29 January 2020

News Flash

सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार

लोकसभा निवडणुकीपूर्वी वर्धा येथे भाजपातील अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचला असून दत्ता मेघे आणि विद्यमान खासदार रामदास तडस यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. तेली समाजाच्या मेळाव्यात खासदार तडस यांना लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यास मेघे पिता पुत्राचे पुतळे जाऊ, असा इशारा देण्यात आला असतानाच या वरुन आता दत्ता मेघे यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. पुतळे जाळण्याची भाषा विद्यमान खासदाराच्या उपस्थितीत होणे ही बाब लोकशाहीत शोभत नाही, असे मेघे यांनी म्हटले आहे. मी काही तेली समाजाचा विरोधक नाही किंवा कट्टर कुणबी समर्थक नाही. आजवरच्या राजकारणात मी सर्वाना सोबत घेऊन चाललो. माझ्या संस्थांमध्ये सगळेच काम करतात. मी त्यांना (खा. तडस) गेल्या २५ वर्षांत काय मदत केली, हे सर्व जगाला माहीत आहे. त्याचा उजाळा करीत नाही. म्हणून त्यांनी अशी भाषा ऐकून घेणे दुर्दैवी आहे. मेळाव्यात माझ्या नावानिशी बोलले गेले, म्हणून माझेही मत व्यक्त करणे आवश्यक वाटते, अशी भावना मेघे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. कधीकाळी मेघे यांचे पट्टशिष्य म्हणून राजकारणात वावरणाऱ्या तडस यांना दोन वेळा आमदार करण्याचे श्रेय मेघेंना दिले जाते. पुढे काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या मेघेंची संगत सोडून तडस राकाँतच थांबले. २००९ची विधानसभा निवडणूक तडस भाजपतर्फे लढले. २०१४ला मेघे-तडस असा सामना रंगला होता. मेघे भाजपमध्ये आल्यानंतर कधीकाळच्या या गुरू-शिष्यातील स्पध्रेने नवेच वळण घेतले आहे. सागर मेघे हे प्रतिस्पर्धी ठरत असल्याच्या शक्यतेपोटी तडस समर्थकांनी मेळाव्यातून संतप्त भावना नोंदवल्या. त्याचे व्हिडीओ व्हायरल केले. त्यावर आज काही मेघे समर्थकांनी संताप व्यक्त करीत जशास तसे उत्तर देण्याची भूमिका जाहीर केली. लोकसभा निवडणुकीपूर्वीच रंगलेला हा मेघे-तडस कलगीतुरा आगामी काळात अधिक गडद होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होते.

सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल

* Bye Election Result
Year
Winner
Party
Vote%

मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

Constituency Siting MLA Party
DHAMANGAON RAILWAYJagtap Virendra WalmikINC
MORSHIDr. Anil Sukhdevrao BondeBJP
ARVIAmar Sharadrao KaleINC
DEOLIKamble Ranjit PratapraoINC
HINGANGHATKunawar Samir TrambakraoBJP
WARDHADr.pankaj Rajesh BhoyarBJP

सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी

अन्य मतदारसंघ

Just Now!
X