-सुशांत मोरे

मुंबईत मोबाइल ॲप आधारित वातानुकूलित टॅक्सीकडे असलेला प्रवाशांचा ओढा आणि स्पर्धेमुळे रिक्षा, टॅक्सीचे आर्थिक कंबरडे मोडले. तर बेस्ट उपक्रमाचेही प्रवासीही वळते झाले. मात्र त्यानंतर बेस्ट उपक्रमानेच वातानुकूलित बस दाखल करून स्वस्तात प्रवास उपलब्ध केला आणि पुन्हा प्रवासी बेस्टकडे वळू लागले. अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी तिकीटविरहित आणि मोबाइल ॲपवर आधारित सेवा बेस्टेने सुरू केली. बेस्टने विजेवरील दुचाकी मुंबईकरांच्या सेवेत देखल केल्यानंतर आता प्रीमियम बस आणि ओला, उबरप्रमाणे टॅक्सी सेवा (App based taxi service from BEST) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबईकरांना प्रवासासाठी वेगवेगळ्या साधनांचे पर्याय उपलब्ध होणार आहेत.

Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
Wrist ticket, Metro 1, Mumbai,
मुंबई : ‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी मनगटी तिकिटाचा पर्याय, एमएमओपीएलकडून नवीन तिकीट सेवा कार्यान्वित
Air India Air Transport Services jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती! ‘या’ पदांवर होणार भरती
WhatsApp New Update Company offers UPI payment feature in India like Google Pay and PhonePe
व्हॉट्सअ‍ॅप करणार इतर पेमेंट ॲप्सशी स्पर्धा; युजर्ससाठी सुरू करणार ‘ही’ नवी UPI सेवा…

बेस्टचा विजेवरील दुचाकीचा प्रयोग काय आहे?

प्रवासी बसमधून उतरताच त्यांना गंतव्य स्थानी पोहोचण्यासाठी तात्काळ वाहतुक सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी बेस्ट उपक्रमाने मुंबईत विजेवरील दुचाकी सेवा जून २०२२ मध्ये सुरू केली. प्रथम अंधेरीत ४० ठिकाणी हा प्रयोग सुरू केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर या दुचाकी सेवांचा विस्तार करून अंधेरी, विलेपार्ले, खार, सांताक्रुझ, जुहू, वांद्रे, माहीम, दादर भागात विजेवरील दुचाकी सेवा सुरू करण्यात आली. मुंबईतील प्रमुख बस थांबे, व्यावसायिक क्षेत्रे, निवासी क्षेत्रे, इत्यादींना ही सेवा जोडण्याचा प्रयत्न बेस्ट उपक्रम करत आहे. या दुचाकीचा वेग प्रतितास २५ किलोमीटर आहे. प्रति तीन किलोमीटर प्रवासासाठी २० रुपये मूळ भाडे आणि प्रत्येक मिनिटाला दीड रुपये आकारले जातात. ही दुचाकी वापरण्यासाठी प्रवाशांना वोगो ॲपचा पर्याय आहे. सध्या विजेवरील ७०० दुचाकी सेवेत असून आणखी एक हजार दुचाकींची भर दोन महिन्यात पडणार आहे. जून २०२३ पर्यंत विजेवरील धावणाऱ्या बेस्ट दुचाकींचा ताफा पाच हजारपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

वातानुकूलित प्रीमियम बस सेवा नेमकी कशी असणार ?

बेस्ट उपक्रम मोबाइल ॲप आधारित आरक्षित होणारी वातानुकूलित विजेवर धावणारी प्रीमियम बस सेवा सुरू करणार आहे. मोबाइल ॲपद्वारे प्रवाशांना बसचा मार्ग, वेळ, त्या मार्गावर आणखी किती बस आहेत याची माहिती मिळणार आहे. त्यानुसार नियोजन करुन प्रवासी बसमधील आसन आरक्षित करू शकतील. त्याच्या तिकीटाची रक्कमही ऑनलाइन भरू शकतील. त्यामुळे प्रवाशांचा प्रवासाचा बराचसा वेळ वाचेल व प्रवास सुकर होईल. या बसमध्ये आसन आरक्षित करूनच प्रवास करता येणार आहे. प्रिमियम २०० बस टप्प्याटप्प्यात प्रवाशांच्या सेवेत येणार असून त्यातील २० प्रीमियम बस बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. पुढील आठवड्यापासून ही सेवाही प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. प्रीमियम सेवा प्रथम बीकेसी ते ठाणे आणि खारघर ते बीकेसी मार्गांवर धावणार आहे. मुंबई महानगरात सध्या मोबाइल ॲप आधारित खासगी कंपन्यांच्या टॅक्सी आरक्षित करता येतात. याशिवाय ‘सिटी फ्लो’ सह अन्य काही बस कंपन्यांनीही स्वस्तात वातानुकूलीत सेवा सुरू केली आहे. त्यामुळे प्रीमियम बस सेवेत आणल्यास बेस्टला या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बरीच कसरत करावी लागणार आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण: इराणने ‘मोरॅलिटी पोलीस’ अचानक बरखास्त करण्याचे कारण काय? हे बदलाचे लक्षण आहे की धूळफेक?

बेस्टच्या टॅक्सी सेवेचा स्पर्धेत टिकाव लागणार का?

मोबाइल ॲपवरून आरक्षित केल्या जाणाऱ्या ओला, उबरसह अन्य खासगी टॅक्सी कंपन्यानी निर्माण केलेल्या स्पर्धेमुळे बेस्ट उपक्रमानेही या स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मोबाइल ॲप आधारित बेस्टची ई-वातानुकूलित टॅक्सी सेवा नव्या वर्षात सुरू होणार असून ५०० टॅक्सी जून २०२३ पर्यंत दाखल होतील. या टॅक्सीवर बेस्टचा लोगो असेल. एका प्रवाशाने टॅक्सी आरक्षित करण्याबरोबरच भागीदारीत म्हणजे शेअर टॅक्सी म्हणूनही त्या उपलब्ध होतील. मुंबईसह महानगरात काळ्या पिवळ्या रिक्षा, टॅक्सी मोठ्या संख्येने धावतात. मुंबईत ३५ हजारपेक्षा अधिक टॅक्सी तर संपूर्ण मुंबई महानगरात ५० हजार टॅक्सी आहेत. दोन लाखांहून अधिक रिक्षा आहेत. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार या भागात मिळून एकूण चार लाखांहून अधिक रिक्षा धावतात. मीटरवर आणि शेअरमध्ये धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सींना प्रवाशांची पसंती असली तरीही या सेवेविरोधात तक्रारींचा भडीमार परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांकडे होतो. भाडे नाकारणे, जादा भाडे घेणे इत्यादी मनमानी कारभारामुळे त्रासलेल्या प्रवाशांना ओला, उबरसह अन्य ॲग्रीगेटर कंपन्यांच्या मोबाइल ॲप आधारित टॅक्सींचा पर्याय उपलब्ध झाला. सध्या मुंबई महानगरात ५० हजाराहून अधिक ॲप आधारित टॅक्सी धावत असल्याचा अंदाज आहे. यापुढे बेस्ट उपक्रमही अशा स्वरूपाची सेवा देईल. मात्र या स्पर्धेत टिकून राहण्याचे आव्हान बेस्ट उपक्रमासमोर असेल. बेस्टची टॅक्सी सेवा ही तुलनेने स्वस्त असेल.

वॉटर बसचा प्रवासही अनुभवता येणार?

जमीन आणि पाणी या दोन्हीकडे धावणाऱ्या ‘वॉटर बस’चा पर्यायही बेस्टच्या विचाराधीन आहे. प्रदूषणमुक्त आणि झटपट प्रवासासाठी बेस्ट उपक्रमाने दोन प्रकारच्या बसचा पर्याय समोर ठेवला आहे. पहिला पर्याय अ‍ॅम्फिबियस बसचा असून जी जमिनीवर आणि पूर्णत: पाण्याखालून प्रवास करून पुन्हा जमिनीवर येते. दुसऱ्या पर्यायामध्ये ही बस जमिनीवर आणि त्यानंतर पाण्यावर तरंगत पुढे जाते आणि पुन्हा जमिनीवर येऊ शकते. मुंबईतून बेलापूर, जेएनपिटी, उरणपर्यंत ही सेवा असेल. त्यासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, मुंबई पोर्ट ट्रस्ट, शिपिंग मिनिस्ट्री यामध्ये सहभागी होणार आहे. ही सेवाही ॲप आधारित करण्याचा विचार आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण: सायबर फसवणुकीतील रक्कम कशी वाचवावी? ‘गोल्डन अवर’ का महत्त्वाचा?

डबल डेकर बसचे आकर्षण?

बेस्टच्या वातानुकूलित एकमजली बस गाड्यांना प्रवाशांनी पसंती दिली असल्याने रिक्षा-टॅक्सी व्यवसायावर काहीसा परिणाम होऊ लागला आहे. बेस्ट उपक्रम प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी येत्या काही वर्षात ९०० दुमजली वातानुकूलित बसगाड्या दाखल करणार आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये दुमजली पहिल्या बसचे लोकार्पण मुंबईत झाले होते. प्रथम १४ जानेवारी २०२३ पर्यंत ५० दुमजली वातानुकूलित बस सेवेत दाखल होतील. सध्या बेस्ट उपक्रमाकडे ४५ विनावातानुकूलित दुमजली बस आहेत. त्यांची कालमर्यादाही संपत आली आहे. एकमजली बसमधून ५४ ते ६० प्रवासी प्रवास करू शकतात. नव्या दुमजली बसची प्रवासी आसन क्षमता ७६ आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, बसमधील दोन वाहकांना परस्पर संपर्कासाठी विशेष व्यवस्था, दुमजली वातानुकूलित बसच्या दोन्ही बाजूला स्वयंचलित दरवाजे असतील. ही बस ८० मिनिटांत चार्ज होते. ताफ्यात दाखल होणाऱ्या काही विजेवरील दुमजली बसच्या वरील भागाचे छत काढून ओपन डेक बस करण्याची योजनाही आखण्यात आली आहे.