Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates: लोकसभा निवडणुकीत देश पातळीवर एनडीएला बहुमत मिळालं असलं, तरी त्यांच्या जागांमध्ये मोठी घट झाल्याचं दिसत आहे. एकट्या भाजपाच्या तब्बल ६३ जागा कमी झाल्याचं दिसून आलं आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात महायुतीला फटका सहन करावा लागला असून त्यांच्या वाट्याला फक्त १७ जागा आल्या आहेत. अजित पवार गटानं ४ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. मात्र, त्यांना सुनील तटकरेंच्या रुपात एकाच ठिकाणी विजय मिळाला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक निकालांवरून नव्याने राजकीय सुंदोपसुंदी सुरू होण्याची शक्यता असताना सुप्रिया सुळेंनी या निकालावर सविस्तर भाष्य केलं आहे.

अजित पवारांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रातील सत्तासमीकरणं बदलली. अजित पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधील ४० आमदारही गेले. सुनील तटकरेही त्यांच्यासोबत गेले. तसेच, निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पक्षनाव अजित पवारांना देण्याचा निर्णय दिला. या सर्व पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकांमध्ये एकीकडे शरद पवार गटाचे ८ उमेदवार खासदार म्हणून लोकसभेत जात असताना दुसरीकडे अजित पवार गटाकडून सुनील तटकरे विजयी झाले आहे. यासंदर्भात आज सुप्रिया सुळेंना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारताच त्यांनी थेट हात जोडून उत्तर दिलं.

Supriya Sule
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “भाजपा खरं बोलणार असेल तर मी सहा प्रश्न विचारते, त्याची उत्तरं द्या”
this is a real sanskar
संस्कारांची शिदोरी! चिमुकल्याला खायला ब्रेड दिला पण त्याने पहिला घास कुत्र्याला भरवला, पाहा VIDEO
a child told a reason of crying to his father
“बाबा, रडल्याशिवाय तुम्ही घेऊन देत नाही” चिमुकल्याने सांगितले रडण्यामागचे कारण, VIDEO व्हायरल
Don't believe these 5 myths about IVF
ईशा अंबानीने IVF द्वारे जुळ्या मुलांना दिला जन्म: IVFबाबत या ५ गैरसमजांवर विश्वास ठेवू नका
an old lady feeding sugar to ants show mercy and kindness to animals and birds
मुंगीला साखर खायला घालतेय आजी; नेटकरी म्हणाले, “प्राणी मात्रांवर दया करणारी ही शेवटची पिढी”
aishwarya narkar replied to netizen
“नवरा फक्त नाचताना असतो वाटतं…”, म्हणणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “आवाज किती तुमचा…”
Nawazuddin Siddiqui
“भांग प्यायल्यावर मला…”, नवाजुद्दीन सिद्दिकीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, “त्या गोष्टींना प्रोत्साहन देऊ इच्छित नाही; पण…”
nagarjuna apologize after viral video of bodyguard pushing his disabled fan at airport
दिव्यांग चाहत्याला ढकललं अन्…, नागार्जुन यांनी ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यावर मागितली माफी, म्हणाले, “मी त्या गृहस्थाची…”

निलेश लंकेंच्या स्वीय सहाय्यकावर जीवघेणा हल्ला, पारनेरमध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात

“सल्ला देत नाही, घेते!”

अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. आता लोकसभा निवडणूक निकालांनंतर त्यांचा निर्णय चुकल्याचं पुन्हा एकदा बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर आता निकालांनंतर अजित पवारांना काय सल्ला देणार? असा प्रश्न पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हात जोडून उत्तर दिलं.

“मी एक सुसंस्कृत मराठी मुलगी आहे. आपल्यापेक्षा वयाने, कर्तृत्वाने आणि नात्याने जे मोठे असतात, त्यांना सल्ला द्यायचा नसतो, त्यांच्याकडून सल्ला घ्यायचा असतो”, असं त्या म्हणाल्या.

Video: “…तर अधिक कठीण काळ येऊ शकतो”, लोकसभा निकालांवर योगेंद्र यादवांचं मोठं विधान; म्हणाले, “मोदी-शाहांना…”!

“पिपाणी नसती तर साताऱ्यात जिंकलो असतो”

सातारा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा विजय झाला, तर शरद पवार गटाकडून उभे असलेले उमेदवार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला आहे. साताऱ्यात दुसऱ्या उमेदवाराला मिळालेल्या पिपाणी चिन्हामुळे पराभव झाल्याचा दावा जयंत पाटील व शशिकांत शिंदे या दोघांनी केला आहे. सुप्रिया सुळेंनीही त्या दाव्याला समर्थन दिलं आहे. “जर पिपाणी नसती, तर आमची साताऱ्याची सीट आली असती. दिंडोरीलाही पिपाणीनं मोठी मतं घेतली. हा रडीचा डाव आहे”, असं त्या म्हणाल्या.