उत्तर प्रदेशमध्ये लवकरच चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. मात्र या निवडणुकीमध्ये अनेक अशा आजी माजी चेहऱ्यांची चर्चा आहे जे राजकारणापलीकडील कारणांसाठी गाजले. यापैकीच एक आहे राज कुमार शिवहरे. ही तीच व्यक्ती आहे जीने आपल्या जिवावर खेळून उमा भारती यांना बाबरी मशिद पाडण्यासाठी अयोध्येला जाण्यासाठी मदत केलेली.

अयोध्येमध्ये बाबरी मशीद पाडण्याआधी मध्य प्रदेशच्या पूर्व मुख्यमंत्री आणि भाजपाच्या स्टार प्रचारक उमा भारती यांना बांदा येथील अतिथीगृहामध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. याचबरोबर लाखो लोकांना बांदामध्येच आडवण्यात आलं होतं. ३० ऑक्टोबर १९९० रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी कारसेवकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिल्याचं सांगितलं जातं. यामध्ये काही कारसेवकांचा मृत्यू झाला होता. समाजवादी पक्षाची सरकार असताना मुख्यमंत्री मुलायम सिंह यांनी सर्व ट्रेन आणि बस बंद केल्या होत्या. मात्र हिंदू संघटनांनी आवाहन केल्याने देशभरातून रामभक्त पायी चालतच अयोध्येला निघाले होते. अयोध्येमधील बाबरी मशिद पाडण्याच्या आंदोलनापूर्ण अयोध्येकडे जाणारे सर्व मार्ग २० किलोमीटरआधीच खोदून ठेवण्यात आलेले. अयोध्येकडे येणाऱ्या मार्गांवर जेसीबीच्या मदतीने ५ मीटरचे खड्डे खणण्यात आलेले. मात्र असं असतानाही उमा भारती या अयोध्येत पोहचल्या होत्या त्या राज कुमार शिवहरेंच्या मदतीने. नक्की तेव्हा काय घडलेलं जाणून घेऊयात.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”
Pune, NCP Office bearers, Son, Attacked, Gang, koyata, Dandekar Pool, Six Arrested, crime news, police, politics
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या मुलावर हल्ला; दांडेकर पूल परिसरातील घटना, सहाजणांना अटक

अलोक निगम यांनी टीव्ही ९ हिंदीसाठी लिहिलेल्या लेखामध्ये यासंदर्भात खुलासा केलाय. “आमची भेट बजरंग दलाचे जिल्हा संयोजक राक कुमार शिवहरेंशी झाली. त्यांवेळी त्यांचं वय केवळ २९ वर्ष इतकं होतं. इतर अनेक तरुणांप्रमाणे ते सुद्धा रामासाठी प्राणांची बाजी लावण्याच्या तयारीत होते. बांदा जिल्ह्यातील बजरंग दलाचे संयोजक म्हणून काम करणाऱ्या राज कुमार शिवहरे यांनी उमा भारतींना मदत केलेली. उमा भारती यांनी शिवहरेंना अतिथीगृहावर बोलावून घेतलं जिथं त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेलं. माझी फार इच्छा आहे की मी अयोध्येमधील राममणी छावणीमध्ये जावं. अनेक रामभक्त गोळ्या लागल्याने शहीद झाले आहेत, असं शिवहरेंना सांगितलं. शिवहरे सुद्धा उमा भारतींना घेऊन जाण्यासाठी तयार झाले. त्यांनी यासाठी एक योजना तयार केली,” असं लेखात म्हटलंय.

पोलिसांचा पहारा आणि जिल्हा प्रशासनाचीही उमा भारतींवर नजरकैदेमध्ये नजर होती. मात्र शिवहरे यांनी नुकत्याच घेतलेल्या आपलव्या मारुती गाडीने जेवण देण्यासाठी अतिगृहाच्या आवारामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी उमा भारती यांना गाडीच्या डिकीमध्ये लपण्यास सांगितलं. उमा भारती डिकीमध्ये लपल्यानंतर त्यांच्यावर चादर टाकून शिवहरे न घाबरता सुरक्षारक्षकांसमोर गाडी घेऊन अतिथीगृहामधून बाहेर पडला. रात्री १२ च्या सुमारास हा सारा प्रकार घडला. त्यानंतर उमा भारती यांना मुस्लिम महिलेचा पेहराव घालून त्यांना शिवहरे अयोध्येत घेऊन गेले. या महिलेच्या पतीचं निधन झालं असून अयोध्येमध्ये कसं पोहचणार याची तिला चिंता असल्याने आपण तिला मदत करतोय असं शिवहरे यांनी सांगितलं होतं. मजल दरमजल करत अखेर शिवहरे यांच्या मदतीने उमा भारती अयोध्येत पोहचल्या. त्यानंतर शिवहरे हे बांदाच्या आमदार झाले होते.