पाच राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना अधिकच वेग आल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर पक्षाला लागलेली गळती थांबवण्याचे आव्हान निर्माण झालेले आहे. तर आता उत्तराखंडमध्येही भाजपाचे कॅबिनेट मंत्री हरकसिंग रावत हे काँग्रेसच्या वाटेवर असून आज ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. ते भाजपाल निरोप देऊ शकतात, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, भाजपाकडून मंत्री हरकसिंग रावत यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. तर, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी उत्तराखंडच्या राज्यपालांकडे हरकसिंग रावत यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची शिफारसही केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरकसिंग रावत यांच्या बंडखोर वृत्तीमुळे भाजपा बराच काळापासून अडचणीत होती. अनेकवेळा त्यांचे भाजपा नेतृत्वासोबत वादही झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून रावत आणि भाजपामध्ये सर्व काही ठीक नव्हते. मागील महिन्यात त्यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता, अशी देखील माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारवर निशाणा साधताना कोटद्वारचे आमदार असलेल्या रावत यांनी कोटद्वार येथील वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता देण्याच्या मागणीवर सरकारच्या निर्णयावरून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर बैठक बोलावून त्यांना राजीनामा मागे घेण्यासाठी राजी करण्यात आले होते.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttarakhand election bjp expels minister harak singh rawat can enter congress today msr
First published on: 17-01-2022 at 07:55 IST