रविवारी कानपूरचे माजी पोलीस आयुक्त आणि भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी असीम अरुण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यांचा पक्षात समावेश केला. यावेळी अनुराग ठाकूर यांनी तुरुंगात असलेले समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांचे नाव घेऊन समाजवादी पक्षावर निशाणा साधला आणि दंगेखोर सपामध्ये जातात असे म्हटले आहे.

असीम अरुण यांच्या भाजपमध्ये प्रवेश करताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी भाष्य केले आहे. “दंगल करणारे सपामध्ये जातात, जे दंगलखोरांना पकडतात ते भाजपामध्ये जातात. हा सपाच्या समाजवादाचा खरा खेळ आहे. उमेदवार एकतर तुरुंगात जातो किंवा जामिनावर बाहेर येतो. सपाने घोषित केलेल्या उमेदवारांपैकी एक नाहिद हसन तुरुंगात आहे आणि त्यांचे दुसरे आमदार अब्दुल्ला आझम जामिनावर आहेत. जेल आणि जामिनाचा खेळ हा समाजवादी पक्षाचा खरा खेळ आहे,” असे अनुराग ठाकूर म्हणाले.

BJP, Jats, Thakurs, anger of the Jats ,
पहिल्या टप्प्यामध्ये भाजपला जाट, ठाकुरांच्या रागाची धास्ती
BJP Politics in Tamil Nadu blending caste and faith
तमिळनाडूमध्ये जात व धर्माची मोट बांधण्याचा भाजपाचा प्रयत्न! काय आहे परिस्थिती?
Attack on NIA West Bengal
पश्चिम बंगालमध्ये ‘एनआयए’च्या पथकावर हल्ला; वाहनांची तोडफोड, दोन अधिकारी जखमी
owaisi apana dal pdm
अखिलेश यांच्या ‘पीडीए’ सूत्राला ओवेसींचे ‘पीडीएम’ देणार टक्कर? उत्तर प्रदेशात तिसरी आघाडी

निवडणुकांची घोषणा होताच ईडीच्या अधिकाऱ्याची स्वेच्छानिवृत्ती; भाजपाकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा

त्याचवेळी असीम अरुण यांनी मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानू इच्छितो असे म्हटले. “ज्यांनी राज्यभरात कायद्याचे चांगले वातावरण निर्माण केले आणि पोलीस अधिकारी किंवा सर्वांना प्रामाणिकपणे काम करण्याची प्रेरणा दिली त्यांचे आज मी आभार मानतो. आज मला भाजपामध्ये काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे आणि मी येथेही माझ्याकडून सर्वोत्तम प्रयत्न करेन,” असे असीम अरुण यांनी म्हटले.

सपा प्रमुख अखिलेश यादव यांचे कानपूरचे माजी आयुक्त असीम अरुण यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याबाबतचे वक्तव्य समोर आले आहे. अखिलेश यांचे म्हणणे आहे की ते या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहेत. असीमसह भाजपामध्ये सामील झालेल्या सर्व पोलिस अधिकाऱ्यांना काढून टाकावे अशी तक्रार ते करणार आहेत कारण त्याचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो.

दरम्यान, असीम अरुण हे १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. एक प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जाणारे, अरुण कानपूरचे आयुक्त होण्यापूर्वी ११२ आणि दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख म्हणून नियुक्त झाले होते. त्यांनी नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) साठी कमांडो ट्रेनिंगही केले आहे. हातरस, बलरामपूर, गोरखपूर, अलीगढ, सिद्धार्थनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये ते प्रमुख राहिले आहेत. असीम अरुण यांचे वडील श्रीराम अरुण हे देखील आयपीएस असून त्यांनी राज्यात दहशतवाद विरोधी पथकाचीही स्थापना केली होती.