गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना रायगडावरील टकमक टोक दाखवायचं आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासह शिंदे गटावर केली आहे. तसेच रेल्वेत कुणाची ओळख असेल तर त्यांनी मला २३ तारखेचं गुवाहाटीचं तिकीट काढून द्यावं, कारण एकाला तिकडे पाठवायचं आहे. मग त्याने तिथे झाडं मोजत बसावं, असा टोलाही त्यांनी लगावला. सांगोल्यात आज शिवसेनेची ( उद्धव ठाकरे ) प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गट तसेच अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“मी गद्दारांच्या छाताड्यांवर पुन्हा भगवा गाडायला आहे. महाराष्ट्राचा इतिहास आहे. महाराष्ट्र कधीही गद्दारांना क्षमा करत नाही. मला गद्दारांना सांगायचं की त्यांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, पण त्यांनी रायगडावरचं टकमक टोक बघितलं नाही. ते त्यांना २३ तारखेला दाखवायचं आहे”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली. रेल्वेत कुणाची ओळख असेल तर त्यांनी मला २३ तारखेचं गुवाहाटीचं तिकीट काढून द्यावं, कारण एकाला तिकडे पाठवायचं आहे. मग त्यांनी तिथे झाडं मोजत बसावं. असे टोलाही त्यांनी लगावला.

Uddhav Thackeray on Gadgebaba
Uddhav Thackeray : “संत गाडगेबाबा घरी यायचे, दरवाजाबाहेर उभं राहून…”, उद्धव ठाकरेंनी सांगितला आजोबांच्या काळातील आठवण
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Raj Thackeray in Borivali
Raj Thackeray in Borivali : राज ठाकरेंना भर सभेत आला कॉल, मुंबईतील एक सभा अचानक रद्द; नेमकं काय झालं?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!

हेही वाचा – जिथून गद्दार आसामकडे पळाले त्या सुरतसह महाराष्ट्रात शिवरायांची मंदिरे उभारणार, बुलढाण्याच्या सभेत उद्धव ठाकरे गरजले

अमित शाह यांनाही केलं लक्ष्य

पुढे बोलताना त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही लक्ष्य केलं. “आज पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात फिरत आहेत. लगे रहो मुन्नाभाईमधील सर्कीटसारखी त्यांनी अवस्था आहे. इथे येऊन शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर बोलण्याऐवजी ते काश्मीरमधील कलम ३७० बद्दल बोलतात. माझ्यावर टीका करताना, आम्ही कलम ३७० रद्द करण्याला विरोध करणाऱ्यांच्या बरोबर आहोत, असे ते म्हणतात, पण कदाचित अमित शाह यांना स्मृतीभ्रंष झाला असावा, कारण ज्यावेळी कलम ३७० रद्द झालं, त्या निर्णयाला आम्हीसुद्धा समर्थन दिलं होतं”, असा घणाघात त्यांनी केला.

“३७० रद्द केल्यानंतर किती काश्मिरी पंडितांना घर मिळवून दिलं?”

“आज कलम ३७० रद्द केल्याचे म्हणत पंतप्रधान मोदी आणि अमित शाह स्वत:ची पाठ थोपटवून घेत आहेत. मात्र, ज्यावेळी काश्मीरी पंडितांवर अत्याचार होत होते, त्यांची घरं जाळली जात होती. तेव्हा मोदी आणि शाह हे नाव कुणाला माहितीही नव्हतं, त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी काश्मिरी पंडितांना महाराष्ट्रात आश्रय दिला होता. त्यावेळी त्यांच्याकडे सत्ताही नव्हती. पण आज मोदी आणि शाह केंद्रात सत्तेत आहेत. मग त्यांनी ३७० रद्द केल्यानंतर किती काश्मिरी पंडितांना काश्मीरमध्ये घर मिळवून दिलं, हे त्यांनी सांगावं”, असा प्रश्नही त्यांनी भाजपाला विचारला.

हेही वाचा – Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : जोरगेवारांनी थेट फडणवीसांसमोरच व्यक्त केली मुनगंटीवारांवरील नाराजी; म्हणाले, “उमेदवारी मिळू नये म्हणून…”

“राज्यातल्या मुलभूत प्रश्नांवर भाजपा का बोलत नाही?”

“आज महाराष्ट्रातील तरुण रोजगार मागत आहेत. शेतकरी हमीभाव मागतो आहे. मात्र, भाजपा त्यांना काश्मीरमधील ३७० रद्द केल्याचं आणि राम मंदिर बांधल्याचं सांगत आहेत. राज्यातल्या मुलभूत प्रश्नांवर भाजपा बोलत नाही. आज महायुतीकडून मुंबई अदाणींच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. उद्या महाराष्ट्रातील इतर शहरातील सात बाराही अदाणींच्या नावे होऊ शकतो”, असेही ते म्हणाले.

Story img Loader