शतकाहून अधिक काळ चाललेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं ९ नोव्हेबर २०१९ रोजी ऐतिहासिक निकाल दिला. वादग्रस्त जागेवर राम मंदिराचं निर्माण करण्यात यावं. यासाठी एक ट्रस्ट स्थापन करण्यात यावा. त्याचबरोबर मशीद उभारण्यासाठी आयोध्येत मोक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, असा निकाल दिला होता. या निकालानंतर वाराणसी आणि मथुरा येथील मशिदींच्या वादासंदर्भातील आंदोलन सुरु होणार का अशी चर्चा रंगू लागली होती. याच कालावधीमध्ये विश्व हिंदू परिषदेने १९९२ साली दिलेल्या ‘अयोध्या तो झाँकी है, काशी- मथुरा बाक़ी है’ चा नाऱ्याची पुन्हा चर्चा होऊ लागली. मात्र या नाऱ्यामध्ये समावेश असणाऱ्या काशी आणि मथुराचा वाद अनेकांना ठाऊकच नाही. हा वाद नक्की काय आहे?, कोणामध्ये आहे आणि त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय यावरच आपण नजर टाकणार आहोत.

संघाची भूमिका काय?

morarji desai drink urine
माजी पंतप्रधान मोरारजी देसाई खरंच ‘शिवांबू’ प्राशन करायचे? जाणून घ्या
Sita & Akbar: How names of two lions became the reason for a plea in Calcutta High Court
अकबराची बहीण लक्ष्मी? अकबर, सीता, तेंडुलकर आदी नावं प्राण्यांना द्यायची पद्धत कशी पडली?
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
Razmanama Mahabharata in Persian language
महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी राम जन्मभूमीसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काही वेळानंतरच मथुरा आणि वाराणसी आमच्या अजेंड्यावर नाही असं स्पष्ट केलं होतं. आंदोलन करणे हे संघाचे काम नाही. चरित्र आणि स्वयंसेवक निर्माण करणे हे संघाचे प्रमुख काम असून तेच काम संघ यापुढेही करत राहील असं भागवत यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं होतं. भागवत यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे धार्मिक स्थळांवरुन सुरु असणारा वाद शांत होण्यासंदर्भातील चिन्हे दिसत असल्याचे काही जाणकारांचे मत आहे. मात्र यासंदर्भात विश्व हिंदू परिषदेची भूमिका वेगळी असल्याचे अयोध्येमधील राम मंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने पुन्हा दिसून आलं आहे.

राम जन्मभूमी आंदोलनाच्या काळामध्ये खास करुन १९९२ साली बाबरी मशीद पाडल्यानंतर विश्व हिंदू परिषदेने ‘अयोध्या तो झाँकी है, काशी- मथुरा बाक़ी है’ चा नारा दिला होता. २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रामध्ये सत्तेत आल्यानंतर विश्व हिंदू परिषदेची भूमिका कुठेतरी मवाळ झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले बजरंग दलाचे सहसंस्थापक आणि भाजपचे राज्यसभेचे माजी सदस्य विनय कटियार यांनी आता पुढील लक्ष्य मथुरा आणि काशी असल्याचे म्हटले आहे. मात्र मथुरा आणि काशीचा नक्की वाद काय आहे हे अनेकांना ठाऊक नाही. तेच आपण या जाणून घेणार आहोत.

नक्की पाहा हे फोटो >> राम मंदिरासाठी खोदकाम करताना नक्की कोणते पुरातन अवशेष सापडले

काय म्हणाले  विनय कटियार?

विनय कटियार हे राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. राम मंदिर आंदोलनामधील महत्वाच्या नेत्यांपैकी एक असणारे कटियार हे त्यांच्या रोखठोक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. भाजपाचे फ्रायर ब्रॅण्ड नेता म्हणून ओळख असणाऱ्या कटियार यांनी आता अयोध्येनंतर काशी आणि मथुरेमधील मंदिरांसंदर्भात काम करणार असल्याचे म्हटले आहे. “मी राम मंदिरासाठी अनेक आघाड्यांवर आंदोलनं केली आहेत. खूप मोठा संघर्ष केल्यानंतर आम्ही इथपर्यंत पोहचलो आहोत. मुलायम सिंह यादव यांच्या सांगण्यावरुन आंदोलकांवर गोळीबारही झाला पण आम्ही थांबलो नाही. याचे संपूर्ण श्रेय हे अनेक कोटी कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि साधू संतांना जाते,” असं कटियार यांनी म्हटलं आहे.

“माझा जन्मच अयोध्या, काशी आणि मथुरेसाठी”

नरेंद्र मोदी हे जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून ते यासाठी प्रयत्न करत होते. ते या कार्यक्रमाला येत असल्याचा विशेष आनंद आहे असंही कटियार यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अयोध्या दौऱ्यावरुन काही लोकं उगच वाद निर्माण करत असल्याचेही कटियार यांनी म्हटलं आहे. राम जन्मभूमीचा प्रश्न सुटला असला तरी मथुरा आणि काशी येथील मंदिरांचा प्रश्न कायम असल्याचेही कटियार यांनी नमूद केलं आहे. “आधी काशीचा प्रश्न निकाली काढायाची की मथुरेचा यासंदर्भात आम्ही सर्वजण एकत्र बसून विचार करु. माझा जन्मच अयोध्या, काशी आणि मथुरेसाठी झाला आहे. मी आंदोलनांमध्ये सहभागी झाल्याने तुरुंगातही जाऊन आलोय. मात्र आम्ही कधीच वाकलो नाही आणि घाबरलो नाही,” असं कटियार यांनी म्हटलं आहे.

“…मग काशी आणि मथुरेचा विचार करु”

“काशी आणि मथुरा येथील मंदिर हे आमच्या अजेंड्याचा भाग नक्कीच आहे. मात्र त्यासाठी बराच काळ लागेल,” असं कटियार म्हणाले होते. तर भाजपाच्या अनेक नेत्यांबरोबर विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी अयोध्येत राम मंदिर बांधण्याला प्रथम प्राधान्य असेल असं मत व्यक्त केल्यासंदर्भात प्रश्न कटियार यांनी विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर मंदिराच्या बांधकामाला वेग येईल. सध्या तरी राम मंदिराच्या बांधकामापेक्षा इतर कोणत्याही गोष्टींना विशेष प्राधान्य दिलं जात असल्याचं मला वाटतं नाही. अयोध्येमध्ये शिलापूजन झाल्यानंतर आम्ही काशी आणि मथुरेचा विचार करु,” असं कटियार म्हणाले.

नक्की पाहा हे फोटो >> राम मंदिर भूमिपूजन: जाणून घ्या कोण कोण लावणार हजेरी आणि कोण राहणार गैरहजर

“भाजपाने राम मंदिर आंदोलनाची सुरुवात केली नव्हती. मात्र…”

काशी आणि मथुरा येथील मंदिरांसंदर्भात भाजपाच्या नेत्यांशी चर्चा सुरु असल्याचेही कटियार यांनी स्पष्ट केलं आहे. “काशी, मथुरा आणि अयोध्येमधील मंदिरांची आमची मागणी होती. काशी विश्वनाथ मंदिर, मथुरेमधील कृष्ण जन्मभूमी मंदिराच्या वादग्रस्त जागेवर तोडगा काढण्याची आमची मागणी होती. आता अयोध्या मिशन पूर्ण झालं आहे तसं काशी आणि मथुराही होईल,” असा विश्वास कटियार यांनी व्यक्त केला आहे.  तसेच “भाजपाने राम मंदिर आंदोलनाची सुरुवात केली नव्हती. मात्र नंतर यासंदर्भातील सहकार्य आणि नेतृत्व पक्षाने नक्कीच केलं,” असंही कटियार म्हणाले आहेत.

कटियार यांनी ज्या मथुरा आणि काशीसंदर्भातील वादाचा उल्लेख केला तो नक्की काय आहे जाणून घेऊयात.

काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद 

सन १९९१ मध्ये या प्रकरणाची पहिली ठिणगी पडली. वाराणसी येथील जिल्हा न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेमध्ये वाराणसी शहरामधील चौक परिसरात असणारी ज्ञानवापी मशीद ही अनधिकृत असल्याचा दावा करण्यात आला होता. मशिदीच्या जागी आधी मंदिर होतं. मुघल बादशाह औरंगजेबने आपल्या कार्यकाळामध्ये हे मंदिर पाडून येथे मशीद बांधल्याचा दावा या याचिकेत करण्यात आलं होतं. ही याचिका अस्टींट आयडल ऑफ स्वयंभू लॉर्ड विश्वेश्वरचे मित्र म्हणून वाराणसीच्या विजय शंकर रस्तोगी यांनी दाखल केली होती. अयोध्या येथील मंदिरावरुन सुरु असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आल्याचे सांगितले जाते.

नक्की वाचा >> टाइम्स स्क्वेअरवरील प्रभू रामांच्या प्रतिमेला मुस्लिमांचा विरोध ; जाहिरात कंपनीने घेतला ‘हा’ निर्णय

वाद कसा सुरु झाला?

ज्ञानवापी मशीद इंतजामिया कमिटीने दोन गोष्टींचा आधार घेत या याचिकेला विरोध केला. १९९१ साली धार्मिक स्थळांच्या संरक्षणासंदर्भातील कायदा लागू झाल्यानंतर अशा प्रकारचा खटला दाखल करता येणार नाही असं कमिटीने म्हटलं. तर दुसऱ्या मुद्द्यामध्ये देशाला स्वातंत्र मिळालं तेव्हापासून असणाऱ्या स्टेटसला म्हणजेच धार्मिक स्थळांसंदर्भातील परिस्थितीविरोधात न्यायलयामध्ये अर्ज करु शकत नाही अशी बाजू कमिटीने मांडली. वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने दोन्ही पक्षांचे ऐकून घेतल्यानंतर खटला दाखल करुन घेण्यास परवानगी दिली. या प्रकरणात १९९८ साली मशीद कमिटीने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. हा खटला दाखल करण्यात यावा या कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात याचिका करण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती आणली. तेव्हापासून या प्रकरण स्थगितच आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने एका आदेशामध्ये कोणत्याही प्रकरणात खटल्यासंदर्भातील कारभारावर लावण्यात आलेली स्थगिती ही सहा महिन्यापेक्षा अधिक काळ असेल आणि न्यायालयाने ती वाढवली नाही तर आधीच्या आदेशामध्ये स्थगिती देण्याचा निर्णय रद्द होतो. म्हणजेच सहा महिन्याहून अधिक काळ खटला स्थगित राहिला आणि न्यायालयाने काही निर्णय दिला नाही तर स्थगिती रद्द असल्याचे समजले जाते.

…आणि पुन्हा स्थगिती

सर्वोच्च न्यायालयामध्ये सहा महिन्यानंतर स्थगिती उठवली जाते यासंदर्भातील आदेश दिल्यानंतर अस्टींट आयडल ऑफ स्वयंभू लॉर्ड विश्वेश्वरच्यावतीने वाराणसीच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये पुन्हा याचिका दाखल केली आणि यासंदर्भात पुन्हा सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी केली. जिल्हा आणि सत्र न्यायालयाने या याचिकेला मंजूरी दिली. डे-टू-डे बेसेसवर म्हणजेच दररोज या खटल्याची सुनावणी करण्याचे आदेश याच वर्षी चार फेब्रुवारी रोजी न्यायालयाने जारी केले. कनिष्ठ न्यायालयाने मशीद कमिटीचा याचिका दाखल करुन घेण्यासंदर्भातील विरोध फेटाळून लावला. या निर्णयाविरोधात मशीद कमिटीने पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. २६ फेब्रुवारी २०२० रोजी झालेल्या सुनावणीमध्ये न्या. अजय भनोट यांच्या खंडपिठाने मशीर कमिटीचा विरोध योग्य असल्याचे सांगत कनिष्ठ न्यायालयाने याचिका दाखल करुन घेण्याच्या निर्णयावर स्थगिती आणण्याचे आदेश दिले. ज्ञानवापी मशीद ही वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदिर परिसरामध्ये आहे. या मशिदीचा वादही अयोध्या वादाप्रमाणे खूप जुना आहे.  या प्रकरणाच्या स्थगितीला ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सहा महिने होणार असल्याचे पुन्हा या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

नक्की पाहा खास फोटो >> अयोध्या सजली… शहरातील घरं, रस्ते, दुकानं सारं काही ग्राफिटी पेंटिगने नटली

 

मथुरा कृष्ण जन्मभूमी आणि ईदगाह वाद

मथुरा येथील कृष्ण जन्मभूमीच्या अर्ध्या भागावर ईदगाह आहे. इसवी सन पूर्व ८०-५७ दरम्यान या ठिकाणी पहिल्यांदा मंदिर बांधण्यात आल्याचं सांगितलं जातं. हे मंदिर १०१७-१८ मध्ये महमूद गजनवीने तोडलं. महाराज विजयपाल देव यांच्या कार्यकाळामध्ये सन ११५० रोजी इथे परत मंदिर बांधण्यात आलं. १६६० साली औरंगजेबने या मंदिराची नासधूस केली. या मंदिर परिसराच्या एका भागामध्ये याच काळात ईदगाह बांधण्यात आली. मात्र या दाव्यांबद्दल इतिहासाचे अभ्यास आणि तज्ज्ञ मंडळी प्रश्न उपस्थित करतात. कारण येथील मंदिर पाडून त्या जागी दुसऱ्या धर्मियांचे प्रार्थनास्थळ उभारण्यात यावे असा आदेश ओरंगजेबने दिल्याचा कोणताही पुरावा अद्याप सापडलेला नाही. सध्या या ठिकाणी ईदगाह आणि कृष्ण जन्मभूमी मंदिर अशा दोन्ही गोष्टी अस्तित्वात आहेत.

“काय होणार आहे ते आपण येणाऱ्या काळामध्ये…”

काशीमधील ज्ञानव्यापी मशीद आणि मथुरेमधील ईदगाह या दोन्ही वास्तू धार्मिक स्थळांसंदर्भातील १९९१ च्या कायद्यानुसार संरक्षित वास्तू आहेत, यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता कटियार यांनी ‘असू द्या ना संरक्षित’ असं उत्तर दिलं. “या ठिकाणाहून मशीद हटवावी लागेल. काय होणार आहे ते आपण येणाऱ्या काळामध्ये बघुयात,” असं उत्तर कटियार यांनी आऊटलूकशी बोलताना दिलं.