उत्तराखंडमध्ये निवडणूक होण्यापूर्वी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील एका प्रचार सभेला संबोधित केले. त्यानंतर आदित्यनाथ म्हणाले की, राष्ट्रीय सुरक्षेसाठी” उत्तराखंडमध्ये त्यांच्या पक्षाचं सरकार आवश्यक आहे. तसंच त्यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावरही टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यांनी विरोधी काँग्रेस पक्षावर हल्ला करत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली आणि म्हटलं की काँग्रेसला नष्ट करण्यासाठी दोन भावंडं पुरेशी आहेत.“काँग्रेस संपवायला कुणाचीही गरज नाही. काँग्रेसला नष्ट करण्यासाठी दोन भावंडं पुरेशी आहेत. पंजाबमध्ये काँग्रेस संपली, आता उत्तर प्रदेशातही संपेल”, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आरोप केला की काँग्रेस उत्तराखंडची देवाची भूमी ही ओळख नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. “त्यांनी राज्यात मुस्लीम विद्यापीठ उभारण्याचं आश्वासन दिले आहे. यावरून त्यांची मानसिकता दिसून येते,” असा दावा त्यांनी केला. मात्र, काँग्रेस नेते हरीश रावत यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन्ही ठिकाणी भाजपाच्या विजयाबद्दल आत्मविश्वास व्यक्त करत ते म्हणाले, “उत्तर प्रदेशातील पहिल्या टप्प्यातील मतदानात भाजप २०१७ च्या विजयाची पुनरावृत्ती करेल. महिला, तरुण आणि ज्येष्ठांनी भाजपला मतदान केलं आहे. लोकांचा उत्साह पाहून मी म्हणू शकतो की उत्तर प्रदेशात भाजपा ३०० जागांचा आकडा पार करेल.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two siblings are enough to destroy congress says up cm yogi adityanath
First published on: 14-02-2022 at 18:53 IST