सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात १३ जागांसाठी मतदान झाले. यामध्ये मुंबई, ठाणे, नाशिक या महत्त्वाच्या शहरांचा सहभाग होता. मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिक उत्साहाने घराबाहेर पडले. भर उन्हात उभं राहूनही त्यांनी मतदान केलं. पण निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक मतदार मतदान न करताच घरी परतले. आग ओकणारा सूर्य डोक्यावर आलेला असताना आणि निवडणूक आयोगाच्या संथ वृत्तीमुळे मतदार नाराज होऊन मतदान न करताच माघारी परतले. त्यामुळे मुंबईतील मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

“मतदार कंटाळतील, रांगेतून निघून जातील अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी राबवली का? अशी शंका वाटावी असं चित्र काल पाहायला मिळालं. मला प्रांतीय किंवा जातीयवाद करायचा नाही. पण जिथे जिथे शिवसेनेला भरघोस मतदान होऊ शकेल तिथंच कासवगतीने यंत्रणा चालू होती. भाजपाच्या किंवा त्यांच्या इतर लोकांना जिथं टक्का वाढू शकतो तिथं कोणत्याही अडचणीशिवाय मतदान घडवण्यात आलं”, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

Neet action against Subodh Kumar Singh after NET paper leak
‘एनटीए’प्रमुखांची उचलबांगडी; नीट, नेट पेपरफुटीनंतर सुबोध कुमार सिंह यांच्यावर कारवाई
Clarify stand on Jitendra Awhads plea to consolidate all offences High Court orders govt
श्रीरामाबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य : सर्व गुन्हे एकत्र करणाच्या आव्हाडांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा, उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश
former rto commissioner Mahesh zagade
‘परिवहन’च्या कामकाजावर माजी आयुक्तांचेच बोट! मध्यस्थांसाठी यंत्रणा असल्याचा गंभीर आरोप
Mumbai Municipal Corporation, bmc, Mumbai Municipal Corporation to Resume Road Concreting Projects, Post Elections, bmc Work Orders, road construction,
मुंबई : रस्तेकामांच्या प्रक्रियेला वेग, महापालिका नव्या कामांची निविदा प्रक्रिया पावसाळ्यात पूर्ण करणार
Kangana Ranuat
कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावणाऱ्या कॉन्स्टेबलच्या भावाची प्रतिक्रिया; म्हणाले, “माझी बहीण…”
Nitish Kumar Narendra Modi NDA Government Formation
कधी इकडे, कधी तिकडे! नितीश कुमार यांना ‘पलटूराम’ संबोधन मिळण्याची ‘ही’ आहेत कारणे
Kisan Kathore, Bhiwandi,
भिवंडीत बाळ्यामामा म्हात्रेंच्या विजयापेक्षा किसन कथोरेंचीच चर्चा अधिक
lokmanas
लोकमानस: नरेंद्र मोदी यांचा करिश्मा संपला

हेही वाचा >> Lok Sabha Election 2024 : उत्साहाला घोळाच्या झळा! संथ मतदान प्रक्रियेमुळे केंद्रांवर लांबच लांब रांगा; मतदार संतप्त

मोदींचं डिजिटल इंडिया फेल गेलं

“आम्ही जागृत होतो त्यामुळे त्यांना ईव्हीएम हॅक करता आले नाहीत, पैसे वाटप आम्ही पकडलं, मग काय करायचं? मग अशा पद्धतीने यंत्रणा ढिली करायची. लोकांचा छळ करायचा. चार-चार तास लोकांना रांगेत उभं करायचं. ही डिजिटल इंडिया आहे ना? याचा अर्थ मोदींचं डिजिटल इंडिया फेल गेलं. फेल करण्यात आलं. निवडणुका जिंकण्यासाठी शेवटपर्यंत अशापद्धतीने यंत्रणा राबवली तरीही मतदारांवर फरक पडला नाही. आम्ही शेवटपर्यंत आवाहन केलं की रांग सोडू नका. पहाट झाली तरी चालेल. त्यामुळे अनेकठिकाणी रात्री ११ पर्यंत मतदान होऊ शकले. परंतु, अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही हे दुर्दैवाने आपल्या लोकशाहीत घडलं”, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पराभव होणार म्हणून शेवटचा डाव टाकला

“हा लोकशाही आणि निवडणुकीचा अपमान आहे. आम्ही अनेक ठिकाणी जाऊन आलो, पाहून आलो. महाराष्ट्रातील १३ मतदारसंघात अशा पद्धतीने यंत्रणा बिघडवण्यात आली. १३ ही ठिकाणी भाजपाच्या आणि मित्र पक्षांचा पराभव होणार याची खात्री असल्याने शेवटचा डाव टाकण्यात आला. तरीही माझी खात्री आहे की इंडिया आघाडीच जिंकणार”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यंत्रणा भ्रष्ट करण्यात मिंधे, भाजपा आणि अजित पवार गट माहिर

“निवडणूक आयोगाला हाताशी घेऊन यंत्रणा भ्रष्ट करणे यात भाजपा, मिंधे गट, अजित पवार माहीर आहेत. मशालीला मतदान होण्याची शक्यता होती तिथं यंत्रणा बिघडवण्यात आली. मुंब्र्यात एका तासांत फक्त ११ च मतदारांनी मतदान टाकलं. मतदान प्रक्रियेवर हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या मनात पराभवाची भीती आहे. ही चूक आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणली आहे”, असंही ते म्हणाले.