उत्तरप्रदेशातल्या आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसचं नेतृत्व करणाऱ्या प्रियंका गांधी स्वतःच काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदासाठीच्या उमेदवार असण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. एका प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी दिलेल्या संकेतांवरून असे अंदाज आता बांधले जाऊ लागले आहेत. उत्तरप्रदेशात सात टप्प्यांमध्ये निवडणुका होणार असून काँग्रेस स्वबळावर या निवडणुका लढणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तरप्रदेश काँग्रेसने आज आपलं घोषणापत्र जाहीर केलं. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत प्रियंका तसंच राहुल गांधीही उपस्थित होते. यावेळी बोलताना काँग्रेसने आपला यूथ मॅनिफेस्टो जारी केला. या पत्रकार परिषदेत त्यांना उत्तरप्रदेशातल्या काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी दिलेलं सूचक उत्तर सर्वकाही सांगून गेलं. त्या म्हणाल्या, तुम्हाला इतर कोणाचा चेहरा दिसत आहे का सगळीकडे? आता तर माझा चेहरा दिसत आहे ना?

उत्तरप्रदेश निवडणुकांदरम्यान काँग्रेसची सूत्रं प्रियंका गांधी यांच्या हातात आहे. रणनीतीपासून घोषणापत्र, प्रचार…सगळं काही प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत होत आहे. यंदाच्या निवडणुका काँग्रेस महिला आणि तरुणांना डोळ्यासमोर ठेवून लढत आहे. त्या अनुषंगाने प्रियंका गांधी यांनी ४० टक्के तिकीटं महिलांना दिली आहे. उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईलाही तिकीट देण्यात आलं आहे.

मात्र अजूनही प्रियंका गांधी निवडणूक लढवणार का? याबाबत कोणतंही स्पष्ट उत्तर काँग्रेस किंवा प्रियंकांनी दिलेलं नाही. याबद्दल प्रश्न विचारला असता अजून याबद्दल निर्णय झालेला नसल्याचं प्रियंका गांधींनी सांगितलं.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up assembly elections 2022 priyanka gandhi reaction on congress cm face rahul gandhi releases up manifesto vsk
First published on: 21-01-2022 at 15:21 IST