05 March 2021

News Flash

Thane सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार

लोकसभेच्या १९९६मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने ठाणे लोकसभा मतदारसंघ युतीत भाजपकडून हिसकावून घेतला. तब्बल दोन दशकांनंतर भाजपने ठाणे जिल्ह्य़ात शिवसेनेसमोर आव्हान उभे केले. युती झाल्याने शिवसेनेने सुटकेचा नि:श्वास टाकला असला तरी खासदार राजन विचारे यांची खासदार म्हणून यथातथाच कामगिरी आणि ‘उच्चशिक्षित विरुद्ध अल्पशिक्षित’ अशा प्रचाराने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. ठाणे मतदारसंघ हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता, पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असून, भाजपनेही हातपाय पसरले आहेत. मीरा-भाईंदरमधील मारवाडी, गुजराती आणि जैन समाजाचे प्राबल्य असल्याने या भागात भाजपचे वर्चस्व आहे. सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत. ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असली तरी ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात महानगरपालिका निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली होती. तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा पराभव करीत भाजपचा आमदार निवडून आला होता. यामुळे शिवसेनेला आता तसे सोपे राहिलेले नाही. फक्त युती झाल्याने शिवसेनेसाठी वातावरण अनुकूल आहे. शिवसेनेचे राजन विचारे विरुद्ध राष्ट्रवादीचे आनंद परांजपे अशी लढत होणार आहे. विचारे यांनी महापौर, आमदार, खासदार अशी विविध पदे भूषविली, पण त्यांची कामगिरी फार काही चांगली झालेली नाही. रमजानच्या काळात उपवास करणाऱ्या एका मुस्लीम कर्मचाऱ्याला नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात बळेबळे चपाती भरविल्याबद्दल विचारे टीकेचे धनी झाले होते. रामभाऊ म्हाळगी, राम कापसे, प्रकाश परांजपे या उत्कृष्ट संसदपटूंची ठाण्याला थोर परंपरा होती. पण आधी संजीव नाईक आणि नंतर विचारे यांच्या काळात ही परंपरा खंडित झाली. राष्ट्रवादीत गणेश नाईक किंवा त्यांचे पुत्र माजी खासदार संजीव नाईक यांनी निवडणूक लढवावी, असा राष्ट्रवादीचा आग्रह होता. पण बदलत्या राजकीय परिस्थितीत नाईक पितापुत्राने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून पळच काढला. शिवसेनेत असताना ठाणे आणि कल्याणची खासदारकी भूषविलेल्या आनंद परांजपे यांना पक्षाने रिंगणात उतरविले आहे. एक सुशिक्षित आणि आश्वासक चेहरा राष्ट्रवादीने दिला आहे. सुशिक्षित विरुद्ध अल्पशिक्षित मागील पाच वर्षांतील बदललेली राजकीय गणिते पाहाता सद्यस्थितीत या मतदारसंघातून शिवसेनेला आव्हान देणे सोपे नाही, याची पुरेपूर कल्पना आघाडीच्या नेत्यांना आहे. ते सोपे असते तर नाईक कुटुंबीयांनी उमेदवारी परांजपे यांच्याकडे जाऊ दिली नसती. असे असले तरी खासदार म्हणून विचारे यांची गेल्या पाच वर्षांतील कामगिरी पाहता भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये त्यांच्याविषयी टोकाची नाराजी आहे. ठाण्यात काम करताना विचारे नगरसेवकाच्या भूमिकेतून अजून बाहेरच आलेले नाहीत, असा आक्षेप भाजपचे नेते अगदी उघडपणे घेताना दिसतात. शिवसेनेतही त्यांच्या कामगिरीविषयी फारसे सकारात्मक चित्र नाही. नवी मुंबई, मीरा भाईदर या शहरांमध्ये तर खासदारांची कामगिरी अगदी यथातथाच राहिली आहे. संघटनात्मक कार्यक्रमांना न चुकता हजर रहाणे हीच त्यांची जमेची बाजू असली तरी युतीची घोषणा होताच राष्ट्रवादीच्या नेत्यांचे खचलेले मनोबल ही बाबही त्यांच्या पथ्यावर पडणारी आहे. या निवडणुकीत आनंद परांजपे यांना रिंगणात उतरवून राष्ट्रवादीने खरे तर सुशिक्षित चेहऱ्याला संधी दिली आहे. कल्याण, ठाणे तसेच उपनगरीय रेल्वे प्रश्नावर असलेला गाढा अभ्यास ही परांजपे यांची जमेची बाजू. यापूर्वी लोकसभेत त्यांनी केलेली अभ्यासपूर्ण भाषणे, मांडलेले प्रश्न यामुळे राष्ट्रवादीने खासदार कसा असावा..सुशिक्षित की अल्पशिक्षित असे आवाहन आतापासूनच मतदारांना सुरू केले आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांनाही फेसबुक तसेच सोशल मिडीयाद्वारे राष्ट्रवादीच्या या आवाहनाला साथ देत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला डिवचणे सुरू केले आहे. ही निवडणूक स्थानिक मुद्यांभोवती फिरावी असाही एक प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरू केला आहे. मात्र, युतीमुळे विजय आपलाच होणार या आत्मविश्वासात असलेले शिवसेनेचे नेते या प्रचारांना उत्तर देण्याऐवजी सभांमधून लाखांच्या मताधिक्याची भाषा करताना दिसत आहेत. भाजपचे स्थानिक नेते आमच्यासोबत नसले तरी त्यांचा मतदार आमच्या पाठीशी आहे, असेही काही शिवसेनानेते खासगीत बोलताना दिसत आहेत.

thane Lok Sabha Election 2019 Result

Name
Party
Status
Rajan Baburao Vichare
SS
WON
*The election result data is provided by C-Voter on a real time basis and is not altered or moderated by loksatta.com in any way.

Thane 2019 Candidate List

Candidate Name
Party
Criminal Cases
Education
Age
Assets / Laibilities (Rs.)
Ajay Baburam Gupta
Bharat Jan Aadhar Party
0
Graduate
48
4.62 Cr / 2.23 Cr
Anand Prakash Paranjpe
NCP
11
Post Graduate
45
11.73 Cr / 5.22 Cr
Bramhadev Rambakshi Pandey
Sarvodaya Bharat Party
0
12th Pass
36
10.54 Lac / 13 Thousand
Digambar Yalappa Bansode
IND
0
5th Pass
55
16.4 Lac / 0
Dilip Prabhakar Aloni
ABJS
0
Post Graduate
63
1.14 Cr / 0
Dr. Akshay Anant Zodge
IND
0
Post Graduate
32
7.85 Cr / 1.55 Cr
Hemant Kisan Patil
ssrd
0
8th Pass
45
2.71 Cr / 2.45 Lac
Madhavilata Dineshkumar Maurya
Jan Adhikar Party
0
12th Pass
42
99.7 Lac / 84.5 Lac
Mallikarjun Saybanna Pujari
Vanchit Bahujan Aaghadi
0
Literate
47
47 Thousand / 1.31 Cr
Omkar Nath Tiwari
HND
0
Graduate
32
8.41 Lac / 1.89 Lac
Omprakash Shrilal Pal
IND
1
10th Pass
35
32.1 Lac / 0
Pokharkar Vinod Laxman
IND
1
10th Pass
35
2.55 Lac / 0
Prabhakar Anant Jadhav
Bahujan Republican Socialist Party
0
10th Pass
63
98.88 Lac / 0
Rajan Baburao Vichare
SHS
9
12th Pass
57
18.14 Cr / 5.41 Cr
Rajesh Sidhanna Kamble
BMUP
0
Graduate
40
30 Thousand / 0
Rajeshchanna Baijnath Jaiswar
BSP
0
10th Pass
48
40.88 Lac / 21.09 Lac
Ramesh Kumar Shrivastav
IND
0
5th Pass
63
60.15 Lac / 0
Shubhangi Vidyasagar Chavan
IND
0
8th Pass
42
19.41 Lac / 9.5 Lac
Subhashchandra Ratandeo Jha
SVPP
0
Graduate
50
1.23 Cr / 1.11 Lac
Sudhakar Narayan Shinde
APoI
1
Graduate
65
1.72 Cr / 0
Surendrakumar Jain
NAP
0
10th Pass
50
1.04 Cr / 0
Usman Moosa Shaikh
Bahujan Maha Party
0
10th Pass
47
3 Lac / 50 Thousand
Vitthal Natha Chavan
IND
0
8th Pass
38
/ 0

Thane सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल

* Bye Election Result
Year
Winner
Party
Vote%
1999
Prakash Paranjpe
SHS
43.22%
2004
Paranjape Prakash Vishvanath
SHS
48.08%
2009
Dr.sanjeev Ganesh Naik
NCP
40.14%
2014
Vichare Rajan Baburao
SHS
56.48%
2008*
Anand Prakash Paranjpe
SS
52.02%
2019
Rajan Baburao Vichare
SHS
63.3%

Thane मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

Constituency Siting MLA Party
MIRA BHAYANDARNarendra MehtaBJP
OVALA - MAJIWADAPratap Baburao SarnaikSHS
KOPRI-PACHPAKHADIEknath Sambhaji ShindeSHS
THANEKelkar Sanjay MukundBJP
AIROLISandeep Ganesh NaikNCP
BELAPURManda Vijay MhatreBJP

सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी

Just Now!
X