उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचा निकाल काल (10 मार्च) जाहीर करण्यात आला. भाजपाने पंजाब वगळता उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा, उत्तराखंड या राज्यांमध्ये आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने एकहाती सत्ता मिळवली असून सपा आणि बसपासारख्या पक्षांना चांगलाच धक्का बसलाय. या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी ही निवडणूक म्हणजे पक्षासाठी धडा असल्याचं म्हटलंय.

“बसपाने जो विचार केला होता; त्याच्यापेक्षा उत्तर प्रदेश निवडणुकीचा निकाल वेगळा लागलाय. पण या निकालामुळे आपण निराश होऊन चालणार नाही. आपण आत्मपरीक्षण करायला हवं. त्याचबरोबर पुन्हा सत्तेत येण्यासाठी या निकालातून आपण काही गोष्टी शिकल्या पाहिजेत आणि पक्षाची चळवळ पुढे नेली पाहिजे,” असे मायावती म्हणाल्या.

2024 Lok Sabha elections
उत्तराखंडमध्ये भाजपाच्या निर्भेळ यशाचे लक्ष्य
State president of NCP Sharad Pawar faction Jayant Patil criticizes BJP
जयंत पाटील म्हणतात, ‘संविधान बदलण्याचा कट हा ‘त्यांच्या’ ४०० पारच्या घोषणेतून…”
prashant kishor
“…तर राहुल गांधींनी राजकारणातून बाजूला व्हावं”, प्रशांत किशोर यांचा सल्ला
Gujarat Congress chief Arjun Modhwadia joins BJP and attacks on congress leader
“पक्ष चालवणं म्हणजे अर्धवेळ नोकरी नव्हे”; गुजरात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी पक्ष सोडताना दिल्या कानपिचक्या!

तसेच त्यांनी भाजपाच्या विजयावर आणि काँग्रेसच्या अपयशाबद्दलही प्रतिक्रिया दिली असून प्रयत्न सुरुच ठेवायला हवेत असे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केले. “२०१७ च्या अगोदर भाजपाला उत्तर प्रदेशमध्ये आजच्यासारखा जनाधार नव्हता. २०१७ च्या अगोदर जशी भाजपाची स्थिती होती, त्याच परिस्थितीतून आज काँग्रेस जात आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचे निकाल म्हणजे आपण आणखी सातत्याने प्रयत्न सुरु ठेवण्यासाठीचा धडा आहे,” असेदेखील मायावती म्हणाल्या.

दरम्यान, काल एकूण पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. यामध्ये उत्तर प्रदेशसह चार राज्यांत भाजपाने विजयी पताका फडकवला आहे. उत्तर प्रदेशमध्ये ४०३ जागांपैकी भाजपाने २५५ जागांवर विजय मिळवला असून त्यांचा सत्ता स्थापनेचा मार्क मोकळा झाला आहे. तर येथे सपाला १११ जागा मिळाल्या असून तो प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करेल. बसपा आणि काँग्रेसची येथे दुर्दशा झाली आहे. काँग्रेसला अवघ्या दोन तर बसपाला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला आहे.