ZP Elections Results : जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल काय लागणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. दरम्यान २०१७ मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यात सोलापूरमध्ये काय चित्र होतं आपण जाणून घेणार आहोत. सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या होत्या. या पक्षाने ६८ पैकी २३ जागांवर विजय मिळवला. तर भाजपा तेव्हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. २०१७ मध्ये १० महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांसाठी निवडणूक पार पडली होती. यातल्या सोलापूरचा निकाल कसा लागला हे आपण जाणून घेणार आहोत.
सोलापूर जिल्हा परिषद- अंतिम निकाल
एकूण जागा – ६८
राष्ट्रवादी – २३
भाजप – १४
काँग्रेस – ७
शिवसेना – ५
इतर – १९
सोलापूरमध्ये किती गट आणि कुणाला किती जागा मिळाल्या?
सोलापूरमध्ये १९ जागा या वेगवेगळ्या गटांनी मिळवल्या आहेत ही बाब विशेष म्हटली पाहिजे. कारण या जागा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या राष्ट्रवादीच्या जवळ जाणाऱ्या तर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या भाजपाहून अधिक आहेत.
दीपक साळुंखे आणि गणपतराव देशमुख यांच्या गटाला ६ जागा
परिचारक गटाला ३ जागा जिंकता आल्या
महाडिक गटाने २०१७ मध्ये ३ जागा जिंकल्या
समाधान अवताडे गटाने ३ जागा जिंकल्या
शहाजीबापू पाटील यांच्या गटाने २ जागा जिंकल्या
संजय शिंदेंच्या गटाने २ जागा जिंकल्या
सिद्रामप्पा पाटील यांच्या गटाने १ जागा जिंकली.
अशा एकूण १९ जागा या विविध गटांनी जिंकल्या आणि ही सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी बाब ठरली यात शंकाच नाही.
सोलापूर जिल्ह्याचा इतिहास थोडक्यात
सध्याचा सोलापूर जिल्हा हा पूर्वी अहमदनगर (आत्ताचे अहिल्यानगर), पुणे व सातारा या जिल्ह्याचा भाग होता. इस. १८३८ ला सोलापूर हा त्यावेळच्या अहमदनगरचा उपजिल्हा बनला. त्यामध्ये बार्शी, मोहोळ, माढा, करमाळा, इंडी, हिप्परगी आणि मुद्देबिहाळ हे उपविभाग होते. इ स वी सन १८६४ मध्ये हा उपविभाग काढून टाकण्यात आला. इ स वी सन १८७१ मध्ये सोलापूर, बार्शी, मोहोळ, माढा आणि करमाळा हे उपविभाग व सातारा जिल्ह्यातील पंढपूर, सांगोला उपविभाग एकत्र करून सोलापूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली व इसवी सन १८७५ मध्ये माळशिरस हा उपविभाग देखील सोलापूर जिल्ह्याला जोडण्यात आला. १९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेनुसार सोलापूरचा समावेश मुंबई राज्यात करण्यात आला होता. पण १९६० मध्ये महाराष्ट्राचा एक जिल्हा म्हणून सोलापूरला ओळख मिळाली.

