Deaths due to milk adulteration: आयुर्वेदाच्या परंपरेत दूधाला पूर्णान्न म्हटले जाते. दूध हे भारतीय घरांमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आणि ते कॅल्शियमसह अनेक पोषक घटकांचा समृद्ध स्रोत आहे. मात्र, जेव्हा हेच पोषणाचे साधन विषारी आणि जीवघेणे ठरते, तेव्हा संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहते. अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना फेब्रुवारी महिन्यात आंध्र प्रदेशमध्ये घडली. आंध्र प्रदेशातील राजमहेंद्रवरम येथे एका विक्रेत्याने शेकडो कुटुंबांना पुरविलेल्या दुधात औद्योगिक कूलंट असलेले एथिलीन ग्लायकॉल मिसळल्याचा आरोप आहे. या घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे.

ही दुध भेसळीची घटना ११ ते १४ फेब्रुवारीदरम्यान चौंडेश्वरी आणि स्वरूप नगर (राजमहेंद्रवरम, राजमुंद्री) येथे घडली. द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, पीडितांनी ११ ते १४ फेब्रुवारीदरम्यान हे दूषित दूध सेवन केले आणि १६ फेब्रुवारीपासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णांमध्ये खालील गंभीर लक्षणे दिसून आली:

  • लघवी न होणे (Anuria)
  • उलट्या (Vomiting)
  • पोटदुखी (Abdominal pain)

या प्रकरणातील पहिला मृत्यू २२ फेब्रुवारीला काकीनाडा सरकारी रुग्णालयात नोंदवला गेला.

Award Banner

पोलीस अहवालानुसार, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) आणि रिजनल फोरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (RFSL) यांच्या तपासात असे आढळले की, दूध साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फ्रीझरमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे त्यातून गळणारे विषारी कूलंट (एथिलीन ग्लायकॉल) दूध आणि दह्यामध्ये मिसळले गेले आणि ते सेवन करणाऱ्यांवर त्याचा गंभीर परिणाम झाला.

एथिलीन ग्लायकॉल म्हणजे काय?

एथिलीन ग्लायकॉल हे एक सेंद्रिय रासायनिक संयुग (organic chemical compound) आहे. याचा मुख्यतः वापर खालीलप्रमाणे केला जातो:

  • वाहनांमध्ये अँटीफ्रीझ (antifreeze) म्हणून
  • इंजिनमध्ये कूलंट (coolant) म्हणून
  • तसेच पॉलियस्टरसारख्या प्लास्टिकच्या निर्मितीसाठी कच्चा माल (raw material) म्हणून

या संयुगाचा गोठणबिंदू कमी (low freezing point) असल्यामुळे, थंड तापमानात द्रव गोठू नयेत यासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरते.

एथिलीन ग्लायकॉलच्या सेवनाचे दुष्परिणाम

चवीला गोड असले तरी एथिलीन ग्लायकॉल मानवी शरीरासाठी अत्यंत विषारी आहे. ते शरीरात गेल्यास खालील दुष्परिणाम होऊ शकतात:

  • मळमळ (nausea)
  • उलट्या (vomiting)
  • चक्कर येणे (dizziness)

गंभीर प्रकरणांमध्ये यामुळे मूत्रपिंड निकामी होण्याचा (kidney failure) धोकाही असतो. मोठ्या प्रमाणात सेवन केल्यास हे जीवघेणे ठरू शकते, आंध्र प्रदेशातील घटनेत नेमके हेच घडले.

घरच्या घरी दुधाची शुद्धता कशी तपासावी?

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) नुसार, दुधाची शुद्धता तपासण्यासाठी काही सोप्या आणि घरच्या घरी करता येणाऱ्या तपासण्या उपलब्ध आहेत. अशाच काही सोप्या चाचण्या पुढीलप्रमाणे…

डिटर्जंट भेसळ चाचणी

  • या चाचणीसाठी पारदर्शक ग्लासमध्ये 5 मि.ली. दूध घ्या आणि त्यात तितक्याच प्रमाणात पाणी मिसळा. चांगले हलवा.
  • शुद्ध दुधात फेस (lather) फारसा तयार होत नाही किंवा अगदी कमी होतो
  • डिटर्जंट मिसळलेल्या दुधात जास्त आणि टिकणारा फेस तयार होतो

युरिया भेसळ चाचणी

  • ५ मि.ली. दूध टेस्ट ट्यूबमध्ये घ्या. त्यात सोयाबीन किंवा अरहर (तूर) पावडर समान प्रमाणात मिसळा. चांगले हलवून ५ मिनिटे तसेच ठेवा. नंतर त्यात लाल लिटमस पेपर बुडवा.
  • लिटमस पेपर लालच राहिला तर दूध शुद्ध आहे
  • निळा झाला तर त्यात युरिया मिसळलेले

फॉर्मालिनच्या अस्तित्त्वाची चाचणी

  • १० मि.ली. दूध टेस्ट ट्यूबमध्ये घ्या. त्यात २-३ थेंब सघन सल्फ्यूरिक अॅसिड बाजूने सावकाश घाला (हलवू नका).
  • रंग बदलला नाही तर दूध शुद्ध
  • जांभळे (violet) किंवा निळे वर्तुळ दिसले तर त्यात फॉर्मालिन मिसळलेले आहे

सिंथेटिक दूध चाचणी

  • ५ मि.ली. दूध आणि ५ मि.ली. पाणी टेस्ट ट्यूबमध्ये घ्या आणि हलवा.
  • फेस टिकून राहत नाही असे असेल तर दूध शुद्ध आहे
  • सतत फेस तयार होतो असे झाले तर सिंथेटिक/डिटर्जंट भेसळ त्यात आहे.

पाण्याची भेसळ चाचणी

  • गुळगुळीत आणि थोड्या उताराच्या पृष्ठभागावर दुधाचा एक थेंब टाका.
  • थेंब हळूहळू वाहतो आणि पांढरा माग सोडतो, असे घडले तर दूध शुद्ध आहे.
  • थेंब पटकन वाहून जातो आणि माग राहत नाही, अशे घडले तर दूधात पाणी मिसळलेले आहे.

दुधाऐवजी पर्याय: कॅल्शियमयुक्त पदार्थ

नाचणी (Ragi)

  • कॅल्शियम: १०० ग्रॅममध्ये सुमारे ३५०-४०० मि.ग्रॅ.
  • नाचणीचा नाश्त्यासाठी पेज (porridge) म्हणून वापर करता येतो. तसेच नाचणीची भाकरी, डोसा, चिल्ला किंवा पॅनकेक्सही बनवता येतात.

तीळ (Sesame Seeds)

  • कॅल्शियम: १०० ग्रॅममध्ये सुमारे ९७५ मि.ग्रॅ.
  • तीळ कुरकुरीत टॉपिंग म्हणून वापरता येतात. तसेच त्यांची पेस्ट करून भाजी किंवा करीमध्ये घालता येते. भाजलेले तीळ सॅलड किंवा भाजीवर शिंपडू शकता, तिळाची चटणी बनवू शकता किंवा स्मूदी/ दह्यातही घालू शकता.
  • यामध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि झिंक असतात, जे कॅल्शियम शोषण आणि हाडांची मजबुती वाढवतात.

चिया बिया (Chia Seeds)

  • कॅल्शियम: १०० ग्रॅममध्ये सुमारे ६३१ मि.ग्रॅ.
  • फक्त २ टेबलस्पून चिया बियांमध्ये सुमारे १७७ मि.ग्रॅ. कॅल्शियम असते, जे प्रौढांच्या दैनंदिन गरजेच्या सुमारे १८% आहे.
  • या बिया हाडे आणि दात मजबूत करतात, स्नायूंचे कार्य आणि नसांच्या सिग्नलिंगला मदत करतात. यामध्येही मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असतात, जे कॅल्शियम शोषण सुधारतात.

राजगिरा पाने (Amaranth Leaves)

  • कॅल्शियम: १०० ग्रॅममध्ये सुमारे २००-३०० मि.ग्रॅ.
  • राजगिरा पानांची भाजी किंवा साग बनवता येते. तसेच डाळ किंवा सूपमध्ये घालूनही खाता येते किंवा पराठ्याच्या पिठात मिसळता येते.

बदाम (Almonds)

  • कॅल्शियम: १०० ग्रॅममध्ये सुमारे २६० मि.ग्रॅ.
  • बदाम रात्रभर भिजवून सकाळी सोलून खाणे उत्तम. तसेच डेझर्ट, ओट्स, स्मूदी किंवा शेकमध्ये घालता येतात. बदामाची चटणीही बनवता येते.