05 March 2021

News Flash

Raigad सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार

रायगड कुठल्याही लाटेवर स्वार न होणारा मतदारसंघ म्हणून ओळख असणाऱ्या रायगड लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा अनंत गीते आणि सुनील तटकरे या दोन तुल्यबळ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. गेल्या वेळी गीते यांना निसटता विजय मिळाला होता. लोकसभा निवडणुकीत आजवर कधीही पराभव पाहिला नाही अशा गीते यांच्यापुढे मतदारसंघ कायम राखण्याचे यंदा आव्हान आहे. गेल्या निवडणुकीत गीते यांना ३ लाख ९६ हजार १७८ तर तटकरे यांना ३ लाख ९४ हजार ०६८ मत मिळाली होती. सुनील तटकरे नावाच्या अपक्ष उमेदवाराला १० हजार मते मिळाली होती व हीच मते गीते यांच्या पथ्यावर पडली होती. राष्ट्रवादी आणि शेकाप एकत्र आल्याने यंदा तटकरे यांच्यासाठी लढत सोपी जाईल, असे कागदावरचे चित्र असले तरी प्रत्यक्ष समीकरणे कशी तयार होतात यावर सारे अवलंबून असेल. तटकरे यांना वाटते तेवढे सोपे नाही हे मात्र निश्चित. रायगड जिल्ह्य़ातील अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड तर रत्नागिरी जिल्ह्य़ातील दापोली, गुहागर असे सहा विधानसभा मतदारसंघ मिळून हा मतदारसंघ तयार झाला आहे. आजवर कुठल्याही लाटेचा मतदारसंघावर प्रभाव दिसून आलेला नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीतही याचाच प्रत्यय आला आहे. देशभरात मोदी लाट असताना रायगडमधून अनंत गीते यांना विजयी होण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. पूर्वी कुलाबा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघातून शेकाप आणि काँग्रेसचे खासदार आलटून पालटून निवडून येत असत. पण अलीकडच्या काळात या मतदारसंघात दोन्ही पक्षांची वाताहत झाल्याचे दिसून येत आहे. शेकापने राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारले आहे. या आघाडीमुळे काँग्रेस कोंडी झाली आहे. कारण उत्तर रायगडात शेकाप हा काँग्रेसचा पारंपारिक विरोधक आहे. राष्ट्रवादीशी आघाडी करताना शेकापशी जुळवून घेणे काँग्रेससाठी अडचणीचे ठरणार आहे. शिवाय गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर तटकरेंनी शब्द पाळला नाही म्हणून काँग्रेसमध्ये खदखद आहे. अशा परिस्थितीत तटकरेंना काँग्रेसची साथ कितपत मिळेल याबाबत साशंकता आहे. राष्ट्रवादीची पडझड गेल्या पाच वर्षांत जिल्ह्य़ात राष्ट्रवादीची मोठी वाताहत झाली आहे. महेंद्र दळवी, श्याम भोकरे, राजीव साबळे. विजय कवळे, राजा केणी, सुरेश टोकरे यांच्यासारखे दुसऱ्या फळीतील नेते पक्षाला सोडून गेले आहेत. तटकरे यांचे बंधू आणि आमदार पुतणे त्यांच्यापासून दूर आहेत. भास्कर जाधव आणि तटकरे यांचे संबंध सर्वश्रुत आहे. त्यामुळे पक्षांची विस्कटलेली घडी पुन्हा बसवणे. झालेले नुकसान भरून काढणे अशा दोन पातळ्यांवर त्यांना काम करावे लागणार आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील महाड, श्रीवर्धन, दापोली आणि गुहागर या मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद आहे. अलीकडच्या काळात अलिबाग मतदारसंघातही शिवसेनेने बांधणी सुरू केली आहे. पेण मतदारसंघात तुलनेत शिवसेना कमकुवत असली तरी, रविशेठ पाटील यांचा भाजपप्रवेश गीतेंसाठी दिलासादायक आहे. रामदास कदम आणि अनंत गीते यांच्यातील वाद आता मिटला आहे. या सर्व गोष्टी गीतेंसाठी पथ्यावर पडणाऱ्या आहेत. मतदारसंघात कुणबी समाजाचे प्राबल्य आहे. हा समाज सातत्याने गीते यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे.

raigad Lok Sabha Election 2019 Result

Name
Party
Status
Tatkare Sunil Dattatray
NCP
WON
*The election result data is provided by C-Voter on a real time basis and is not altered or moderated by loksatta.com in any way.

Raigad 2019 Candidate List

Candidate Name
Party
Criminal Cases
Education
Age
Assets / Laibilities (Rs.)
Anant Gangaram Geete
SHS
0
10th Pass
67
5.44 Cr / 2.13 Cr
Avinash Vasant Patil
IND
0
5th Pass
53
4 Thousand / 0
Gajendra Parshuram Turbadkar
Kranti Kari Jai Hind Sena
0
12th Pass
50
91.7 Thousand / 1 Lac
Ghag Sanjay Arjun
IND
3
10th Pass
47
2.19 Cr / 35.5 Lac
Madhukar Mahadev Khamkar
IND
0
10th Pass
42
19.39 Lac / 0
Milind Bhaguram Salvi
BSP
2
8th Pass
61
39.6 Lac / 0
Munafar Jainubhidin Choudhary
IND
0
5th Pass
44
10.95 Lac / 5 Lac
Nathuram Bhaguram Hate
BMUP
0
10th Pass
58
91.46 Lac / 8.4 Lac
Prakash Sakharam Kalke
Bhartiya Kisan Party
0
Post Graduate
34
37.86 Lac / 0
Subhash Janardan Patil
IND
0
10th Pass
50
28.63 Lac / 0
Suman Bhaskar Koli
Vanchit Bahujan Aaghadi
0
5th Pass
61
1.1 Cr / 5.19 Lac
Sunil Pandurang Tatkare
IND
0
8th Pass
43
1.01 Lac / 0
Sunil Sakharam Tatkare
IND
0
8th Pass
43
10.33 Lac / 2.66 Lac
Tatkare Sunil Dattatray
NCP
0
Others
64
12.75 Cr / 32.21 Lac
Yogesh Kadam
IND
0
12th Pass
29
36.9 Thousand / 0

Raigad सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल

* Bye Election Result
Year
Winner
Party
Vote%
2009
Anant Geete
SHS
53.89%
2014
Anant Geete
SHS
40.11%
2019
Tatkare Sunil Dattatray
NCP
47.49%

Raigad मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

Constituency Siting MLA Party
PENDhairyasheel Mohan PatilPWPI
ALIBAGSubhash Alias Panditshet PatilPWPI
SHRIVARDHANAvdhoot Anil TatkareNCP
MAHADGogawale Bharat MarutiSHS
DAPOLIKadam Sanjay VasantNCP
GUHAGARJadhav Bhaskar BhauraoNCP

सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी

Just Now!
X