Thackeray Group Candidate List : विधानसभेची निवडणूक (Vidhan Sabha Election 2024) जाहीर झाल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. आज (२६ ऑक्टोबर) शिवसेना (ठाकरे) पक्षाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. याआधी शिवसेना ठाकरे गटाकडून ६५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. यानंतर आज १५ उमेदवारांची घोषणा ‘सामना’मधून करण्यात आली आहे. यामध्ये धुळे शहर, चोपडा, जळगाव शहर, बुलढाणा, दिग्रस, हिंगोली, देवळाली, श्रीगोंदा, कणकवली, भायखळा, शिवडी, वडाळा, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, देवळाली, परतूर या मतदारसंघाचा सहभाग आहे.

कोणाला कोणत्या मतदारसंघातून मिळाली संधी?

शिवडीमधून अजय चौधरी, धुळे शहर-अनिल गोटे, चोपडा-राजू तडवी, जळगाव शहर-जयश्री सुनील महाजन, बुलढाणा-जयश्री शेळके, दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल, हिंगोली-रूपाली राजेश पाटील, परतूर-आसाराम बोराडे, देवळाली-योगेश घोलप, कल्याण पश्चिम-सचिन बासरे, कल्याण पूर्व-धनंजय बोडारे, वडाळा-श्रद्धा श्रीधर जाधव, भायखळा-मनोज जामसुतकर, श्रीगोंदा-अनुराधा राजेंद्र नागावडे, कणकवली- संदेश भास्कर पारकर यांचा समावेश आहे.

uddhav thackeray
Maharashtra Vidhan Sabha : ठाकरे गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, पाहा सर्व ८३ शिलेदारांची नावं एकाच क्लिकवर
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Uddhav thackeray
Uddhav Thackeray First List : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर; ६५ उमेदवारांची नावे एका क्लिकवर!
Maharashtra assembly election 2024 BJP releases third list of 25 candidates
BJP 3rd Candidate List: भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; ३ विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं!
Congress Candidates List Nana Patole
Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर, कोल्हापूरचा उमेदवार बदलला! आतापर्यंत ‘इतके’ शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात
NCP Sharad Pawar Third Candidate List
NCP Sharad Pawar Third Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंच्या विरोधात दिला ‘हा’ तगडा उमेदवार
Raj thackeray sixth List
MNS Candidates List : मनसेची सहावी यादी जाहीर; मुंबई-ठाण्यातील महत्त्वाच्या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा!
Maharashtra assembly election 2024 Sharad Pawar NCP releases fourth list of 7 candidates
Sharad Pawar NCP 4th Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर; सात उमेदवारांची घोषणा, कोणाला कुठून मिळाली संधी?

हेही वाचा : Amit Thackeray : “उद्धव ठाकरेंसारख्या लोकांपासून मी चार हात लांब, कारण..”, अमित ठाकरेंचं वक्तव्य

कोणत्या १५ उमेदवारांची घोषणा? वाचा यादी!

मतदारसंघाचे नावउमेदवार
शिवडीअजय चौधरी
धुळे शहरअनिल गोटे
चोपडाराजू तडवी
जळगाव शहरजयश्री सुनील महाजन
बुलढाणाजयश्री शेळके
दिग्रसपवन श्यामलाल जयस्वाल
हिंगोलीरुपाली राजेश पाटील
परतूरआसाराम बोराडे
देवळालीयोगेश घोलप
१०कल्याण पश्चिमसचिन बासरे
११कल्याण पूर्वधनंजय बोडारे
१२वडाळाश्रद्धा श्रीधर जाधव
१३भायखळामनोज जामसुतकर
१४श्रीगोंदाअनुराधा राजेंद्र नागावडे
१५कणकवलीसंदेश भास्कर पारकर

महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद सुरु होते. यासंदर्भात महाविकास आघाडीतील नेत्यांच्या अनेक बैठकाही पार पडल्या. त्यानंतर ८५-८५-८५ जागांचा फॉर्म्युला समोर आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा या फॉर्म्युल्यात बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली. यानंतर आता ९०-९०-९० चा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी आणि कॉग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या याद्या कधी येतात? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader