scorecardresearch

UP Election: “अमित शाहांनी योगींना पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात संपवलं”, भुपेश बघेल यांचा मोदींबाबतही मोठा दावा

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणाही साधला.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी आपली ताकद लावली आहे. काँग्रेसचे देशभरातील अनेक मोठे नेते उत्तर प्रदेशमध्ये प्रचार करताना दिसत आहेत. त्यात छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचाही समावेश आहे. बघेल यांनी २ दिवस कानपूर बुंदेलखंड परिसरात काँग्रेसचा जोरदार प्रचार केला. याशिवाय त्यांनी सोमवारी (१४ फेब्रुवारी) ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणाही साधला.

भुपेश बघेल म्हणाले, “अमित शाह यांनी योगींना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात संपवलं. सहाव्या आणि सातव्या टप्प्यात नरेंद्र मोदी संपवतील. आता हेच पाहायचं आहे की दोघांना योगी आदित्यनाथ संपवतात की दोघं मिळून योगींना संपवतात.”

हेही वाचा : “विकेट मिळाली नाही, म्हणून गोलंदाज…”; कैरानामध्ये गाडीमध्ये ईव्हीएम सापडल्यानंतर विरोधकांवर मोदींचा निशाणा

दरम्यान, भुपेश बघेल यांनी तिसऱ्या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या उत्तर प्रदेशमधील भागात काँग्रेसचा प्रचार केला. रविवारी त्यांनी कानपूरमधील गोविंदनगर भागात प्रचार केला. किदवईनगर आणि सिंकदरा येथे सभा केल्या आणि डोअर टू डोअर प्रचार करून ते झाशी येथे पोहचले. झाशीत भुपेश बघेल यांनी झाशीच्या किल्ल्याला भेट दिली. तसेच ज्या ठिकाणी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी घोड्यावर बसून इंग्रजांचा घेरा तोडला तेथेही भेट दिली.

मराठीतील सर्व उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ ( Uttar-pradesh-assembly-elections-2022 ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bhupesh baghel allegations on amit shah and narendra modi about yogi adityanath amid election pbs

ताज्या बातम्या