Shirdi सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार
सहकारातील दिग्गज प्रस्थापित नेत्यांचा प्रभाव असलेला शिर्डी लोकसभा मतदार संघ तसा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बालेकिल्ला, पण गेल्या निवडणुकीत मोदी लाटेत काँग्रेसला मोठा धक्का बसला. युतीत शिवसेनेचा भगवा फडकला. नगर जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणे ही नेहमी प्रस्थापितांच्या ऐनवेळच्या खेळीने बदलत असतात. शिवसेनेसमोर गड कायम ठेवण्यासाठी यंदा मोठे आव्हान आहे. शिर्डी (पूर्वीच्या कोपरगाव) लोकसभा मतदारसंघाचे प्रदीर्घ काळ माजी खासदार स्वर्गीय बाळासाहेब विखे यांनी नेतृत्व केले. काँग्रेसचा नेहमीच प्रभाव राहिला. स्वर्गीय शंकरराव काळे, प्रसाद तनपुरे यांनीही काँग्रेसकडून प्रतिनिधित्व केले. काँग्रेसच्या गटबाजीतून भीम बडदे यांच्या रूपाने भाजपचे कमळ फुलले. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर शिवसेनेने भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरुद्ध रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले हे काँग्रेस-राष्ट्रवादी व रिपब्लिकन आघाडीचे उमेदवार होते. आठवलेंना प्रस्थापितांचा छुपा विरोध होता. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार वाकचौरे यांना छुपी मदत झाली. अॅट्रॉसिटीचा मुद्दा गाजला. त्यातून आठवलेंचा पराभव झाला. प्रस्थापित नेत्यांना गृहीत धरणे राज्यातील नेतृत्वाला महाग पडले. असे असले तरी सहकाराचा प्रभाव ओसरू लागल्याने लोकांवरील प्रस्थापित नेतृत्वांची पकड कमी झाल्याचे स्पष्ट झाले. २०१४ च्या निवडणुकीत वाकचौरे हे प्रस्थापित नेत्यांच्या भीतीने काँग्रेसमध्ये गेले. माजी खासदार स्वर्गीय बाळासाहेब विखे यांच्यामुळे त्यांनी बदल केला. मात्र नगरच्या राजकारणात विखेविरोधी गटाच्या हेव्या-दाव्याचा झटका वाकचौरेंना बसला. त्यात मोदी लाटेमुळे शिवसेनेचे लोखंडे निवडून आले. विखे हे कुणालाही निवडून आणू शकतात. ही राजकीय धारणा मोदी लाटेने खोटी ठरविली. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, स्वर्गीय गोविंदराव आदिक, भानुदास मुरकुटे, यशवंतराव गडाख, शंकरराव कोल्हे, प्रसाद तनपुरे, माजी मंत्री मधुकर पिचड यांच्यासारखे दिग्गज नेते लोखंडेंचा विजय रोखू शकले नाहीत. त्यांच्यातील अंतर्गत धुसफूस, गटबाजी हीदेखील वाकचौरे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली. दोन निवडणुकांमुळे प्रस्थापितांना हादरे बसले आहेत. आमदार अशोक काळे यांनी लोखंडेंच्या विजयाला हातभार लावला. त्यावेळी ते शिवसेनेत होते. काळे यांचे दोन्ही काँग्रेसशी संबंध होते. त्याचा पद्धतशीर फायदा काळे यांनी लोखंडे यांच्या विजयासाठी घेतला. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील समीकरणे आता बदलली आहेत. मतदारसंघात भाजपचे बाळासाहेब मुरकुटे व स्नेहलता कोल्हे हे दोन आमदार आहेत. माजी खासदार यशवंतराव गडाख व माजी आमदार भानुदास मुरकुटे हे कुठल्याही पक्षात नाहीत. राष्ट्रवादीतून ते बाहेर आहेत. माजी खासदार प्रसाद तनपुरे व माजी आमदार अशोक काळे यांनी शिवसेनेला रामराम ठोकला असून ते राष्ट्रवादीत गेले आहेत. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना काँग्रेस पक्षात बढती मिळाली असून त्यांचे दिल्लीत वजन वाढत आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीवर होईल. खासदार लोखंडे हे कर्जत-जामखेडचे पंधरा वर्षे आमदार होते. ते मुंबईत राहात. लोकसभेच्या वेळी तेरा दिवसात मोदी लाटेत खासदार झाले. प्रस्थापित नेतृत्वाशी त्यांनी मधुर संबंध ठेवले आहेत. ते फारशी राजकीय चबढब करत नाहीत. ते मतदारसंघात तीन वर्षे फिरकलेच नाहीत. आता सक्रिय झाले. दोन वर्षांपूर्वी मुंबईतील मतदार यादीतील नाव काढून शिर्डीत टाकले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात सर्वात प्रथम लोकसभेसाठी लोखंडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी भाऊसाहेब मल्हारी कांबळे यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.
shirdi Lok Sabha Election 2019 Result
Shirdi 2019 Candidate List
Shirdi सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल
Shirdi मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ
सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी
Maharashtra अन्य मतदारसंघ
- AHMADNAGAR
- AKOLA
- AMRAVATI
- AURANGABAD-M
- BARAMATI
- BEED
- BHANDARA - GONDIYA
- BHIWANDI
- BULDHANA
- CHANDRAPUR
- DHULE
- DINDORI
- GADCHIROLI-CHIMUR
- HATKANANGLE
- HINGOLI
- JALGAON
- JALNA
- KALYAN
- KOLHAPUR
- LATUR
- MADHA
- MAVAL
- MUMBAI SOUTH
- MUMBAI NORTH
- MUMBAI NORTH CENTRAL
- MUMBAI NORTH EAST
- MUMBAI NORTH WEST
- MUMBAI SOUTH CENTRAL
- NAGPUR
- NANDED
- NANDURBAR
- NASHIK
- OSMANABAD
- PALGHAR
- PARBHANI
- PUNE
- RAIGAD
- RAMTEK
- RATNAGIRI - SINDHUDURG
- RAVER
- SANGLI
- SATARA
- SHIRDI
- SHIRUR
- SOLAPUR
- THANE
- WARDHA
- YAVATMAL-WASHIM