भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पिंक बॉलवरील कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. भारताचा हा फक्त दुसरा दिवस-रात्र कसोटी सामना आहे. याआधी भारतीय संघ बांगलादेश विरोधात मायदेशात सामना खेळला होता. पण विदेशात पिंक बॉलवर भारताचा हा पहिलाच कसोटी सामना आहे. त्यामुळे या दिवसरात्र सामन्यात भारतीय संघाची कसोटी आहे. डे-नाईट कसोटी सामन्यात पिंक बॉलचा वापर केव्हापासून झाला आणि त्यामध्ये बदल काय झाला याबबात थोडक्यात जाणून घेऊयात….

१) दिवस-रात्र कसोटी सामने हे गुलाबी चेंडूवर खेळवले जातात.

२) २००९ साली इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघाच्या वन-डे सामन्यात पहिल्यांदा गुलाबी चेंडूचा प्रयोग करण्यात आला.

३) जानेवारी २०१० मध्ये अँटीगा येथे गयाना विरुद्ध त्रिनीदाद अँड टोबॅगो यांच्यात पहिला प्रथमश्रेणी सामना गुलाबी चेंडूवर खेळवण्यात आला.

४) यादरम्यान इतर देशही गुलाबी चेंडूवर क्रिकेट सामने खेळवण्याचा प्रयोग करुन पाहत होते.

५) २०१४ साली पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात शेफील्ड शिल्ड स्पर्धेचे सामने ‘कुकाबुरा’ च्या गुलाबी चेंडूवर खेळवण्यात आले.

६) भारतानं दिवस-रात्र कसोटी सामन्याचा प्रयोग १९९६ – ९७ मध्ये केला आहे. रणजी क्रिकेट स्पर्धेत मुंबई आणि दिल्ली यांच्यात पहिल्यांदा दिवस-रात्र कसोटी सामना खेळला होता. यामध्ये मुंबईच्या संघानं विजय मिळवला होता. पण त्यानंतर भारतीय संघानं पिंक बॉलवर कसोटी सामना खेळण्यास वेळ घेतला. २०१८ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही भारतीय संघाला पिंक बॉल खेळण्यासंदर्भात विचारणा करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी भारतानं नकार दिला. त्यानंतर २०१९ मध्ये भारतीय संघानं पहिल्यांदा पिंक बॉलवर कसोटी सामना खेळला. इडन गार्डनवर झालेल्या या सामन्यात भारतानं बांगलादेशचा पराभव केला होता.

७ ) २०१२ मध्ये आयसीसीनं दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्याची परवानगी दिली होती.

८) २०१५ मध्ये पहिला दिवस-रात्र कसोटी सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा ३ गड्यांनी पराभव केला होता. हा पहिला दिवस-रात्र कसोटी सामना एडिलेड येथील मैदानावर झाला होता.

८) भारत, इंग्लंड, आयर्लंड आणि वेस्ट इंडीज वगळता सर्व देशांसाठी क्रिकेट बॉल बनवणाऱ्या कुकाबुराच्या गुलाबी रंगाबाबत एकमत होण्यापूर्वी पिवळ्या व चमकदार केशरी रंगाचा प्रयोग केला.

९ ) प्रकाशाखाली खेळताना लाल चेंडू व्यवस्थित दिसत नस्लायमुळे दिवस-रात्र कसोटी सामन्यात त्याचा वापर करण्यात येत नाही. त्या तुलनेत गुलाबी चेंडू व्यवस्थित हाताळता येतो. लाल चेंडूचा वापर न करण्याचं कारण होतं. दरम्यानच्या काळात पांढर्‍या चेंडूला प्राधान्य दिले गेले नाही कारण तो कसोटी क्रिकेटसाठी टिकाऊ नाही.

१० ) लाल, पांढरा आणि गुलाबी रंगाचा चेंडू सारखेच आहेत. फक्त लेदरच्या पिंक बॉलसाठी गुलाबी रंगाचा लेप लावण्यात आलेला असतो.

११ ) सामन्याच्या सुरुवातीला इतर चेंडूच्या तुलनेत पिंक बॉल जास्त स्विंग होतो.

१२ ) कुकाबुराच्या पिंक चेंडूवर काळी शिवण असते. याआधी गडद हिरव्या आणि पांढऱ्या रंगाची शिवण होती. २०१६ मध्ये झालेल्या पहिल्याच दिवस-रात्र कसोटी सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ म्हणाला होता की, चेंडूवरील शिवण आधिक चांगल्या प्रकारे दिसायला हवी. तेव्हापासून कुकाबुराच्या चेंडूला काळी शिवण करण्यात येत आहे.