scorecardresearch

Uttar Pradesh: समाजवादी पार्टीच्या निवडणुकीतल्या पराभवाने नाराज होता कार्यकर्ता; डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या

देवेंद्रने समाजवादी पार्टीच्या आपल्या गावातल्या उमेदवाराला जिंकून देण्याची जबाबदारी घेतली होती. मात्र तो ती जबाबदारी पार पाडण्यात अयशस्वी ठरला.

विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीचा पराभव झाल्याने निराश झालेल्या पक्षाच्या एका कार्यकर्त्याने आज आत्महत्या केली. त्याने स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्येच प्रयत्न केल्यानंतर त्याच्या घरच्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात हलवलं, मात्र त्यापूर्वीच या कार्यकर्त्याच्या मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं.


४० वर्षीय देवेंद्र यादव बबलू असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. त्याने स्वतःच्या डोक्यात गोळी घालून घेतली. त्यानंतर त्याच्या घरच्यांनी त्याला तात्काळ माधोगंज इथल्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. देवेंद्रच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, समाजवादी पार्टी निवडणुकीत हरल्याने त्याला गावातले लोक चिडवत होते, टोमणे मारत होते. त्यामुळे देवेंद्र अस्वस्थ होता.


देवेंद्रने समाजवादी पार्टीच्या आपल्या गावातल्या उमेदवाराला जिंकून देण्याची जबाबदारी घेतली होती. मात्र तो ती जबाबदारी पार पाडण्यात अयशस्वी ठरला. माधोगंजचे इन्स्पेक्टर सुब्रत त्रिपाठी यांनी सांगितलं की देवेंद्र आपल्या घरातल्या दुसऱ्या मजल्यावरच्या खोलीत बसला होता. तिथेच त्याने देशी पिस्तुलाने स्वतःला गोळी झाडून घेतली. त्याच्या मागे त्याची पत्नी आणि तीन मुलं असा परिवार आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मराठीतील सर्व उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ ( Uttar-pradesh-assembly-elections-2022 ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Samajwadi party uttar pradesh assembly elections 2022 man did suicide shot in the head vsk

ताज्या बातम्या