13 August 2020

News Flash

Satara सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार

सातारा लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी किसन वीर, माजी संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण, प्रतापराव भोसले, हिंदुराव निंबाळकर, लक्ष्मणराव पाटील, श्रीनिवास पाटील यांच्यानंतर उदयनराजे भोसलेंकडे या मतदारसंघाची सूत्रे आली. मतदारसंघात मराठा, माळी आणि धनगर या तीन समाजाचे प्राबल्य आहे. दहा वर्षांपूर्वी बुधाजीराव मुळीक यांना सोबत घेऊ न उदयनराजे यांनी खंडाळा ते कोयनानगर मतदारसंघात पायी भूमाता दिंडी काढली होती. या वेळी या मतदारसंघातील प्रश्नांवर त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. मात्र, आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायाने उदयनराजे यांच्याकडे गेली दहा वर्षे हा मतदारसंघ आणि विधानसभेतील बहुसंख्य मतदारसंघही याच पक्षाकडे असतानाही हे प्रश्न आजही तसेच आहेत. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाचा बालेकिल्ला ठरलेला आहे. जिल्ह्य़ातील बहुतांश सत्तास्थाने याच पक्षाकडे आहेत. पक्षाच्या या शक्तीमुळे उदयनराजे हे मागील दोन्ही निवडणुकांमध्ये मोठय़ा मताधिक्याने निवडून आले. त्यांच्या निवडीमागे ते सांगत असलेले राजेपण जेवढे महत्त्वाचे आहे, त्याहीपेक्षा पक्षाची या जिल्ह्य़ातील ताकद आणि शरद पवार यांनी त्यांच्यामागे लावलेली शक्तीही निर्णायक आहे. मात्र मागील पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. जिल्ह्य़ात भाजपाचे वारूही सुसाट सुटले आहे. तर उदयनराजे यांनी स्वपक्षाबरोबरच अनेकांची नाराजीही ओढवून घेतली आहे. आज सातारा शहर व तालुक्यापासून ते जिल्ह्य़ात सर्वत्र त्यांना विरोध करणारी नवी शक्तिस्थाने उभी राहिली आहेत. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याबरोबरचे उदयनराजे यांचे वाद गेल्या काही दिवसात अगदी रस्त्यावरील हातघाईपर्यंत आलेले आहेत. लोणंद येथील खंडणी प्रकरणात त्यांना झालेली अटक, आनेवाडी टोलनाका ठेका प्रकरणावरून साताऱ्यात झालेला गदारोळ, फलटण येथे जमावाने जात रामराजे नाईक निंबाळकरांच्या घरात घुसण्याची केलेली भाषा, राष्ट्रवादी काँग्रेसच्याच आमदार आणि प्रसंगी नेतृत्वाविरोधात वेळोवेळी केलेली वक्तव्ये या साऱ्यांमुळे उदयनराजे आणि जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात उभी दरी पडलेली आहे. मागील तीन वर्षे सातारा जिल्ह्य़ाने हा टोकाचा संघर्ष पाहिला आहे. पक्षांतर्गत असलेला हा विरोध उदयनराजे यांच्यासाठी सध्या सर्वात नकारात्मक गोष्ट आहे. पक्षातील या नाराजीतून त्यांच्या उमेदवारीलाही छुप्या पद्धतीने विरोध केला जात आहे. या पाश्र्वभूमीवर त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का? मिळाली तरी ती कुठल्या पक्षाकडून? आणि त्यांनी निवडणूक लढवली तरी ते तिसऱ्यांदा विजयी होणार का याविषयी सध्या मतदारसंघात विविध मतमतांतरे व्यक्त केली जात आहेत. या सर्वात पक्षप्रमुख शरद पवार यांची भूमिका यंदाही महत्त्वाची आणि निर्णायक ठरणार आहे हे नक्की.

satara Lok Sabha Election 2019 Result

Name
Party
Status
Shrimant Chh. Udayanraje Pratapasinhmaharaj Bhonsle
NCP
WON
*The election result data is provided by C-Voter on a real time basis and is not altered or moderated by loksatta.com in any way.

Satara 2019 Candidate List

Candidate Name
Party
Criminal Cases
Education
Age
Assets / Laibilities (Rs.)
Abhijit Wamanrao -Bichukale
IND
2
Graduate
43
3.24 Lac / 0
Ananda Ramesh Thorawade
BSP
0
Graduate
39
38.55 Lac / 1.04 Cr
Bhonsle Shrimant Chhatrapati Udayanraje Pratapasin
NCP
8
12th Pass
53
2 Ar / 1.23 Cr
Dilip Shreerang Jagtap
Bahujan Republican Socialist Party
0
Graduate Professional
48
13.06 Lac / 2.84 Lac
Narendra Annasaheb Patil
SHS
4
12th Pass
44
15.28 Cr / 5.2 Cr
Panjabrao Mahadev Patil
IND
1
5th Pass
53
59.26 Lac / 3.3 Lac
Sagar Sharad Bhise
IND
2
8th Pass
31
14.87 Lac / 10 Lac
Sahdev Kerappa Aiwale
Vanchit Bahujan Aaghadi
0
Graduate Professional
63
14.27 Lac / 4 Lac
Shailendra Veer
IND
0
Graduate
44
2.38 Cr / 0

Satara सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल

* Bye Election Result
Year
Winner
Party
Vote%
1999
Laxmanrao Pandurang Jadhav Patil
NCP
46.82%
2004
Laxmanrao Pandurang Jadhav (patil)
NCP
41.71%
2009
Bhonsle Shrimant Chh. Udyanraje Pratapsinhmaharaj
NCP
65.22%
2014
Shrimant Chh. Udayanraje Pratapsinha Bhonsale
NCP
53.5%
2019
Shrimant Chh. Udayanraje Pratapsinhmaharaj Bhonsle
NCP
51.91%

Satara मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

Constituency Siting MLA Party
WAIJadhav (patil) Makrand LaxmanraoNCP
KOREGAONShinde Shashikant JaywantraoNCP
KARAD NORTHPatil Shamrao Alias Balaso PandurangNCP
KARAD SOUTHChavan Prithviraj DajisahebINC
PATANDesai Shambhuraj ShivajiraoSHS
SATARABhonsle Shivendrasinh AbhaysinhNCP

सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी

Just Now!
X