काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवू शकतात. याबाबत पक्षात विचारमंथन सुरू आहे. याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत कोणताही निर्णय घेतला जाईल, तेव्हा नक्कीच कळवले जाईल. दरम्यान, प्रियंका यांनी आता मुख्यमंत्री पदाबाबत दिलेल्या वक्तव्यावर आपला खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, “कुठेतरी माझा पक्ष मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्याची घोषणा करतो तर कुठे करत नाही. ही माझ्या पार्टीची स्टाईल आहे. तर, मी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहे, असे मी म्हटले नाही, तर चिडूनच हे बोलले होते. कारण तुम्ही तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत होता.” यानंतर पत्रकाराने म्हटलं उत्तर प्रदेशात तुम्ही घोषणा दिल्याने हे प्रश्न विचारले जात आहेत. त्यावर त्या हसल्या आणि म्हणाल्या की, “तुम्ही घोषणा दिल्यापासून हा प्रश्न विचारायला लागलात, असे नाही.” काँग्रेसने जारी केलेल्या युवा घोषणापत्रादरम्यान, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांना मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबद्दल विचारले असता, त्या म्हणाल्या की, तुम्हाला दुसरा चेहरा दिसतोय का?, त्यानंतर त्याच उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील अशा चर्चा सुरू झाल्या.

UP Election: निवडणूक निकालानंतर काँग्रेस इतर पक्षांशी युती करणार का? प्रियंका गांधी यांनी दिलं उत्तर, म्हणाल्या…

याशिवाय प्रियांका गांधी म्हणाल्या की, “आम्ही पूर्ण ताकदीने निवडणूक लढत आहोत. विकास, बेरोजगारी, महागाई, महिला सुरक्षा हे महत्त्वाचे मुद्दे ज्यावर चर्चा व्हायला हवी, ते प्रामुख्याने काँग्रेसकडून मांडले जात आहेत. काँग्रेस जनतेचा आवाज बुलंद करत आहे, मला आशा आहे की त्याचा परिणाम चांगला होईल. सर्वच राजकीय पक्ष वास्तव लपवून निवडणुकीच्या वेळी असे मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न करत आहेत, जे जात, जातीयवाद यासारखे भावनिक मुद्दे आहेत कारण त्यांना विकासाची चर्चा करायची नाही. त्यामुळे जनतेचा आणि राजकीय पक्षांचाच फायदा होतो.”

मराठीतील सर्व उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka gandhi u turn from her remarks of being cm face for congress in up election hrc
First published on: 22-01-2022 at 13:38 IST