कोकणात मला प्रचार करायची गरजच नाही कारण कोकण हे शिवसेनेचं आणि ठाकरे कुटुंबाचं हृदय आहे असं उद्धव ठाकरेंनी विनायक राऊत यांच्या प्रचारसभेत म्हटलं आहे. शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला तरीही तुम्ही जागच्या जागी उभे आहात, त्यामुळे तुमचा मला अभिमान आहे. गद्दाराला शिवसेना चिन्ह आणि धनुष्यबाण दिला आहे. पण काय घडलं बघा की कोकणातून धनुष्यबाणही गायब केला आहे. गद्दारांना कळलंच नाही गद्दारांचे मालक शिवसेनेचं कोकणाचं नातं तोडायला निघाले आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

भाजपाच्या विरोधात लाव्हा उसळला आहे

भाजपाच्या विरोधात कोकणातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात लाव्हा रस उसळून आला आहे. सध्या आयपीएलचे दिवस सुरु आहेत. आयपीएलमध्ये नाही का खेळाडू एका टीममधून दुसऱ्या टीम दुसऱ्या टीममध्ये जातो तसं भारताच्या राजकारणाचं झालं आहे. आयपीएल इंडियन पॉलिटिकल लीग. मोदी कितीही काही बोलतील पण २०१४ आणि २०१९ चा आत्मविश्वास मला दिसतच नाही. २०१९ मध्येही आपण फसलो होतो. तेव्हा रुबाब होता कारण शिवसेना बरोबर होती, त्यावेळी ५६ इंची छाती होती आता त्यातली हवाही गेली कारण आजूबाजूला सगळे भ्रष्टाचारी अशी गत झाली आहे. आता अटलबिहारी वाजपेयींचा आत्मा ढसाढसा रडत असेल. ही सगळी काय गत केली भाजपाची असं त्यांच्या आत्म्याला वाटत असेल. असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Former corporator viral video case filed against supporters of MLA Geeta Jain vasai
माजी नगरसेविकांचे वायरल चित्रफित प्रकरण; आमदार गीता जैन समर्थकांविरोधात गुन्हा दाखल
devendra fadnavis
“काही लोकांच्या बुद्धीवर बुरशी चढली आहे, त्यांच्या…”; देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांवर टीकास्र!
What Kiran Mane Said in his Post?
किरण माने यांची पोस्ट चर्चेत, “ब्राह्मण्यवादी व्यवस्थेनं बहुजनांना ‘पाप पुण्या’ची भीती दाखवून…”
hasan mushrif sambhaji raje chhatrapati. dispute over vishalgad encroachment
विशाळगड अतिक्रमण प्रकरणावरून हसन मुश्रीफ – संभाजीराजे यांच्यात शाब्दिक वाद
IAS Pooja Khedkar Mother Manorama Khedkar Gun Video
Manorama Khedkar Video : “…म्हणून मनोरमा खेडकर यांनी पिस्तुल काढले”, पूजा खेडकरंच्या वडिलांनी सांगितले धक्कादायक कारण
Dilip Parbhavalkar While in Drama Patra-Patri
Dilip Prabhavalkar: दिलीप प्रभावळकर यांच्या मनात श्रीराम लागूंच्या पत्र आठवणींचा दरवळ, ‘पत्रापत्री’च्या प्रयोगांची चर्चा
What Uddhav Thackeray Said About Rahul Gandhi?
उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “राहुलजींनी हिंदुत्वाचा अपमान केलाच नाही, भाजपा खोटं नरेटिव्ह…”
chhagan bhujbal latest news
चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर छगन भुजबळांनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले, “बोलताना जरा…”

हे पण वाचा- सोलापुरात यंदा उन्हाळ्यात तापमानाचा सर्वोच्च पारा ४३.७ अंशांवर, नरेंद्र मोदींसह ठाकरे व पवारांच्या दुपारच्या तळपत्या उन्हात सभा

विनाशकाले विपरीत बुद्धी हा भाजपाचा प्रकार

विनाशकाले विपरीत बुद्धी असा प्रकार भाजपाचा झाला आहे. भाजपाचा विनाश होतो आहे त्यामुळेच शिवसेनेला त्यांनी बाजूला केलं असावं. असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. समोर जो आहे त्याला टोप घालण्यापूर्वी आज कुठल्या पक्षात आहोत ते आठवावं लागतं असा टोला उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना लगावला. लघू किंवा सूक्ष्म प्रकल्प कोकणात त्यांनी आणला का ? निवडणुकीनंतर करोनाचा जिवाणू दिसेल पण हे दिसणार नाहीत अशी अवस्था आहे.

शिवसेना नसती तर गुंडगिरी सुरु झाली असती

आज हे शिवसेना संपवायला निघाले आहेत. पण बाळासाहेबांनी जोडलेले शिवसैनिक माझ्याच बरोबर आहेत. असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तुम्ही आम्हाला घराणेशाही म्हणत आहात आमची घराणेशाही लोकांना मान्य आहे. यांना शिवसेनेची घराणेशाही नकोय पण तुम्हाला गद्दारांची घराणेशाही चालते. काय भाषणं ते करत आहेत? फडणवीस येऊन गेले आणि सांगून गेले की यांना मत म्हणजे त्यांना मत. तुमच्या बरोबर शिवसेना नसती तर इथे गुंडगिरी सुरु झाली असती. भाजपा इथे काहीही करु शकणार नाही हे लक्षात ठेवा. असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. गद्दारांना मत म्हणजे विनाशाला मत, इंडिया आघाडीला मत म्हणजे विकासाला मत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांनाही उत्तर दिलं आहे. तसंच बारसूसारखे विनाशकारी प्रकल्प सत्ता आल्यानंतर पुसून टाकणार आहोत असंही आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं. मोदी सरकार परत आलं तर त्यांना घटना बदलायची आहे. त्यामुळे त्यांचे मनसुबे लक्षात घ्या असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.