Premium

Rajasthan Election Result 2023: “जिंकण्यासाठी हवेत गप्पा मारणं, प्रलोभनं…”, मोदींचं दिल्ली मुख्यालयात भाषण!

Rajasthan Legislative Assembly Election Result 2023 Live Updates: मध्य प्रदेश, छत्तीसगड व तेलंगणाप्रमाणेच आज राजस्थान विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून काँग्रेस की भाजपा? याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.

rajasthan-assembly-election-2023-know
राजस्थान विधानसभा निवडणूक

Rajasthan Vidhan Sabha Election Result 2023 Updates, 3 December 2023: निकालाच्या दोन दिवस आधी मिझोरममधील मतमोजणी एक दिवस पुढे अर्थात ४ तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली. मात्र, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड व तेलंगणा या चार राज्यांमध्ये आजच मतमोजणी होत असून काँग्रेस व भाजपा या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांमधली ही लढत पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम मानली जात आहे. एग्झिट पोलमध्ये भाजपाला झुकतं माप मिळालं असलं, तरी राजस्थानमध्ये अँटि इन्कम्बन्सीचा फायदा भाजपाला होतो की काँग्रेस सत्ता राखते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Live Updates

Rajasthan Assembly Election Result 2023 Updates: राजस्थान विधानसभा निवडणुकीसंदर्भातले सर्व महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर!

22:26 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: निकालाची अंतिम आकडेवारी…

भाजपा – ११५

काँग्रेस – ७०

बसप – २

इतर – १२

21:29 (IST) 3 Dec 2023
Video: भाजपासाठी तेलंगणा का महत्त्वाचं होतं? जाणून घ्या निकालामागचं राजकीय समीकरण!

राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये भाजपाला मोठा विजय मिळाला असला, तरी तेलंगणामध्ये मात्र काँग्रेसनं केसीआर यांच्या बीआरएसला पराभूत केलं आहे.

इथे पाहा व्हिडीओ

20:56 (IST) 3 Dec 2023
Video: उत्तरेत काँग्रेस नाही, दक्षिणेत भाजपा नाही; कसं असेल देशाचं राजकीय भवितव्य? पाहा गिरीश कुबेर यांचं विश्लेषण!

चार राज्य, दोन पक्ष, निवडणूक निकाल आणि राजकीय भवितव्य! पाहा गिरीश कुबेर यांचं विश्लेषण…

इथे पाहा व्हिडीओ

20:26 (IST) 3 Dec 2023
Video: तीन राज्यांत काँग्रेसचा पराभव का झाला? निकालांचं विश्लेषण गिरीश कुबेर यांच्या शब्दांत!

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड निवडणूक निकालांचं विश्लेषण गिरीश कुबेर यांच्या शब्दांत!

इथे पाहा व्हिडीओ

20:02 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: दिल्लीतील भाषणातून मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल!

ज्यांना भ्रष्टाचाऱ्यांच्या बाजूला उभं राहण्यात अजिबात संकोच वाटत नाही, त्यांना आज देशानं स्पष्ट शब्दांत संदेश दिला आहे. जे भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करतात, तपास यंत्रणांची दिवसरात्र बदनामी करत आहेत. त्यांनी हे लक्षात घ्यावं की हे निकाल भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढ्याला मिळालेली जनतेची सहमतीच आहे. हे निकाल काँग्रेस किंवा त्यांच्या आघाडीलाही मोठा धडा आहे. तो धडा हा आहे की फक्त काही कुटुंबीयांनी एकत्र येण्यामुळे फोटो कितीची चांगला आला, तरी देशाचा विश्वास जिंकणं अशक्य आहे. देशाच्या जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी राष्ट्रसेवेची इच्छा असायला हवी. घमंडिया आघाडीत ती तसूभरही दिसत नाही. शिवीगाळ, निराशा, नकारात्मकता यामुळे घमंडिया आघाडीला माध्यमांमध्ये मथळे मिळू शकतात, पण जनतेच्या मनात जागा मिळू शकत नाही – नरेंद्र मोदी

20:00 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: या विजयानं २०२४ च्या हॅटट्रिकचीही गॅरंटी – नरेंद्र मोदी

काही लोक तर म्हणत आहेत की आजच्या या हॅटट्रिकनं २०२४ सालच्या हॅटट्रिकची गॅरंटी देऊन टाकली आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदींची विजयानंतर प्रतिक्रिया

19:10 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: मोदींना शिवीगाळ करणं म्हणजे ओबीसींना शिवीगाळ करणं आहे – जे. पी. नड्डा!

देशात जर कुणाची गॅरंटी आहे, तर ती फक्त मोदींची गॅरंटी आहे. या निवडणूक निकालांवरून हे स्पष्ट होतंय की मोदी है तो मुमकिन है.. जातीवाद आणि भेदभाव पसरवण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीकडून करण्यात आला. पण त्यांच्यासमोर मोदींचं विकासाचं पारडं जड ठरलं. मोदींना शिवीगाळ करणं म्हणजे ओबीसींना शिवीगाळ करणं आहे हे त्यांना कळलं नाही का ? – जे. पी. नड्डा

18:50 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: अशोक गहलोत यांचा राजीनामा

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राज्यपालांकडे केला राजीनामा सादर

18:49 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: भाजपाच्या विजयावर निवडणूक आयोगाचं शिक्कामोर्तब!

राजस्थानमध्ये भाजपाच्या विजयावर निवडणूक आयोगाचं शिक्कामोर्तब; अधिकृत आकडा शंभरीपार!

18:23 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: वीरेंद्र सेहवागची पोस्ट व्हायरल!

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील निकालांवर माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागची पोस्ट व्हायरल!

18:22 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: “जनादेशाचा स्वीकार करतो”, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

राहुल गांधींनी स्वीकारला राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशमधला पराभव, म्हणाले…

17:43 (IST) 3 Dec 2023
तीन राज्यांत भाजपाचा विजय निश्चित; पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

भाजपाच्या अनेक मोठे नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाजपाच्या यशाबाबत एक्सवर पोस्ट केली आहे. पोस्टमधून त्यांनी राज्यातील जनतेचे आणि भाजपा नेत्यांचे आभार मानले आहेत.

सविस्तर वृत्त वाचा

17:16 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: मल्लिकार्जुन खर्गेंची पहिली प्रतिक्रिया

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची पहिली प्रतिक्रिया… म्हणाले, “आम्ही या तात्पुरत्या बसलेल्या धक्क्यातून लवकर सावरू आणि आगामी लोकसभा निवडणुकांसाठी इंडिया आघाडीसह पूर्ण सज्ज राहू.”

17:10 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: निकाल धक्कादायक आहेत – अशोक गेहलोत

पराभव स्वीकारताना राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणतात, “मी नेहमीच हे म्हणत आलोय की मी जनतेचा कौल मान्य करेन. नव्या सरकारला माझ्या शुभेच्छा आहेत. मला आशा आहे की ते राज्यातल्या लोकांच्या कल्याणासाठी काम करतील. हे निकाल खरंच धक्कादायक आहेत.”

17:04 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: भाजपाच्या विजयावर मोदींची पहिली प्रतिक्रिया…

भाजपाच्या विजयावर मोदींची पहिली प्रतिक्रिया…

16:16 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: दिया कुमारी ७१ हजार मतांच्या फरकाने विजयी; मुख्यमंत्री होणार?

राजस्थानच्या राजघराण्याच्या सदस्या दिया कुमारी या तब्बल ७१ हजार ३६८ मताधिक्यानं विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेसचे सीताराम अगरवाल यांचा पराभव केला आहे. दिया कुमारी दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. याआधी २०१३ साली त्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत त्या लोकसभा निवडणूक जिंकल्या होत्या.

15:27 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: ५० टक्के विद्यमान जागांवर काँग्रेसचा सुपडा साफ!

राजस्थानमध्ये काँग्रेस ७२ जागांवरच अडकली असून भाजपा ११३ जागांसह आघाडीवर आहे. त्यामुळे काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या जवळपास ५० जागांवर पक्षाचा सुपडा साफ झाल्याचं निकालांवरून स्पष्ट होत आहे.

15:23 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: अशोक गेहलोत आज संध्याकाळीच राजीनामा देणार

राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आज संध्याकाळीच राज भवनावर आपला राजीनामा सादर करणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे,.

15:21 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: राज्यवर्धन राठोड राजस्थानमध्ये विजयी

भाजपा उमेदवार राज्यवर्धन राठोड विजयी

15:00 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: भाजपाच्या विजयानंतर वसुंधरा राजे म्हणतात, “भाजपाचा हा विजय…”

भाजपाच्या विजयानंतर वसुंधरा राजे म्हणतात, “भाजपाचा हा विजय…”

14:26 (IST) 3 Dec 2023
राजस्थानच्या निकालावर काय म्हणाले शरद पवार?

“दोन ठिकाणी भाजपाचं राज्य होतं. तिथे त्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केलं होतं. राजस्थानमध्ये काँग्रेस पाच वर्षे सत्तेवर होती. तिथे नव्या लोकांना संधी देऊ असं राजस्थानच्या लोकांना वाटलं. त्याला साजेसे आत्ताचे कल दिसत आहेत. हे कल आहेत निकाल नाहीत हे लक्षात घ्या. ” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

13:34 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: आता मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच!

राजस्थानमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं निवडणूक निकालांवरून स्पष्ट होत असताना आता भाजपामधून मुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार? याची चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे वसुंधरा राजेंचे भाजपा केंद्रीय नेतृत्वाबरोबर ताणले गेलेले संबंध असताना दुसरीकडे मगंत बलकनाथ यांची प्रबळ दावेदारी मानली जात आहे. मात्र, त्याचबरोबर भाजपामधील एक गट गजेंद्र शेखावत यांच्या नावासाठी आग्रही असल्याचं दिसून येत आहे.

12:59 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: भाजपाच्या विजयावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

भाजपाच्या विजयावर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “मी आत्ता एवढंच सांगेन की…”

12:50 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: “राजस्थान, छत्तीसगढ में सरकार जा रही है”, राहुल गांधींचा जुना व्हिडीओ व्हायरल

राहुल गांधींचा जुना व्हिडीओ व्हायरल

12:17 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: महाराष्ट्रातील भाजपा नेत्याचं सूचक ट्वीट!

महाराष्ट्रातील भाजपा नेते अतुल भातखळकर यांची सोशल मीडिया पोस्ट, म्हणाले, “राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ तो झाँकी है, लोकसभा अभी बाकी है.. अब की बार ४०० पार”.

12:06 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: जयपूर भाजपा कार्यालयाबाहेर महिला कार्यकर्त्यांची सेलिब्रेशनला सुरुवात

भाजपा महिला कार्यकर्त्यांची सेलिब्रेशनला सुरुवात!

11:18 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: तेजस्वी यादव म्हणतात, इतक्यात अंदाज वर्तवणं घाईचं ठरेल

“इतक्यात अंदाज वर्तवणं घाईचं ठरेल”, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचं विधान

11:16 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात लाडू, मिठाईची तयारी!

काँग्रेस मुख्यालयात लाडू, मिठाईची तयारी!

10:39 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: मतमोजणीवर आनंद महिंद्रांचं ट्वीट चर्चेत!

मतमोजणीवर आनंद महिंद्रांचं ट्वीट चर्चेत!

10:36 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: वाचा राजस्थान मतमोजणीचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स!

वाचा राजस्थान मतमोजणीचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स!

10:29 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: जादुगराची जादू संपली – केंद्रीय मंत्री

भाजपा या निवडणुकीत मोठ्या बहुमताने जिंकेल. जादुगराची जादू संपली आहे, ताईत तुटला आहे. राजस्थानच्या जनतेनं या निवडणुका काँग्रेसला सत्तेतून पायउतार करण्यासाठी लढल्या होत्या – केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

09:59 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: आघाडीत भाजपा शंभरीपार!

राजस्थानमध्ये भाजपानं २०० पैकी १०० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे.

09:57 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: सचिन पायलट यांना धक्का, टाँकमध्ये पिछाडीवर!

राजस्थानच्या राजकारणात काँग्रेससाठी क्रमांक दोनचे महत्त्वाचे नेते सचिन पायलट त्यांच्या टाँक मतदारसंघात पिछाडीवर पडले आहेत.

09:55 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: मला १०० टक्के खात्री, विजयी उमेदवारांची बैठकही बोलावली – अशोक गेहलोत

राजस्थानमध्ये आपल्याला १०० टक्के विजयाची खात्री असून निकालाच्या दुसऱ्या दिवशी विजयी उमेदवारांची एक बैठकही मी बोलावली आहे – अशोक गेहलोत, राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री

09:53 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: भाजपासाठी ‘बल्ले बल्ले’ स्थिती – जयवीर शेरगिल

भाजपासाठी “बल्ले बल्ले” परिस्थिती – जयवीर शेरगिल, भाजपा नेते

09:51 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: “…म्हणून मतदारांनी राजस्थानमध्ये काँग्रेसला निरोप देण्याचा निर्णय घेतलाय”

“काँग्रेसनं गेल्या पाच वर्षांत लोकांना लुटलं आहे. फसवलं आहे. खोटी आश्वासनं दिली आहेत. त्यामुळेच लोकांनी काँग्रेसला निरोप देण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानमध्ये भाजपा सत्ता स्थापन करेल”, राजस्थान भाजपा प्रदेशाध्यक्ष सीपी जोशींचा विश्वास

09:49 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: काँग्रेस पुन्हा पिछाडीवर!

राजस्थानमध्ये काँग्रेस पुन्हा पिछाडीवर…

09:38 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: निवडणूक आयोगाकडून पहिली अधिकृत आकडेवारी जाहीर!

निवडणूक आयोगाकडून पहिली अधिकृत आकडेवारी जाहीर!

09:32 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: भाजपा जिंकल्यास राजस्थानचे मुख्यमंत्री कोण होणार?

राजस्थानमध्ये भाजपाच्या विजयाचा दावा पक्षाचे अनेक नेते, खासदार व वरीष्ठ करत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपानं सरकार स्थापन केल्यास मुख्यमंत्रीपदी कोण असेल? यावर पक्षाचे कोटा नॉर्थमधील उमेदवार प्रल्हाद गुंजाल यांनी सूचक विधान केलं आहे. “आमच्याकडे वसुंधरा राजेंसारखं ज्येष्ठ नेतृत्व आहे. आम्हाला बाहेरून मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार आणण्याची गरज नाही”, अस गुंजाल म्हणाले आहेत.

09:19 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: राजस्थान ३० वर्षांची परंपरा मोडीत काढेल का? काय आहे ही परंपरा?

राजस्थानमध्ये गेल्या ३० वर्षांत कोणत्याही एका पक्षाला सलग दोन विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवता आलेला नाही. यंदा ती परंपरा मोडेल, असा विश्वास विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी व्यक्त केला आहे. मात्र, एग्झिट पोल्समध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

09:15 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: भाजपाची पुन्हा आघाडी!

राजस्थानमध्ये भाजपानं पुन्हा आघाडी घेतली असून आता भाजपा ९० जागांवर आघाडीवर असून काँग्रेस ७९ जागांवर आघाडीवर आहे.

08:49 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: मतमोजणीचा पहिला कौल हाती…

मतमोजणीच्या पहिल्या अर्ध्या तासात काँग्रेसनं भाजपावर काहीशी आघाडी घेतली आहे.

काँग्रेस – ४९

भाजपा – ४५

इतर – २

08:24 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: दिल्ली भाजपा मुख्यालयात मिठाईची तयारी!

दिल्ली भाजपा मुख्यालयात मिठाईची तयारी!

08:21 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: पोस्टल मतमोजणीतील पहिला कौल काँग्रेसच्या बाजूने!

पोस्टल मतमोजणीतील पहिला कौल काँग्रेसच्या बाजूने.. काँग्रेस १२ जागांवर आघाडीवर, भाजपा १०!

07:41 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: “राजस्थानमध्ये काँग्रेसचा विजय निश्चित”

आमच्या विकासकामांमुळे, वरीष्ठ नेत्यांनी केलेल्या प्रचारसभांमुळे आमचा विजय राजस्थानमध्ये निश्चित आहे. आमच्या जाहीरनाम्यावर जनतेनं विश्वास व्यक्त केला आहे. तरुणांसाठी रोजगार, गॅस सिलेंडर, ५० लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य सुविधा, गृहलक्ष्मी योजना या सगळ्या योजना तरुणांना आणि युवकांना प्राधान्य देणाऱ्या आहेत. इथे भाजपाचं काम नव्हतं. मोदीजी इथे येऊन अशा गोष्टी बोलायचे ज्या कदाचित देशाच्या पंतप्रधानांना शोभत नव्हत्या. १० वर्षं पंतप्रधान असूनही त्यांना त्यांचं म्हणणं मांडता येत नव्हतं. इथले भाजपाचे नेते पूर्णपणे अपयशी होते – राजस्थान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा

07:35 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: काँग्रेसला विजयाचा विश्वास!

काँग्रेसचे मंत्री बी. डी. कल्ला यांना विजयाचा विश्वास, म्हणाले, “बिकानेरमधून मी निवडून विधानसभेत जाणार, काँग्रेस पुन्हा सरकार स्थापन करणार!”

07:16 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: काँग्रेस कार्यकर्त्यांची मतमोजणीआधी पूजाअर्चा!

काँग्रेस कार्यकर्त्यांची मतमोजणीच्या आधी दिल्ली कार्यालयात पूजा-अर्चा

06:51 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: राजस्थान निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय होतं?

कल्याणकारी योजना आणि जातीनिहाय सर्वेक्षणाचे आश्वासन हे या जाहीरनाम्याचे वैशिष्टय़ आहे. शेतकरी आणि युवकांसाठी अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. तरुणांसाठी १० लाख नोकऱ्या, तसेच पंचायत स्तरावर नोकरभरतीसाठी नवीन योजना राबवणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

वाचा सविस्तर

06:49 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: भाजपानं राजस्थानमध्ये कोणती आश्वासनं दिली होती?

मोफत स्कुटी, अँटी-रोमियो स्क्वॉड, पोलिस दलात ३३ टक्के आरक्षण; भाजपाच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस

वाचा सविस्तर

06:48 (IST) 3 Dec 2023
Rajasthan Election Result 2023 Live: राजस्थानात मोदी, योगी आणि बाबा..

दिल्लीपासून दोन तासांच्या अंतरावर अलवर जिल्ह्यामधील तिजारा विधानसभा मतदारसंघ.

वाचा सविस्तर

अंतर्गत दुफळींमुळे राजस्थानातील निवडणूक अधिक चुरशीची (संग्रहित छायाचित्र)

Rajasthan Assembly Election Result 2023 Updates: राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेसला हात की भाजपाला मतदारांची साथ?

Web Title: Rajasthan assembly election result 2023 live updates in marathi vote counting congress bjp latest news pmw

First published on: 03-12-2023 at 06:11 IST
Next Story
Madhya Pradesh Election Result 2023 : भाजपाला स्पष्ट बहुमत, काँग्रेसचा धोबीपछाड; नेमकी स्थिती काय?