28 February 2021

News Flash

समजून घ्या : हिंसाचारामुळे चर्चेत आलेली ‘शीख फॉर जस्टिस’ आहे तरी काय?

'शीख फॉर जस्टीस'वर भारतात बंदी कधी आली?

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत उसळलेल्या हिंसाचाराती हे दृश्य. (छायाचित्र संग्रहितःइंडियन एक्स्प्रेस)

दिल्लीत पेटलेल्या आंदोलनाच्या चर्चेची धग अजूनही कायम आहे. लाल किल्ल्यासह दिल्लीतील विविध भागात झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात काही जणांनी नावही चर्चेत आहे. शेतकरी नेत्यांनी पंजाबी गायक आणि अभिनेता दीप सिद्धू याच्यावर आरोप केले आहेत. तर दुसरीकडे ‘शीख फॉर जस्टीस’ (SFJ) ही संघटनाही चर्चेत आली आहे. अचानक चर्चेत आलेल्या संघटनेबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू असताना अधूनमधून शीख फॉर जस्टीस हे नाव चर्चेत येऊ लागलं होतं. या संघटनेवर भारतात बंदी आहे. मात्र, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर रॅली काढू देण्याची मागणी या संघटनेनं केली होती. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनी दिल्लीत हिंसा झाली, तर त्याला सरकारच जबाबदार असेल, असंही या संघटनेनं म्हटलं होतं. तेव्हापासून शीख फॉर जस्टीसच्या नावाची चर्चा सुरू झाली.

काय आहे शीख फॉर जस्टीस?

शीख फॉर जस्टीस अमेरिकेत उदयाला आली. २००७ मध्ये संघटनेची स्थापना झाली. पंजाबमध्ये खलिस्तान निर्माण करण्याचा या संघटनेचा हेतू आहे. पंजाबमध्ये विद्यापीठातून वकिलीची पदवी घेतलेले आणि अमेरिकेत वकिली करत असलेले गुरपतवंत सिंह पन्नू हे शीख फॉर जस्टीसचा प्रमुख चेहरा आहेत. पन्नू नेहमी चर्चेतमध्ये असतात. गुरपतवंत सिंह यांनीच प्रजासत्ताक दिनी हिंसाचाराचा इशारा दिला होता. मागील वर्षीही शीख फॉर जस्टीसने एक कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न केला होता. या कार्यक्रमात जगभरातील शीख बांधवांना सहभागी होण्याचं आणि खलिस्तानच्या प्रचार मोहिमेला प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं होतं.

‘शीख फॉर जस्टीस’वर भारतात बंदी?

२०१९मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने शीख फॉर जस्टीसवर बंदी घातली होती. भारतविरोधी मोहीम चालवत असल्याचा आरोप या संघटनेवर ठेवण्यात आला होता. UAPA कायद्यानुसार या संघटनेवर बंदी घालण्यात आलेली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे शीख फॉर जस्टीस पंजाबमध्ये शेतकऱ्यांना चिथावणी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर जगात विविध ठिकाणी खलिस्तानची मागणी करत आंदोलन करत आहे. ज्यामुळे भारताची प्रतिमा मलिन होत असल्याचं केंद्रानं म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2021 3:38 pm

Web Title: explained farmer protest update what is sikhs for justice group banned in india khalistani farmers protest tractor parade violence bmh 90
Next Stories
1 जाणून घ्या : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना नक्की किती पगार मिळतो?; इतर कोणत्या सुविधा त्यांना दिल्या जातात?
2 समजून घ्या : नोव्हेंबरमध्ये निवडणूक जिंकल्यानंतरही २० जानेवारीलाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष का घेतात शपथ?
3 समजून घ्या : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पहिल्याच भाषणाचे भारतीय कनेक्शन
Just Now!
X