जिल्हा परिषद निवडणुका पार पडल्या आहेत. निकालांमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता कायम आहे. मात्र जिल्हा परिषद २०१७ च्या निवडणुकांमध्ये कुठले कोट्याधीश उमेदवार कुठल्या पक्षाकडून उतरले होते हे तुम्हाला ठाऊक आहे का? आम्ही तुम्हाला ही माहिती देणार आहोत. २०१७ ला पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये एकूण दहा उमेदवार असे होते जे कोट्याधीश होते. कुठल्या कुठल्या पक्षाचे उमेदवार कोट्याधीश होते चला जाणून घेऊ या यादीतून

२०१७ ला असलेले दहा कोट्याधीश उमेदवार कोण?

अनुक्रमांकउमेदवाराचं नावस्थावर आणि जंगम मालमत्ता किती कोटींची?पक्षाचं नाव
१)गुलाबराव गोविंद म्हाळसकर३९ कोटी ८६ लाख ६९ हजार २९१भाजपा
२)मालिनी दासराव पाटील भुयेकर२८ कोटी ७४ लाख ६५ हजारराष्ट्रवादी काँग्रेस
३)दीपक शिवराम पटारे२५ कोटी ४३ लाख ३४ हजार १००अपक्ष
४)हेमलता कांतिलाल काळोखे२४ कोटी ७ लाख ९९ हजार ६४६राष्ट्र्वादी काँग्रेस
५)भारत अंबू म्हात्रे२२ कोटी ४३ लाख १६ हजार ८३०काँग्रेस
६)विजय शिवगोविंदराव पाटील१६ कोटी २८ लाख ६६ हजार ३०३अपक्ष
७)सुप्रिया संतोष वालावलकर१६ कोटी ०३ लाख ४७ हजार ५००काँग्रेस
८)विक्रमसिंह बबनराव शिंदे१५ कोटी ९० लाख ६६ हजार ९४९राष्ट्रवादी काँग्रेस
९)सतीश संभाजी पाटील उमरकर१५ कोटी ६० लाख ३१ हजार ५८७शिवसेना
१०)प्रणाली पुरुषोत्तम भोईर१३ कोटी ३१ लाख ३८ हजरा ३८३शेकाप

१० कोट्याधीशांच्या यादीत काय दिसून येतं?

१० कोट्याधीश उमेदवारांच्या यादीवर नजर टाकली तर कळतं की १० पैकी तीन नावं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची आहेत. काँग्रेस पक्षाचे दोन उमेदवार कोट्याधीशांच्या यादीत आहेत. अपक्ष दोन उमेदवार या यादीत आहेत. तर शिवसेनेकडे एक, भाजपाकडे एक आणि शेकापकडे एक असे उमेदवार कोट्याधीश होते. या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हे चित्र कसं बदलतं कुठल्या पक्षाचे उमेदवार कोट्याधीश असतील हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. तसंच ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दहापैकी तीन उमेदवार कोट्याधीश होते त्यांचं काय झालं हे देखील निकालानंतर कळू शकणार आहे. जिल्हा परिषद निवडणूक पार पडली आहे.आता प्रतीक्षा आहे ती निकालांची. दरम्यान या निवडणुकीच्या निकालानंतर कोट्याधीश उमेदवारांच्या यादीत भर पडते की घट होते हे पाहणंही महत्त्वाचं असेल.