12 July 2020

News Flash

समजून घ्या सहजपणे…Coronavirus चा उपचार आरोग्य विम्यातून होतो का?

करोनाचा वाढत्या प्रदुर्भावामुळे लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

Health Insurance covers Corona Virus : चीन येथील वुहानमधून पसरलेल्या करोना विषाणू प्रदुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO)ने करोनाला महामारी असं घोषित केलं आहे. भारतामध्येही करोनानं आपला प्रदुर्भाव दाखवण्यास सुरूवात केली आहे. दररोज नवनवे करोना बाधित रूग्ण समोर येत असून करोना बाधितांची संख्या वाढतच आहे. करोनाचा वाढत्या प्रदुर्भावामुळे लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. सर्दी-खोकला आणि तापासारख्या लक्षणांमुळे होणारा हा आजार आरोग्य विम्यात येतो का? करोना हा आजार आरोग्य विम्यात येतो का? जाणून घेऊयात काय म्हणातात तज्ञ्ज ?

उपचाराचा वाढता खर्च आणि विम्याबद्दल वाढती जागरूकता या दोन कारणांमुळे आरोग्य विमा पॉलिसी घेण्याऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. हेल्थ इन्शुरन्स सेक्टरमधील तज्ञ्जांच्या मते, करोना विषाणूचा प्रदुर्भाव वाढण्यापूर्वीच जर तुमच्याकडे एखादी आरोग्य विमा पॉलिसी असल्यास करोना ही महामारी या विम्यात येते. पण जर तुम्ही करोनाच्या चपाट्यात आल्यानंतर आरोग्य विमा घ्यायचा विचार करत असाल तर हा आजार आरोग्य विम्यात येत नाही.

समजा तुम्ही आता आरोग्य विमा खरेदी केला आणि तुम्हाला करोना झाला तरीही तुम्ही आरोग्य विम्यात येत नाही. तुमच्यावर होणारे उपचार आरोग्य विम्याच्या आधिरिख्यखाली येत नाही. तज्ञ्जांच्या मते, आरोग्य विम्याच्या नियमांनुसार, आरोग्या विमा खरेदी केल्यानंतर ३० दिवसांनंतर आरोग्या विम्याअंतर्गत उपचार होऊ शकतात. पण, एखाद्या मोठ्या दुर्घटनेत हा नियम लागू होत नाही. पण आजारपणाला हा नियम लागू होतो.

करोना व्हायरसलाही डेंगू, मलेरिया यासारख्या इतर अचानक होणाऱ्या आजारातच आरोग्य विम्याअंतर्गत कव्हर केलं जाते. करोना हा अचानक उद्भवलेली महामारी आहे. त्यामुळे इतर अप्रत्यक्ष होणाऱ्या आजारांप्रमाणेच आरोग्य विम्यात कव्हर केलं जाणार आहे. पण तुमच्याकडे आधीच आरोग्य विमा असणं आवश्यक आहे. किंवा तुम्हाला आरोग्य विमा घेतल्यानंतर ३० दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2020 2:39 pm

Web Title: health insurance covers corona virus treatment or not know all about it nck 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : समजून घ्या… सहजपणे – किती भयानक वेगानं पसरतोय करोना?
2 Coronavirus: समजून घ्या सहजपणे… ‘विलगीकरण’ म्हणजे काय?
3 Coronavirus : समजून घ्या सहजपणे… किती वेळ लागेल लस शोधायला?
Just Now!
X