्यूचा थरारक VIDEO पाहून झोप उडेल
bigg boss marathi abhijeet upset with nikki
निक्कीबद्दल अभिजीतने घेतला मोठा निर्णय! सूरज-अरबाजसह सर्वांनी ठोकला सॅल्यूट; ‘पाताळ लोक’ टास्कमध्ये काय घडणार?
Amitabh bachchan
“बिग बीच्या दाढीला हात लावायचाय…”, स्पर्धकाची इच्छा ऐकताच अमिताभ बच्चन म्हणाले, “माझ्यापेक्षा…”
tula shikvin changlach dhada charulata take a stand for akshara
Video : “घरात पाळणा हलूदे..”, अक्षराला मातृत्वावरून प्रश्न विचारणाऱ्या बायकांना चारुलताचं स्पष्ट उत्तर; पाहा मालिकेचा नवीन प्रोमो…

राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी वर्तवलेला अंदाज मात्र काही प्रमाणात बरोबर ठरला आहे. यादव म्हणाले होते की, भाजपाला जवळपास ७० जागांचा फटका बसू शकतो. त्यामुळे भाजपाच्या जागा या लोकसभा निवडणुकीत ३०३ वरून २३३ वर येण्याची शक्यता आहे. तसेच भाजपाच्या एनडीएतील मित्रपक्षांना ३५ जागा मिळतील. त्यामुळे एनडीएचं या निवडणुकीतील संख्याबळ २६८ ते २७० पर्यंत जाईल. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीत भाजपाप्रणित एनडीएला तब्बल २० जागांचा फटका बसू शकतो, असा अंदाज योगेंद्र यादव यांनी वर्तवला होता. महाराष्ट्रात एनडीएला २५ जागांचा फटका बसला आहे.

हे ही वाचा >> “इथे मस्ती उतरवून मिळेल”, मविआच्या लोकसभेतील यशानंतर रोहित पवारांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

रिपब्लिक भारत-मैट्रीजचा सर्वे

एनडीए – ३५३ ते ३६८ जागा
इंडिया आघाडी – ११८ ते १३३ जागा
इतर- ४३ ते ४८ जागा

रिपब्लिक PMARQ चा अंदाज
एनडीए – ३५९ जागा
इंडिया आघाडी – १५४ जागा
इतर- ३० जागा

जन की बातच्या एक्झिट पोलचा अंदाज
एनडीए- ३६२ ते ३९२ जागा
इंडिया आघाडी- १४१ ते १६१ जागा
इतर- १० ते २० जागा

इंडिया न्यूज डी डायनामिक्सचा अंदाज
एनडीए -३७१ जागा
इंडिया आघाडी- १२५ जागा
इतर – ४७ जागा

एबीपी सी व्होटर्सच्या सर्व्हेचा अंदाज
एनडीए-३५३ ते ३८३ जागा
इंडिया आघाडी- १५२ ते १८२ जागा
इतर – ४ ते १२ जागा

चाणक्यचा सर्व्हे
एनडीए ४०० ते ४१५ जागा
इंडिया आघाडी- १०७ ते १११ जागा
इतर ३६ जागा