पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे प्राथमिक कल हाती आले असून उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा योगी सरकार सत्तता काबिज करेल असं चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे पंजाबमध्ये आपचा मुख्यमंत्री बसेल असं चित्र प्राथमिक कल दर्शवत आहेत. गोव्यामध्ये त्रिशंकू तर उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये कमळ फुलण्याची चिन्हं दिसत आहे.

हे प्राथमिक कल सध्या तरी काँग्रेससाठी फारच धक्कादायक ठरत असून पंजाबसारख्या महत्वाच्या राज्यामधील सत्ताही काँग्रेसच्या हातून जाणार असं चित्र दिसतंय. एकीकडे हा काँग्रेसाठी मोठा धक्का मानला जात असतानाच दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होत काही विक्रमांना गवसणी घालणार आहेत. यावरच टाकलेली नजर…

caa in assam,
सीएए विरोधात आसाममधील विरोधीपक्ष आक्रमक, मुख्यमंत्री सरमांनीही दिलं प्रत्युत्तर; पुन्हा आंदोलन पेटणार?
muzaffar beg kashmir loksabha
काश्मीरमध्ये लोकसभेची पहिली जागा जिंकण्यासाठी भाजपा सज्ज; पहाडी नेते मुझफ्फर बेग यांना पक्षाचा पाठिंबा मिळेल का?
Shahjahan Sheikh arrest
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेखला ५४ दिवसांनी अटक
CM Sukhwinder Singh Sukhu
हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खूंचा राजीनामा? विरोधकांच्या दाव्यावर सुक्खूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

>उत्तर प्रदेशच्या राजकारणाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या पक्षाला दुसऱ्यांदा सत्ता मिळाली त्या पक्षाने आपल्या आधीच्या मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा नेतृत्व दिलं नाहीय.१९५० पासून १९६७ दरम्यान उत्तर प्रदेशची सत्ता काँग्रेसकडे होती. मात्र गोविंद वल्लभ पंतंपासून सुरु झालेली मुख्यमंत्रीपदाची स्पर्धा तीन मुख्यमंत्री बदलल्यानंतर चंद्रभान गुप्तांपर्यंत पोहोचली.

>१९५० ते १९६७ दरम्यान काँग्रेसचं सरकार आलं तेव्हा दरवेळेस मुख्यमंत्री बदलण्यात आले. त्यानंतर १९८० ते १९८९ दरम्यान पुन्हा काँग्रेस पक्ष या सर्वात महत्वाच्या राज्यात सत्तेत होता. या नऊ वर्षांमध्ये एक दोन नाही तर तब्बल पाच मुख्यमंत्री राज्याने पाहिले.

>भाजपाने उत्तर प्रदेशमध्ये १९९७ ते २००२ दरम्यान पहिल्यांदा पाच वर्षे सत्तेत राहण्याचा पराक्रम केला. मात्र या पाच वर्षांमध्ये भाजपाला तीन मुख्यमंत्री बदलावे लागले. भाजपाने २१ सप्टेंबर १९९७ साली पहिल्यांदा राज्यात सरकार बनवलं तेव्हा कल्याण सिंह मुख्यमंत्री झाले. त्यांतर दोन वर्षांनी भाजपाचे राम प्रकाश गुप्ता मुख्यमंत्री झाले. मात्र राम प्रकाश गुप्ता यांना एक वर्षाचा कार्यकाळही पूर्ण करता आला नाही. त्यांना ३५१ व्या दिवशी पदावरुन हटवण्यात आलं अन् त्यांच्या जागी आले राजनाथ सिंह. राम प्रकाश गुप्ता यांच्यानंतर भाजपाने राजनाथ सिंह यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली.

>याचप्रमाणे ३ जून १९९५ साली मायावती पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री झाल्या तेव्हाचं सरकार १८ ऑक्टोबर १९९५ पर्यंत म्हणजेच १३७ दिवस चाललं. मात्र त्यानंतर हे सरकार पडलं आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. तब्बल दोन वर्षानंतर राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली आणि मायावती दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या. त्यानंतर त्या या पदावर अवघ्या १८४ दिवसच या पदावर राहिल्या. कारण त्या मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा एका वर्षासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. त्यांना आपला कार्यकाळही पूर्ण करता आला नाही.

>नोएडासंदर्भात उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये एक समज आहे. मुख्यमंत्री असताना नोएडाचा दौरा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचं सरकार पुढच्या निवडणुकीला पडतं असं म्हटलं जातं. अनेक दशकांपासून उत्तर प्रदेशच्या राजकारणात ही गोष्ट दबक्या आवाजात कायमच चर्चेत राहिलीय. मात्र आता योगींनी हे सुद्धा खोटं ठरवलंय.

>१९८८ मध्ये वीर बहादूर सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आणि ते नोएडा दौऱ्यावर गेले. त्यानंतर पुढील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. नंतर १९८९ साली एन. डी. तिवारी नोएडामधील सेक्टर १२ मध्ये नेहरु पार्कच्या उद्घाटनाला गेले आणि काही दिवसांत त्यांचं मुख्यमंत्री पद गेलं. नंतर कल्याण सिंह आणि मुलायम सिंह यांच्यासोबतही असाच प्रकार घडला आणि हा विश्वास अधिक दृढ झाला. मात्र आता योगींनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत या नकोश्या परंपरेलाही छेद दिलाय.

>कल्याण सिंह यांची खुर्ची गेल्यानंतर राजनाथ सिंह हे भाजपाचे मुख्यमंत्री झाले. २००० साली त्यांना नोएडाला जाण्याची संधी होती. मात्र ते नोएडाला गेले नाही. डीएनडी उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यासाठी राजनाथ सिंह हे नोएडाला न येता दिल्लीमधूनच त्यांनी उद्घाटन केलं. मात्र नंतर त्यांचीही खुर्ची गेली. त्यानंतर २०११ मध्ये मायावती नोएडाला आल्या आणि २०१२ मध्ये त्यांची सत्ता गेली.

>नंतर मुख्यमंत्री झालेले अखिलेश यादव कधी नोएडाला आले नाहीत. अनेकांनी याच एका गोष्टीमुळे ते नोएडाला मुख्यमंत्री असताना आले नाहीत असं म्हटलं.

>मुख्यमंत्री आदित्यनाथ हे अनेकदा नोएडाला आले आहेत. त्यामुळे योगी जेव्हा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील तेव्हा नोएडा दौरा म्हणजे मुख्यमंत्री पद जाणार हा समज सुद्धा दूर होईल.

>स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशात सलग दोन वेळा मुख्यमंत्री बनवण्याचा विक्रम योगी आदित्यनाथ करण्याच्या मार्गावर आहेत. याआधी गोविंद वल्लभ पंत सलग दोनवेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते. परंतु पंत पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा तो युनायटेड प्रोव्हिन्स होता आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. त्यामुळे स्वतंत्र भारतामध्ये दोनवेळा उत्तर प्रदेशाचा मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवणारे योगी पहिले नेते ठरतील.