पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती गौतम अदाणी आणि मुकेश अंबानी यांच्यासह काँग्रेसवर आर्थिक गैरव्यहाराचे आरोप केले आहेत. या आरोपांनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी मागणी केली आहे की, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पंतप्रधानांचं, एका जबाबदर व्यक्तीचं हे वक्तव्य अधिकृत जबाब मानून या मनी लॉन्डरिंग प्रकरणाचा तपास करावा, तसेच अदाणींसह अंबानींना अटक करावी. राऊत यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. राऊत यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तेलंगणातील दोन प्रचारसभांचा दाखला दिला. तसेच या संभाद्वारे मोदी यांनी पहिल्यांदाच अदाणी आणि अंबानींचा जाहीरपणे उल्लेख केला असल्याचं म्हटलं आहे.

संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच्या (बुधवार, ७ मे) दोन सभांमध्ये काँग्रेस पक्षावर टीका केली. ती टीका करत असताना त्यांनी एक आरोप केला. ते म्हणाले, उद्योगपती गौतम अदाणी आणि मुकेश अंबानी यांच्या काळ्या पैशावर काँग्रेस (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष) ही लोकसभा निवडणूक लढवत आहे. या दोन उद्योगपतींनी राहुल गांधी यांना (काँग्रेसचे प्रमुख नेते) टेम्पो भरून काळा पैसा पुरवला आहे. हे देशाच्या पंतप्रधानांचं वक्तव्य आहे. ज्या मोदींनी गौतम अदाणींना हा देश विकत घ्यायला मदत केली, येथील सार्वजनिक उपक्रम विकत घ्यायला मदत केली. उद्योगपतींचं २० लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं, त्याच अदाणींवर मोदी आता आरोप करू लागले आहेत.

Suresh Gopi
शपथविधीनंतर राजीनाम्याची चर्चा! केरळचे भाजपाचे मंत्री सुरेश गोपी म्हणाले, “मोदी सरकारच्या…”
India Block Meeting
विरोधात बसणार की सत्तेत येणार? इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर मल्लिकार्जुन खरगे म्हणाले…
Rajiv Shukla, bjp, claim,
“चारशेच्या दाव्याची हवा निघाली”, काँग्रेस नेते राजीव शुक्लांची भाजपवर टीका; म्हणाले, “विरोधी पक्षांना ज्याप्रमाणे…”
Smriti Irani Amethi Result
केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा १ लाखांच्या मतांनी पराभव; काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा विजयी
Jairam Ramesh On Narendra Modi
“नैतिक जबाबदारी स्वीकारून नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा”; काँग्रेस नेते जयराम रमेश यांची मागणी
Rebel independent candidate Vishal Patil attends Congress social gathering in sangli
काँग्रेसच्या स्नेहमेळाव्यास बंडखोर विशाल पाटलांची हजेरी, उबाठा शिवसेनेकडून आक्षेप
sharad pawar
“…तर केंद्रातही महाविकास आघाडीसारखा प्रयोग”, शरद पवारांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, “प्रयत्नांची पराकाष्टा करून…”
Umesh Patil on Shrirang Barne
महायुतीत वादाची ठिणगी? श्रीरंग बारणेंच्या आरोपानंतर उमेश पाटील म्हणाले, “थोडंफार उन्नीस बीस…”

ठाकरे गटातील खासदार संजय राऊत म्हणाले, सावकार आणि शेठजींच्या पक्षाचे नेते नरेंद्र मोदी हे गौतम अदाणी आणि मुकेश अंबानींचं नाव घेऊन काँग्रेसवर आरोप करत आहेत. हेच मोदी आता त्यांच्या स्वतःच्या अर्थ दात्यांवर हल्ला करू लागले आहेत. अदाणी आणि अंबानी हे भाजपाचे अर्थ दाते आहेत. त्यांच्यावरच आता मोदी आरोप करू लागले आहेत. याचा अर्थ ते या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यांनी पहिल्यांदाच एखाद्या ठिकाणी अंबानी आणि अदानी यांचं नाव घेतलं आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट मी आता तुम्हाला सांगणार आहे.

राऊत म्हणाले, देशाचे पंतप्रधान सांगत आहेत की गौतम अदाणी आणि मुकेश अंबानी यांचा काळा पैसा टेम्पो भरून काँग्रेसकडे जातोय. त्या पैशावर काँग्रेस निवडणूक लढत आहे. याचा अर्थ असा आहे की मोदींना या भ्रष्टाचाराची, या गैरव्यवहाराची माहिती आहे. हे पीएमएलए अंतर्गत मनी लॉन्डरिंगचं प्रकरण आहे. त्यामुळे मोदी यांनी सक्तवसुली संचालनालयाला सांगून या दोन उद्योगपतींना अटक केली पाहिजे. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. मोदी आणि भाजपा गेल्या काही वर्षांपासून या पीएमएलए कायद्यांतर्गत विरोधी पक्षातील नेत्यांना अटक करत आहे. त्याच कायद्याखाली त्यांनी आता अदाणी आणि अंबानींवर कारवाई केली पाहिजे.

हे ही वाचा >> “श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहिलंय, मेरा बाप…”, प्रियांका चतुर्वेदींची जीभ घसरली

“अदाणी आणि अंबानींना अटक करावी”

खासदार राऊत म्हणाले, अदाणी आणि अंबानी यांनी भ्रष्टाचाराचा पैसा काँग्रेसकडे वळवलाय असं मोदी सांगतात, पंतप्रधान म्हणत आहेत की या दोन उद्योगपतींचा काळा पैसा काँग्रेस या निवडणुकीत वापरत आहे. म्हणजेच हे लॉन्डरिंगचं प्रकरण आहे. त्यामुळे सक्तवसुली संचालनालयाच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जबाब घेऊन ताबडतोब याप्रकरणी कारवाई केली पाहिजे. मुळात पंतप्रधानांचं कालच्या सभेतील वक्तव्य हे एक जबाबदार वक्तव्य मानून, कायदेशीर जबाब मानून ईडीने आता कारवाई करायला सुरुवात करायला हवी. कलम ४५ अ अंतर्गत त्यांनी मोदींचा जबाब ग्राह्य धरून अदाणी आणि अंबानींवर कारवाई करायला हवी. मोदींनी काल ज्या मनी लॉन्डरिंग प्रकरणाचा उल्लेख करत या दोन उद्योगपतींवर आरोप केले त्यांच्यावर आता कारवाई व्हायला हवी. मोदी या प्रकरणी कारवाई करत नसतील तर याचा अर्थ त्यांचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने याची जबाबदारी स्वीकारावी आणि त्यांच्या लाडक्या नेत्यावर उपचार करून घ्यावेत.