scorecardresearch

पंजाबमध्ये राजकीय गुंतागुंत; काँग्रेसच्या महिला खासदार करतायत भाजपाचा प्रचार!

पंजाबध्ये राजकीय घडामोडींना प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात वेग आला असून सर्वच पक्षांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कंबर कसली आहे.

congress mp preneet kaur punjab election amrinder singh
काँग्रेस खासदार परनीत कौर भाजपा उमेदवाराच्या प्रचाराला!

देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू असून उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यासाठी १० फेब्रुवारी रोजी मतदान झालं आहे. पंजाबमध्ये येत्या २० फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. विशेषत: इथे सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपा यांच्यामध्ये थेट सामना होत असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कॅप्टन अमरिंद सिंग यांनी अवघ्या काही महिन्यांपूर्वी टाकलेल्या राजीनाम्याच्या गुगलीमुळे पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. त्यामुळे पंजाबमधील निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना आता पंजाबमध्ये एक अजब प्रकार दिसू लागला आहे.

काँग्रेसच्या महिला खासदार भाजपा उमेदवाराच्या प्रचाराला!

पंजाबमध्ये सध्या काँग्रेसच्या एक महिला खासदार भाजपाचा प्रचार करताना दिसत आहेत. आणि याला कारणीभूत ठरला आहे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा. त्याचं झालं असं, की कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर पंजाब लोक काँग्रेस या नावाचा नवा पक्ष स्थापन केला. यानंतर त्यांनी आपल्या पक्षाकडून विधानसभा निवडणूक देखील लढवण्याची घोषणा केली.

पण यादरम्यान कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजपाशी हातमिळवणी केली. आता अमरिंदर सिंग हे भाजपा आणि पंजाब लोक काँग्रेस यांचे संयुक्त उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत. त्यामुळे पतियाला मतरदारसंघातून भाजपानं देखील ‘आपल्या’ उमेदवारासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे.

लोकसत्ता विश्लेषण : पंजाबात चन्नींवर भरवसा, सिद्धूंना ठेंगा कशासाठी? जाणून घ्या

परनीत कौर काँग्रेसमध्ये, प्रचार मात्र विरोधात!

पण कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी जरी काँग्रेसचा राजीनामा दिला असला, तरी त्यांच्या पत्नी परनीत कौर या मात्र अजूनही काँग्रेसच्या अधिकृत खासदार आहेत. त्याही पतियाला लोकसभा मतदारसंघातूनच! अमरिंद सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर परनीत कौर यांनी हे स्पष्ट केलं होतं की आपण आपल्या पतीच्या पाठिशी राहणार आहोत. पण हे सांगताना त्यांनी काँग्रेसला मात्र सोडचिठ्ठी दिलेली नाही.

Punjab Election: “आम आदमी पार्टीचा उदय राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला” ; प्रियंका गांधींचं विधान!

सध्या कॅप्टन अमरिंदर सिंग आपल्या प्रचारासाठी पतियाला विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. परनीत कौर देखील त्यांच्यासोबत त्यांचा प्रचार करत आहेत. त्यामुळे आपल्याच पक्षाच्या लोकसभा मतदारसंघात परनीत कौर विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्थात त्यांचे पती कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा प्रचार करताना दिसू लागल्या आहेत. काँग्रेससाठी ही मोठी पंचाईत झाली असताना भाजपासाठी मात्र ही मोठी जमेची बाजू ठरली आहे.

२० फेब्रुवारी रोजी मतदान, १० मार्चला मतमोजणी!

पंजाबमध्ये २० फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून १० मार्च रोजी मतमोजणी होईल. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी निवडणुकांसाठी भाजपा आणि संयुक्त शिरोमणी अकाली दलासोबत आघाडी केली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२३ ( Elections ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-02-2022 at 16:58 IST
ताज्या बातम्या