उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष सत्ता मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत हे देखील यूपी निवडणुकीबाबत आपली वक्तव्ये करत आहेत. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीदरम्यान त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मुझफ्फरनगरमधून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले. यासोबतच त्यांनी राम मंदिराबाबतही विधान केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यूज18 इंडियाच्या एका कार्यक्रमात राम मंदिरावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना राकेश टिकैत यांनी म्हटले की, दुसरे मंदिर का बांधले पाहिजे. त्या ऐवजी शाळा, रुग्णालये का बांधली जात नाहीत? यासोबत ते म्हणाले की, भाजपा आपल्या पक्षाच्या निधीतून मंदिर बांधत आहे का? गावोगावी मंदिरे बांधलेली आहेत.

टिकैत यांनी मुख्यमंत्री योगींना रूग्णालये बांधण्याचे काम करण्यास सांगितले. बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करून ते म्हणाले की, निरीक्षक भरतीसाठी उमेदवार रस्त्यांवर लाठ्या-काठ्या खात आहेत. त्यांची विवाह मोडली आहेत, त्यांना रोजगार देण्यासाठी सरकारने काम करावे. “मंदिरं गावातील लोक देणगी जमा करून बांधातात. सर्व धार्मिक स्थळे बांधली जात आहेत. विकास करणे हे सरकारचे काम आहे”

याचबरोबर टिकैत पुढे म्हणाले की, “मंदिर, मशीद, जिना आणि हिंदू-मुस्लिम हे मुद्दे मत मिळवण्याचे काम करतात. कोणताही राजकीय पक्ष या गोष्टींचा वापर करून त्याद्वारे आपली मतं शोधतो.” तर, आधीच्या सरकारांमध्ये कैराना आणि मुझफ्फरनगर दंगली झाल्या तेव्हा तुम्ही बोलला नाही का? या प्रश्नावर टिकैत म्हणाले – “आम्ही फक्त एवढेच सांगितले होते की मथुरा मुझफ्फरनगर होऊ देऊ नका.”

योगी मथुरेतून निवडणूक लढवणार? या प्रश्नावर बोलताना टिकैत हसले आणि म्हणाले की, “ त्यांनी मुझफ्फरनगरमधून निवडणूक लढवली तर बरे होईल आणि स्वबळावर लढावे, पक्षाच्या बळावर कशाला लढतात. ”

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कुठून निवडणूक लढवणार याची लवकरच घोषणा होऊ शकते.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakesh tikait challenges yogi adityanath to contest elections on his own from muzaffarnagar msr
First published on: 10-01-2022 at 12:16 IST