निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सलग दोन दिवस उद्धव ठाकरे यांच्या बॅगची तपासणी केली आहे. आधी वणी येथे त्यानंतर आज औसा येथे त्यांच्या हेलिकॉप्टरची झाडाझडती घेण्यात आली. त्यामुळे आता या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या आहेत. अशातच आता उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं आहे.

आज बार्शी येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना त्यांनी भाजपासह महायुतीवर सडकून टीका केली. “एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी यंत्रणेला माझी बॅग तपासण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी मला ऑटोचेकींगवर टाकलं आहे. मी तर म्हणतो की मिंधेंनी रोज माझी बॅग घेऊन माझ्याबरोबर फिरावं. फक्त त्यांनी एक करावं. जसा माझा पक्ष चोरला तसं त्यांनी बॅगमधून माझे कपडे चोरू नये. शेवटी चोर तो चोर असतो, एकदा चोरीची सवय लागली, की आयुष्य चोरीतच जातं”, असा टोला त्यांनी लगावला.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा – “उद्धव ठाकरेंच्या हातून पैसा सुटत नाही, बॅगेत काय असणार?” राज ठाकरेंची खोचक टीका!

“बॅग तपासायला हरकत नाही, माझं मन आणि बॅग दोन्हीही स्वच्छ आहे. माझी बॅग तपासल्याबद्दल माझा आक्षेप नाही. पण प्रकारे माझी बॅग तपासली तशी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांची तपासली जाते आहे का? मी आज त्या अधिकाऱ्यांना विचारला की त्यांनी आतापर्यंत किती जणांच्या बॅगा तपासल्या, त्यावेळी ते म्हणाले तुमचीच पहिली बॅग तपासली आहे. याचा अर्थ पहिला गिऱ्हाईक मीच होतो”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा – “काँग्रेसची मानसिकता गुलामगिरीची, त्यांनी नेहमीच महाराष्ट्राचा… ”; पुण्यातील सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!

दरम्यान, औसा येथील सभा संपल्यानंतर उद्धव ठाकरे सोलापूरच्या दिशेने जायचा निघाले होते. मात्र, पंतप्रधान मोदी सोलापूरला येत असल्याचे त्यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाणाची परावनगी देण्यात आली नाही. यावरूनही उद्धव ठाकरे यांनी टीकास्र सोडलं. “मी औसावरुन इकडे यायला निघालो होतो. हेलिकॉप्टरमध्ये बसलो, पण हेलिकॉप्टर उडायला तयार नव्हते. मी कारण विचारले तर त्यांनी सांगितले की पंतप्रधान मोदी सोलापूरला येत आहेत ते पोहोचल्याशिवाय आपल्याला उड्डान करता येणार नाही. ही कुठली बेबंदशाही आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे. मला जो कायदा आहे तो त्यांनाही लागू असायला पाहिजे”, असे ते म्हणाले.

Story img Loader