IND vs NZ WTC Final: भारत आणि न्यूझीलंडमध्ये साऊदम्पटन येथे जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी सुरु असलेल्या सामन्याकडे सध्या संपूर्ण जगातील क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. सामना रंगतदार होत असला तरी पावसामुळे क्रिकेटप्रेमींची निराशा झाली आहे. इंग्लंडमधील वातावरणामुळे सामन्याचा पहिला आणि चौथा दिवस पूर्णत: वाया गेला. तसंच अंधूक प्रकाशामुळेही खेळात अनेकदा व्यत्यय आला. यामुळे आयसीसीने जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या सामन्यासाठी इंग्लंडची निवड करण्यावरुन अनेकजण प्रश्चचिन्ह उपस्थित करत आहेत. तसंच अंतिम विजेता निवडण्यासाठी तीन कसोटी सामने खेळवावेत का? याबाबतही विचारणा होत आहे.

आयसीसीने वेळेच्या बंधनामुळे तीन कसोटी सामने खेळवत अंतिम विजेता निवडण्याची शक्यता नाकारला आहे, तसंच संचालक मंडळानेही इंग्लंडमध्ये अंतिम सामना खेळवण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे.

पण इंग्लंडची निवड कशासाठी?

जेव्हा आयसीसीने दोन वर्षांपूर्वी जागतिक कसोटी अजिंक्यपदाची घोषणा केली तेव्हा बोर्डाच्या सदस्यांना एकमताने इंग्लंडमध्ये सामना खेळवण्याचा निर्णय घेतला होता. यामागे मुख्यत्वे दोन कारणं होती. एक म्हणजे जूनच्या अखेरीस इंग्लंडमध्ये क्रिकेटचा हंगाम असतो आणि इंग्लंडपासून दूर फार कमी पर्याय शिल्लक होते.

अनिर्णित लढतीत विजेता ठरवण्याचे सूत्र आवश्यक!

पीटरसनची जाहीर नाराजी

“हे बोलताना मला खूप दुख: होत आहे, मात्र इतका महत्वाचा सामना युकेमध्ये खेळवता कामा नये,” असं परखड मत इंग्लंड संघाचा माजी कर्णधार केविन पीटरसनने ट्विट करत मांडलं आहे. “जर माझ्या हातात असतं तर जागतिक कसोची अजिंक्यपदासारख्या सामन्यासाठी दुबईची निवड केली असती. उत्तम स्टेडिअम, हवामानाची खात्री, प्रशिक्षणाच्या सर्वोत्तम सुविधा आणि फिरण्याची जागा!…आणि हो आयसीसीचं कार्यालय स्टेडिअमच्या बाजूलाच आहे”.

पण दुबईत सामना खेळवणं शक्य होतं का?

पीटरसनने दुबईचा पर्याय सुचवला असला तरी सध्या तिथे असणारी उप्षता खेळाडूंसाठी असह्य अशी आहे. दुबईसत सध्या ४० डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान आहे आणि अशा स्थितीत तिथे दिवसा सामाना खेळणं अशक्यप्राय आहे. दुसरीकडे भारतात करोनाची दुसरी लाट जरी नसती तरी सध्या पावसाळा असल्याने क्रिकेटचा हंगाम नसतो. तर दुसरीकडे साऊदम्पटनमध्ये हे थंडीचे महिने आहेत.
तसंच इंग्लंडमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात स्थानिक क्रिकेट खेळलं जात आहे. न्यूझीलंडनेही जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या सामन्याआधी दोन कसोटी मालिका इंग्लंडमध्ये खेळल्या आहेत.

‘‘आता हे सर्व सहन होण्यापलीकडे गेलंय”, दिनेश कार्तिकला आला राग

लॉर्ड्सच्या जागी साऊदम्पटनची निवड का ?

जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अखेरचा सामना खरं तर लॉर्ड्समध्येच खेळवला जाणार होता. मात्र अनेक गोष्टींमुळे हा सामना लॉर्ड्सच्या जागी साऊदम्पटनला खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, करोनाच्या संकटात खेळ सुरक्षितपणे व्हावा यासाठी आयसीसीने जानेवारी महिन्यात हा निर्णय घेतला. जानेवारी महिन्यात युकेमध्ये पूर्णपणे लॉकडाउन करण्यात आला होता.
साऊदम्पटनमध्ये टीम हॉटेल तसंच अत्यंत सुरक्षित वातावरण अशा सुविधा उपलब्ध आहेत. भारत आणि न्यूझीलंड संघाच्या सर्व प्रशिक्षण सुविधा बबलमध्येच आहेत. तसंच भारताला संघांतर्गत सामने खेळण्यासाठी नर्सरी ग्राऊंडदेखील मिळालं आहे.

IND vs NZ ICC World Test Championship Final Live Score, World Test Championship Final 2021 Scorecard in Marathi
(AP Photo: Ian Walton)

युकेमधील क्वारंटाइनचे नियम पाहता पर्याय होता का?

नाही. भारतातील करोना स्थिती बिघडल्याने युके सरकारने देशाला रेड लिस्टमध्ये टाकलं होतं. याचा अर्थ भारतीय संघाला इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर १० दिवसांच्या क्वारंटाइनमध्ये राहणं बंधनकारक होतं. तसंच दिवसातील फक्त २० मिनिटं व्यायाम करण्याची परवानगी होती. मिळालेल्या माहितीनुसार, आयसीसीने युके सरकारसोबत वाटाघाडी करत क्वारंटाइन पाळण्यासाठी ऑन साईट हॉटेल देण्याची विनंती केली होती जेणेकरुन भारतीय संघ सामन्याच्या ठिकाणी क्वारंटाइन राहील आणि बायो सुरक्षित वातावरणात ट्रेनिंही करता येईल. अंतिम सामना लॉर्ड्सवर असता तर हे शक्य झालं नसतं.

साऊदम्पटन इंग्लंडमधील सर्वात आर्द्र ठिकाणांपैकी एक आहे का?

याचं उत्तरही नाही असंच आहे. वस्तुस्थिती पाहता हॅम्पशायर काउंटी क्रिकेट क्लबचं माहेरघर असणारी दक्षिण किनारपट्टी देशातील सर्वात कोरडं ठिकाण आहे. climate-data.org च्या डेटानुसार, साऊदम्पटनमध्ये जून महिन्यात साधारणत: २.३ इंच पाऊस पडतो. लंडनमध्ये हे प्रमाण २.४ इंच आहे. आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, साऊदम्पटन असणारं पावसाळी वातावरण हे पूर्णत: वाईट नशीबाचा भाग आहे. गेल्या १० वर्षात पहिल्यांदा खराब वातावरणामुळे कसोटी सामन्याचे दोन दिवस वाया गेले आहेत असंही त्यांनी सांगितलं.

अजिंक्यपदासाठी तीन सामन्यांची मालिका खेळवण्यास आयसीसीचा नकार का?

जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा विजेता निवडण्यासाठी तीन सामने खेळवण्याची गरज होती असं मत व्यक्त केलं जात आहे. “दूरपर्यंतचा विचार केल्यास जगभरात अडीच वर्षात खेळल्या गेलेल्या क्रिकेटची पराकाष्ठा म्हणून तीन सामन्यांमधून विजेत्याची निवड कऱणं योग्य आहे. पण आगामी दौरे सुरु होणार असल्याने आम्हाला हे शक्य तितक्या लवकर संपवायचं आहे,” असं भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितलं आहे.

पण भविष्यात होणाऱ्या दौऱ्यांची कारणं देत आयसीसी तीन सामन्यांची मालिक खेळण्याच्या पर्यायापासून पळ काढू शकत नाही. “तीन सामने खेळवणं अजिबात पर्याय नाही. प्रत्येत संघाला त्यांचा संपूर्ण एक महिना त्यासाठी द्यावा लागेल,” असं आयसीसीच्या प्रवक्त्याने इंडियन एक्प्रेसशी बोलताना म्हटलं आहे.

२०२४ ते २०३१ दरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपदाचे चार अंतिम सामने खेळवले जाणार असून हे सर्व एका सामन्यापुरतेच मर्यादित असतील.