उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी सत्ता मिळविण्यासाठी राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. एका वृत्तवाहिनीवर या विषयावर चर्चा सुरू होती. ज्यामध्ये अँकरने काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा कुठून निवडणूक लढवणार? असा प्रश्न काँग्रेस नेते वरुण यांना विचारला होता. या प्रश्नावर काँग्रेस नेत्याने असे उत्तर दिले की सगळे हसू लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाइम्स नाऊ नवभारत वाहिनीच्या एका कार्यक्रमात ही चर्चा सुरू होती. ज्यात अँकर सुशांत सिन्हा यांनी काँग्रेस नेत्याला विचारले, “प्रियांका वड्रा कुठून निवडणूक लढवणार?” काँग्रेस नेत्याने उत्तर दिले, “प्रियंका गांधी कोठून निवडणूक लढवणार याबाबत पक्षाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्या एवढ्या छोट्या स्तरावरची निवडणूक लढवणार, असे मला वाटत नाही. त्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्या आहे, त्या एवढी छोटी निवडणूक का लढवणार?,” असं वरुण म्हणाले.

काँग्रेस नेत्याचे उत्तर ऐकून अँकर हसायला लागले. त्यावर काँग्रेस नेते म्हणाले की, “ही आमदारकीची निवडणूक आहे. ही लढवण्याऐवजी त्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी.” यावरूनच ज्येष्ठ पत्रकार हर्षवर्धन त्रिपाठी यांनी काँग्रेस नेत्याची खिल्ली उडवली आणि “काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून तुम्ही फार कमी बोलत आहात, तुम्ही कुठे दुसरीकडे जायची तयारी तर करत नाही आहात ना,” असा टोला लगावला.

अँकरने हा प्रश्न भाजपाच्या प्रवक्त्या अपराजिता यांना विचारला की प्रियंका गांधी अशा छोट्या निवडणुका लढवत नाहीत. याला तुम्ही कसे उत्तर द्याल?, यावर भाजपा प्रवक्त्या म्हणाल्या, की “उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एकदा त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेत्या म्हणून वर्णन केले होते. त्यांना उत्तर प्रदेश छोटा वाटत असेल तर त्यातून त्यांची मानसिकता दिसून येते.”

दरम्यान, काँग्रेस नेते काही बोलू लागले, तेव्हा अँकर त्यांना म्हणाले की, “या देशात एखादी सरपंचपदाची निवडणूक असली तरी ती लोकशाही आहे. निवडणुका लोकांच्या भावनेशी जोडलेल्या आहेत. एवढी छोटी निवडणूक प्रियंका गांधी लढवणार नाहीत, असे म्हणणे म्हणजे हा उत्तर प्रदेशातील जनतेचा अपमान नाही का?,” असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: From where priyanka gandhi will contest election what congress leader varun says over up election hrc
First published on: 13-01-2022 at 11:22 IST