उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा शनिवारी केंद्रीय निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी केली. या निवडणुका सात टप्प्यांत होणार असून १० फेब्रुवारी रोजी मतदानाचा पहिला, तर ७ मार्च रोजी अखेरचा टप्पा पार पडेल. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक सात टप्प्यांमध्ये, मणिपूरमध्ये दोन टप्प्यांत तर, पंजाब, गोवा व उत्तराखंडमध्ये एका टप्प्यात मतदान होईल. पाचही राज्यांमध्ये १० मार्च रोजी मतमोजणी होईल.

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राजकीय पक्षांनी प्रत्यक्ष जाहीर सभा वा कार्यक्रम घेण्याऐवजी आभासी प्रचार करावा. निवडणूक खर्चात वाढ करण्यात आली असून त्याचा वापर पक्ष व उमेदवारांनी ऑनलाइन प्रचारासाठी करावा, असे आवाहन केंद्रीय निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी केले. पाचही राज्यांमध्ये १५ जानेवारीपर्यंत जाहीर प्रचारसभा, पदयात्रा, रोड शो, चौक सभा घेण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे.

narendra modi
पंतप्रधानांकडून प्रचारात जुनेच मुद्दे; विरोधकांची टीका, मित्रपक्षांचीही भिस्त मोदींवरच
Akola Lok Sabha, vote division in Akola,
अकोल्यात मतविभाजन कोणाला फायदेशीर ठरणार ?
Loksabha election 2024
मणिपूर : कुकी समाजाच्या नेत्यांनी घेतला निवडणूक न लढण्याचा निर्णय; जातीय संघर्षाचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर?
Central government decision to maintain export ban indefinitely to keep domestic onion prices under control
कांदा निर्यातबंदी कायम; दर आणखी कोसळण्याची भीती, शेतकऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया

दरम्यान भाजपाचं पुन्हा एकदा सत्तेत येण्याचं लक्ष असलेल्या उत्तर प्रदेशात निवडणूक आयोगाने प्रत्यक्ष जाहीर सभा वा कार्यक्रमांवर बंदी घातली असली तरी भाजपाने मात्र आधीच लोकांपर्यंत पोहोचत विरोधकांना धक्का दिला आहे.

भाजपा सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील प्रचाराचा प्रमुख चेहरा असणाऱ्या योगी आदित्यनाथ यांनी गेल्या काही महिन्यात राज्यातील २५० विधानसभा मतदारसंघांचा दौरा केला आहे. याशिवाय १९ डिसेंबरला सुरु झालेल्या जनविश्वास यात्रेदरम्यान योगी आदित्यनाथ यांच्यासोबत पक्षाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांच्या ३९९ हून अधिक प्रचारसभा, बैठका आणि रोड शो पार पडले.

२०१७ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या ७८ मतदारसंघांवर सध्या भाजपाने लक्ष केंद्रीत केलं असून योगी आदित्यनाथ यांनी येथे दौरा केला असून अनेक नव्या प्रकल्पांचं उद्घाटन केलं आहे. यावेळी त्यांना भाजपा सत्तेत आल्यास होणारे फायदे सांगत मतदारांना आकर्षित करण्याचाही प्रयत्न केला. यासोबत त्यांनी राज्यातील अनेक जाती आणि इतर घटकांपर्यंतही पोहोचण्याचा प्रयत्न केला.

भाजपाचे मुख्य प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आधीच उत्तर प्रदेशातील डझनहून अधिक जिल्ह्यांचा दौरा केला आहे. त्यांनी अनेक पायाभूत सुविधांचं उद्धाटन केलं असून प्रचारसभाही घेतल्या आहेत. २० ऑक्टोबरला कुशीनगरमध्ये विमानतळाचं उद्घाटन करण्यापासून ते सुलतानपूर, प्रयागराज, वाराणसी, गोरखपूर, महोबा, झाशी, बलरामपूर, शहाजहानपूर, नोएडा, कानपूर आणि लखनऊमध्ये त्यांनी प्रचारसभा घेतल्या.

दरम्यान भाजपा जनविश्वास यात्रेची सांगता करताना ९ जानेवारीला मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सभेला संबोधित करणार होते. मात्र करोनामुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागला आहे.

योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांनीदेखील गेल्या दोन महिन्यात अनेक बैठका आणि संमेनलात सहभाग नोंदवला आहे. दुसरीकडे पक्षाने व्हर्च्यूअल सभांसाठीही जोरदार तयारी केली आहे.