अमेठी मतदारसंघातून भाजपा नेत्या स्मतृी इराणी यांचा पराभव झाला आहे. काँग्रेस नेते किशोरी लाल शर्मा यांनी स्मृती इराणींनाच दारुण पराभव केला आहे. २०१९ मध्ये राहुल गांधींना पराभूत करणाऱ्या स्मृतींना दुसऱ्यांदा अमेठीच्या जनतेने संधी दिली नाही. या पराभवाबद्दल इराणी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "भाजपाचे सर्व कार्यकर्ते आणि समर्थक, ज्यांनी निष्ठेने मतदारसंघासाठी काम केलं आणि पक्षाची सेवा केली आहे, त्यांचे मी आभार मानते. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आभारी आहे की त्यांच्या सरकारने ३० वर्षांची प्रलंबित कामं फक्त पाच वर्षात पूर्ण केली. जे जिंकले त्यांचं मी अभिनंदन करते, मी अमेठीच्या जनतेची सेवा करत राहीन," असं स्मृती इराणी पराभूत झाल्यानंतर पत्रकार परिषदेत म्हणाल्या. अमेठीत स्मृती इराणी काँग्रेसच्या नेत्याकडून पराभूत; विजयी उमेदवाराबाबत राहुल गांधी म्हणाले, “भाजपाच्या लोकांना…” "आम्ही संघटना मजबूत करू. आम्ही निष्ठेने या भागातील लोकांची सेवा केली आहे. मी परिसरातील प्रत्येक गावात जाऊन काम केलं आहे. मी माझ्या आयुष्यातील १० वर्षे या भागासाठी दिली," असंही स्मृती इराणी म्हणाल्या. पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिल्यावर स्मृती इराणींनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. "विजय आणि पराभवात जे माझ्या पाठीशी उभे राहिले त्यांची मी सदैव ऋणी आहे. आज जे सेलिब्रेशन करत आहेत त्यांचे अभिनंदन. आणि "How's the josh?" विचारणाऱ्यांना मी म्हणते- it’s still high, Sir," असं स्मृती इराणींनी पोस्टमध्ये लिहिलंय. “मी स्मृती इराणींविरोधात निवडणूक लढलो नाही, तर…”; अमेठीतील विजयी काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया २०१९ मध्ये प्रचंड मताधिक्याने विजयी झालेल्या स्मृती इराणींना आपला गढ राखता आला नाही. १० वर्षांपूर्वी २०१४ मध्ये त्या या मतदारसंघातून पराभूत झाल्या होत्या, त्यानंतर २०१९ मध्ये त्यांना इथे विजय मिळवता आला. पण आता मात्र अमेठी मतदारसंघातील जनतेने त्यांना नाकारलं आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचे नेते किशोरी लाल शर्मा विजयी झाले आहेत. राज्यात भाजपाचा पराभव का झाला? रामदास आठवलेंनी सांगितलं कारण; म्हणाले, “उद्धव ठाकरे व शरद पवारांना…” किशोरी लाल शर्मा यांनी मतमोजणी चालू झाल्यापासूनच आघाडी घेतली होती, ती आघाडी त्यांनी कायम ठेवली आणि स्मृती इराणींचा दारूण पराभव केला. काँग्रेसचे किशोरी लाल शर्मांनी यांनी स्मृती इराणी यांचा तब्बल १ लाख १८ हजार ४७१ मतांनी पराभूत केलं आहे.