26 January 2021

News Flash

समजून घ्या : काय आहे करोनाचा नवा प्रकार?

लसीवर होऊ शकतो का परिणाम?

संग्रहित छायाचित्र/एपी

करोना महामारीने जगभरात थैमान घातलं आहे. अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेत करोनावर लस आल्यानं आशेचा किरण दिसू लागला आहे. असं असतानाच करोनानं पुन्हा एकदा जगाची झोप उडवली आहे. अनेक देशांनी करोना लसींच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी दिलेली असताना करोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे. करोनाचा विषाणू स्वरूप बदलत असून, करोनाच्या या नव्या प्रकाराचे रुग्ण ब्रिटनमध्ये मोठ्या संख्येनं आढळून येत आहेत. त्यामुळे आता करोनाचा हा नवा प्रकार आहे तरी काय उपस्थित होऊ लागला आहे.

हळूहळू जगभर हातपाय पसरत गेलेल्या करोनाच्या लक्षण वाढत असल्याचं दिसून आलं. पण, आता करोनाचा नवा प्रकार समोर आला आहे. करोनानं स्वरूप बदललं असून, करोनाच्या या नव्या प्रकाराचा प्रसाराचा वेग प्रचंड असल्यानं ब्रिटनं हादरलं आहे. वेगळ्या स्वरूपाच्या या करोनामुळे लोक वेगानं संक्रमित होत असून, ब्रिटननं प्रसार रोखण्यासाठी पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागू केला आहे. साधारणतः विषाणू सतत आपलं रुप बदलत असतात. त्यालाच इंग्रजीमध्ये म्युटेट करणं असं म्हटलं जात. त्यामुळे आजारांच्या विषाणूंवर शास्त्रज्ञांकडून नजर ठेवली जाते. करोना विषाणूनंही स्वरूप बदललं असून, नवा प्रकार बघायला मिळत आहे. तर अशा स्वरूपाच्या महामारीमध्ये विषाणूचं रुप बदलेलं दिसून सामान्य बाब आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेचे आपातकालीन प्रमुख माईक रायन यांनी म्हटलं आहे.

करोनाच्या या नव्या प्रकारामुळे जगभर चिंता पसरण्याच महत्त्वाच कारण आहे, त्याचा प्रचंड वेगानं होणारा प्रसार. हा विषाणू वेगानं एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होत आहे. असं म्हटलं जात आहे की, विषाणूच्या अंतर्गत महत्त्वाच्या भागात हा बदल होत आहे. प्रयोगशाळेमध्ये निरीक्षण करण्यात आलेल्या काही म्युटेशन्समध्ये (विषाणूचं बदलेलं रुप) असं दिसून आलं की, त्यांची मानवी पेशी संक्रमित करण्याची क्षमता वाढत आहे. यामुळेच जगाची चिंता वाढली आहे. कारण करोनाचा हा प्रकार अधिक वेगानं प्रसारित होण्याकडे इशारा करत आहे. हा अद्याप प्राथमिक अंदाज असून, अजून याविषयी अभ्यास केला जात आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी याविषयी बोलताना म्हटलं होतं की, “तूर्तास याविषयी ठोस माहिती नाही. पण हे करोना संक्रमणाचं कारण बनत आहे. पूर्वीपेक्षा ७० टक्के अधिक संक्रमण होऊ शकतं. आताच त्याविषयी बोलणं घाईचं होईल. पण आम्ही जे बघितले आहे, त्यावरून असं दिसतंय की पूर्वीच्या प्रकारांपेक्षा हा विषाणूनं वेगानं पसरत चालला आहे. त्यावर नजर ठेवणं गरजेचं आहे,” अशी भीती जॉन्सन यांनी व्यक्त केली आहे. उत्तर आयर्लंड वगळता संपूर्ण ब्रिटनमध्ये हा व्हायरस पसरला आहे. महत्त्वाचं म्हणजे लंडन आणि दक्षिण आणि पूर्व इंग्लंडमध्ये करोनाच्या नव्या प्रकाराचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. जेनेटिक कोडचा अभ्यास करणाऱ्या नेक्सस्ट्रेन या संस्थेच्या आकडेवारी असं दिसून येतं की डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियामध्येही हा व्हायरस आढळून आला आहे. नेदरलँडमध्येही करोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. दक्षिण आफ्रिकेतही व्हायरसच्या या नव्या प्रकाराशी मिळता जुळता एक व्हायरस आढळून आला आहे. पण, त्याचा ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या व्हायरसशी संबंध नसल्याचं सांगितलं जात आहे.

लसींचं काय होणार?

नव्या व्हायरसमुळे सध्या तयार करण्यात आलेल्या करोना लसींच्या परिणामाबद्दल प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. ब्रिटनमध्ये तीन लसींना मान्यता देण्यात आलेली आहे. त्यांचा परिणाम या विषाणूवर होऊ शकतो. कारण या लसींमुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते, ज्यामुळे या व्हायरसवर मात करता येऊ शकते. मात्र, कँब्रिज विद्यापीठातील प्रा. रवि गुप्ता यांनी या व्हायरसला म्युटेट (नवं रुप) होऊ दिलं तर चिंता वाढू शकते. हा व्हायरस लसींपासून वाचण्याच्या सीमेवर आहे. तो त्या दिशेनं जाऊ लागला आहे,” असं गुप्ता यांनी म्हटलं आहे. तर ब्रिटनमधील ग्लास्गो विद्यापीठातील प्राध्यापक डेव्हिड रॉर्बटसन म्हणाले,”असंही होऊ शकतं की, विषाणू लसीच्या प्रभावापासून वाचवू शकेल, असं म्युटेंट बनवेल.” असं होण्याची शक्यता असेल, तर महत्त्वाची बाब अशी की, सध्या ज्या लसी तयार करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बदल करणे फार कठीण जाणार नाही, असं संशोधक सांगत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2020 8:15 am

Web Title: explained concern over new strain what is coronvirus covid variant mutation bmh 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 समजून घ्या : Boxing Day Test म्हणजे काय??
2 Explained: अमेरिकेने टर्कीवर निर्बंध लादल्यानंतर भारतही झाला सतर्क, काय आहे कारण?
3 Explained: कृषी कायद्यांसाठी मोदी सरकारला कोणत्या शेतकरी संघटनेचा पाठिंबा; जाणून घ्या
Just Now!
X