08 August 2020

News Flash

Shirur सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार

शहरी आणि ग्रामीण असा संमिश्र परिसर असलेल्या शिरूर मतदारसंघात मराठा आणि माळी समाजाचे प्राबल्य आहे. जिल्ह्याच्या राजकारणात शिरूर मतदारसंघ कायम चर्चेत राहिला आहे. दिलीप वळसे आणि आढळराव यांच्यात वरकरणी राजकीय संघर्ष असला तरी शिरूर लोकसभा आणि आंबेगाव विधानसभेच्या राजकारणात त्यांच्यात सामंजस्य दिसून येते. भोसरीतून अपक्ष निवडून आलेल्या आमदार लांडगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच शिरूरसाठी शड्डू ठोकले होते. नंतर मात्र त्यांनी लोकसभेऐवजी भोसरी विधानसभा लढवण्याची भूमिका घेतली. आता पक्षाने आदेश दिल्यास शिरूरमधून लढू, असे विधान त्यांनी केले आहे. सन २००९ मध्ये शरद पवारांनी शिरूर लढवण्याच्या दृष्टीने चाचपणी केली होती. मात्र त्यांनी माढा लोकसभेचा पर्याय निवडला. अलीकडेच, अजित पवारांनी शिरूरमधून निवडणूक लढवण्याची भाषा केली. प्रत्यक्षात ते शिरूरमध्ये फिरकणार नाहीत. त्यांचा निशाणा कोणावर होता, याची राष्ट्रवादी वर्तुळात सर्वानाच माहिती आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी शिरुरमधून लोकसभेची निवडणूक लढवावी, असे राष्ट्रवादीतील नेत्यांचे मत आहे. अजित पवार यांनी तसे जाहीरपणे यापूर्वी मत व्यक्त केले होते. पण दिलीपराव लोकसभेची निवडणूक लढविण्याचे टाळतात. राष्ट्रीय साखर कारखाना संघाचे अध्यक्ष या नात्याने राष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा त्यांना अनुभव मिळाला आहे. या पाश्र्वभूमीवर त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी, असे मत पक्षात मांडले जाते. खासदार आढळराव चौथ्यांदा रिंगणात आहेत. पूर्वी ते वळसे पाटलांचे निकटवर्तीय होते. पुढे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. आढळराव शिवसेनेत गेले. सन २००४च्या लोकसभा निवडणुकीत आढळरावांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन खासदार अशोक मोहोळ यांचा पराभव केला. त्यानंतर २००९च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार विलास लांडे यांचा पावणेदोन लाख मतांनी पराभव केला. गेल्या २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या देवदत्त निकम यांचा तीन लाखांच्या फरकाने पराभव करत आढळरावांनी हॅट्ट्रिक साधली. आतापर्यंतच्या प्रवासात आढळरावांना भाजपशी असलेल्या युतीचा फायदाच झाला. यंदा भाजपशी युती न झाल्यास त्यांच्यापुढे मोठे आव्हान उभे राहणार आहे. राष्ट्रवादीला शिवसेनेकडून झालेल्या सलग तीन पराभवाचे उट्टे काढायचे आहे. भाजपला स्वतंत्रपणे लढण्याची वेळ आल्यास आमदार लांडगे यांच्याकडे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जाते. भाजप-शिवसेनेची युती होणार की नाही, यावर शिरूरच्या लढतीचे स्वरूप ठरणार आहे. पुणे जिल्ह्यात लोकसभेचे चार मतदारसंघ आहेत. पुणे हा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. चारपैकी बारामती लोकसभा मतदारसंघ वगळता राष्ट्रवादीला मावळ किंवा शिरूरमध्ये यश संपादन करता आले नाही. पुणे शहर हा मतदारसंघ आघाडीत कायम काँग्रेसच्या वाटय़ाला जातो. आढळराव यांच्या विरोधात तगडा उमेदवार उभा केला जात नाही. हेच आढळराव यांच्या पथ्यावर पडते.

shirur Lok Sabha Election 2019 Result

Name
Party
Status
Amol Ramsing Kolhe
NCP
WON
*The election result data is provided by C-Voter on a real time basis and is not altered or moderated by loksatta.com in any way.

Shirur 2019 Candidate List

Candidate Name
Party
Criminal Cases
Education
Age
Assets / Laibilities (Rs.)
Aadhalrao Shivaji Dattatrey
SHS
10
Others
64
29.02 Cr / 4.99 Cr
Amol Ramsing Kolhe
NCP
0
Graduate Professional
38
4.34 Cr / 14.88 Lac
Balasaheb Jaysingh Ghadage
IND
1
10th Pass
59
1.32 Cr / 6.15 Lac
Bhau Ramchandra Aadagale
IND
0
10th Pass
59
1.05 Cr / 35 Thousand
Chhaya Prabhakar Solanke
IND
0
Graduate
29
78.22 Lac / 7.5 Lac
Gangadhar Nathu Yadav
IND
0
Post Graduate
43
21.88 Lac / 12 Lac
Ghare Mohan Damodar
Baliraja Party
0
8th Pass
52
1.4 Cr / 40 Lac
Kagadi Jamirkhan Afzal
BSP
4
Graduate
44
4.28 Cr / 57 Lac
Nitin Muralidhar Kuchekar
Bharat Prabhat Party
0
Graduate
36
11.5 Thousand / 97.7 Lac
Ovhal Rahul Raghunath
Vanchit Bahujan Aaghadi
2
8th Pass
36
12 Lac / 60 Thousand
Raeesa Shakil Shaikh
Bhartiya Kisan Party
0
Post Graduate
45
51.9 Lac / 36.5 Lac
Samshad Anwar Ansari
IND
0
12th Pass
30
44.36 Lac / 56 Lac
Sanjay Baba Bansode
Bhartiya Bahujan Kranti Dal
0
8th Pass
42
1.54 Cr / 1.7 Lac
Sanjay Laxman Padwal
bns
0
10th Pass
50
2.25 Lac / 0
Shahid Farukh Shaikh
IND
0
5th Pass
38
2.9 Lac / 0
Shashikant Rajaram Desai
Hamari Apni Party
0
12th Pass
48
63.27 Lac / 0
Shivaji Uttamrao Pawar
IND
0
12th Pass
31
47.73 Lac / 23.55 Lac
Shrikant Nivrutti Chabukswar
BMUP
0
Post Graduate
53
1.1 Cr / 9.4 Lac
Somnath Hiraman Mali
Bahujan Republican Socialist Party
6
8th Pass
47
56.3 Thousand / 75 Thousand
Sonali Thorat
IND
0
8th Pass
35
33.01 Lac / 9.2 Thousand
Vahida Shahenu Shaikh
IND
0
10th Pass
38
2.05 Lac / 4 Lac
Vikas Rajaram Aashtul
IND
0
8th Pass
41
23 Thousand / 0
Vinod Vasant Chandgude
IND
1
Post Graduate
34
44.85 Lac / 13 Lac

Shirur सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल

* Bye Election Result
Year
Winner
Party
Vote%
2009
Adhalrao Shivaji Dattatray
SHS
57.54%
2014
Adhalrao Shivaji Dattatrey
SHS
59.06%
2019
Dr. Amol Ramsing Kolhe
NCP
49.17%

Shirur मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

Constituency Siting MLA Party
JUNNARSharaddada Bhimaji SonavaneMNS
AMBEGAONDilip Dattatray Walse PatilNCP
KHED ALANDIGore Suresh NamdeoSHS
SHIRURPacharne Baburao KashinathBJP
BHOSARIMahesh (dada) Kisan LandgeIND
HADAPSARTilekar Yogesh KundalikBJP

सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी

Just Now!
X