2,000-year-old temple from ‘Indiana Jones civilization’:मंदिर हा भारतीयांच्या अगदीच जवळचा विषय आहे. आजच्या आधुनिक जगात देऊळ, चर्च, मशीद या वास्तू धर्मनिहाय वेगळ्या दिसतात. त्यामुळे मंदिर म्हटलं की, आपल्यासमोर हिंदू मंदिरांचं चित्र उभं राहातं. परंतु ज्यावेळी आपण प्राचीन जगात डोकावून पाहतो त्यावेळी प्रचलित धर्मांखेरीज जगात विविध प्रदेशातील स्थानिक धार्मिक संकल्पना अस्तित्त्वात असल्याचे लक्षात येते आणि विशेष म्हणजे भारताप्रमाणेच त्या संस्कृतीतही देवी-देवतांना रितीभातीनुसार पुजण्याची परंपरा होती. म्हणूनच त्यांचा पूजास्थळाचा उल्लेख मंदिर किंवा टेम्पल असा करण्यात येतो. टेम्पल या शब्दाची व्युत्पत्ती लॅटिन शब्द टेंपलम पासून झाली आहे, ज्याचा अर्थ जमिनीचा पवित्र तुकडा किंवा देवाच्या पूजेसाठीची वास्तू असा होतो. अशाच प्राचीन वास्तूचा- मंदिराचा शोध पुरातत्त्व अभ्यासकांना लागला आहे. विशेष म्हणजे या शोधापूर्वीच इंडियाना जोन्स या प्रसिद्ध चित्रपटात या मंदिराचा संदर्भ घेण्यात आला होता आणि म्हणूनच हे मंदिर विशेष चर्चेत आहे.

हे मंदिर कुठे सापडले आहे?

हे मंदिर इटलीतील नेपल्स या शहरात सापडले आहे. नेपल्स ही कॅम्पानियाची प्रादेशिक राजधानी आणि इटलीतील तिसरे मोठे शहर आहे. पुरातत्त्वशास्त्रज्ञांना नेपल्सजवळ इटालियन किनारपट्टीजवळ बुडलेली प्राचीन वेदी आणि अभिलेख कोरलेले संगमरवरी स्लॅब सापडले आहेत. हे एका मंदिराचे अवशेष असून हे मंदिर तब्बल २००० वर्षे जुनं असल्याचं सिद्ध झालेलं आहे. हे मंदिर अरबी द्वीपकल्पातील प्राचीन राज्य नबातिया येथील स्थलांतरितांनी बांधले होते. या मंदिराचे कोरलेले दगड १९८९ साली प्रदर्शित झालेल्या Indiana Jones and the Last Crusade या चित्रपटात चित्रित करण्यात आले होते. प्राचीन कालखंडात हे एक विशाल मंदिर होते, जे नंतरच्या कालखंडात उध्वस्त झाले आणि आता मागे आहे उरला तो विटा आणि मातीच्या भांड्यांचा ढिगारा. या भागातील परकीय आक्रमकांमुळे हे घडलं असण्याचा निष्कर्ष १२ सप्टेंबर रोजी प्रकाशित झालेल्या ‘अँटिक्विटी जर्नल’मधील शोधनिबंधात नमूद केले आहे. या शोधनिबंधाचे पहिले लेखक मिशेल स्टेफनिले यांनी हा शोध त्यांच्यासाठी अनपेक्षित असल्याचे ‘लाईव्ह सायन्स’शी बोलताना सांगितले. मिशेल स्टेफनिले हे मेरीटाईम आर्किओलॉजिस्ट असून नेपल्समधील सदर्न ग्रॅज्युएट स्कूल (स्कुओला सुपेरीओर मेरिडिओनेल) येथे कार्यरत आहेत.

Ancient Egypt’s Worship of Buddha and Hindu Deities
Ancient India Egypt connection: प्राचीन इजिप्तमध्ये गौतम बुद्ध आणि हिंदू देवतांची पूजा; सांस्कृतिक देवाणघेवाणीचा पुरातन वारसा नेमकं काय सांगतो?
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
History of ikat
History of Ikat: इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये भारतीय कापड; काय सांगते इकतची प्राचीन परंपरा?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
A House from 8,000 Years Ago Found in Serbia
8,000-year-old dwelling found:८,००० वर्षांपूर्वीचे नवाश्मयुगीन शेतकऱ्याचं घर नेमका काय इतिहास सांगतं?
What is A B form Why A B form so important during elections
ए. बी. फॉर्म म्हणजे काय? या फॉर्मला निवडणूक काळात इतके महत्त्व का?
Queen Nefertiti bust
Queen Nefertiti bust: ३,३७० वर्षे प्राचीन इजिप्तची राणी परंतु तिचा पुतळा जर्मनीत; नेफरतितीचा अर्धपुतळा इजिप्तला परत मिळणार का?
Tunic Worn by Alexander the Great
Alexander the great’s purple tunic: ३००० वर्षे प्राचीन ‘अलेक्झांडर द ग्रेट’चा जांभळा अंगरखा अखेर सापडला; त्याचा भारताशी काय संबंध?

अधिक वाचा: डेन्मार्कमध्ये उत्खननात सापडले ‘वायकिंग्ज’चे ५० सांगाडे; इतिहासावर आणखी प्रकाश पडण्याची आशा!

The archaeologists' map of their excavation of the Nabataean temple. (Image credit: Figure by M. Stefanile)
नबातियन मंदिराच्या उत्खननाचा नकाशा. (इमेज क्रेडिट: एम. स्टेफनिल)

२०२३ साली पाण्याखाली काय सापडले होते?

हे मंदिर नेपल्सच्या पूर्वेस सुमारे १० मैल (१६ किलोमीटर) अंतरावर असलेल्या कॅम्पी फ्लेग्रेई ज्वालामुखीजवळ पोझुओलीच्या किनाऱ्यावर आहे. रोमन कालखंडात हे शहर पुटेओली म्हणून ओळखले जात असे आणि ते एक मोठे बंदर होते. हे बंदर रोमन व्यापारासाठी प्रसिद्ध होते. शतकानुशतके झालेल्या ज्वालामुखीच्या प्रक्रियेमुळे पोझुओली येथील किनारपट्टीत लक्षणीयरीत्या बदल झाला आहे. या बंदरावरील सुमारे १.२ मैलावर (२ किमी) पसरलेली रोमन काळातील गोदामे आणि संबंधित इतर प्राचीन इमारती पाण्यात बुडाल्या आहेत. १८ व्या शतकात समुद्रातून मिळालेल्या अवशेषांच्या आधारे या भागात एक मंदिर होते हे लक्षात येते, परंतु ते नेमके कुठे आहे हे कोणालाही माहिती नव्हते.

२०२३ साली या प्रदेशाच्या समुद्रतळाचे मॅपिंग करणाऱ्या संशोधकांना पाण्यात बुडालेल्या रोमन-शैलीतील भिंती असलेल्या खोल्या सापडल्या. या सुमारे ३२ फूट बाय १६ फूट (१० बाय ५ मीटर) होत्या. एका खोलीच्या भिंतीला पांढऱ्या संगमरवराच्या दोन वेदिका असल्याचेही दिसते. दोन्ही वेदिकांमध्ये आयताकृती भाग होता, ज्यात कदाचित एकेकाळी पवित्र दगड ठेवले जात असत. प्रत्येक खोल्यांमध्ये लॅटिन शिलालेख सापडले. या शिलालेखांमध्ये ‘डुशारी सेक्रम’ असे कोरलेले होते, ज्याचा अर्थ डुशाराला अभिषेक केला जातो, डुशारा ही प्राचीन नबातियन धर्मातील मुख्य देवता आहे.

Al-Khazneh was carved into rock by the Nabataeans in their capital, Petra.
अल-खाझनेहची राजधानी पेट्रा येथे नबातियन यांनी खडकात कोरलेली वास्तू (फोटो: विकिपीडिया)

नबातियन धर्म

नबातियन धर्म हा प्राचीन अरब संस्कृतीशी संबंधित होता. विशेषत: पेट्रा (आधुनिक जॉर्डन) हे त्याचे केंद्रस्थान होते. हा धर्म अनेकेश्वरवादी होता आणि त्यात डुशारा हा मुख्य देव होता, जो पर्वतांचा देव मानला जात असे. याशिवाय अल्लात, अल-उज्जा, आणि मनात या महत्त्वाच्या देवता होत्या. नबातियन लोक पवित्र दगडांना पूजत होते आणि मोकळ्या जागेत बलिदानासारखे विधी पार पाडायचे. त्यांचा धर्म प्रामुख्याने निसर्गाशी संबंधित होता. जलदेवतांचे पूजन हा या धर्माचा मुख्य भाग होता. नव्याने उघडकीस आलेल्या मंदिराच्या शोधांनंतर स्टेफनिले म्हणाले, आमच्याकडे नबातियन देवतांना समर्पित वास्तू आहे, परंतु तिची रचना रोमन शैलीत आहे आणि आत लॅटिन शिलालेख आहेत. नबातियन राज्य उत्तर अरबपासून पूर्व भूमध्य समुद्रापर्यंत पोहोचले आहे. इसवी सनपूर्व चौथ्या ते दुसऱ्या शतकात धूप, सोने, हस्तिदंत आणि अत्तर यासारख्या महागड्या वस्तूंच्या वाढत्या व्यापारी नेटवर्कवर नबातियन लोकांनी नियंत्रण ठेवले आणि पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात प्रचंड संपत्ती जमा केली. त्याच सुमारास हे मंदिर बांधले गेले असावे असा अभ्यासकांचा निष्कर्ष आहे.

Petra
पेट्रा (सौजन्य: फ्रीपिक)

अधिक वाचा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा देवीच्या दरबारात; काय सांगतो कामाख्या मंदिराचा इतिहास?

नबातियन धर्मियांनी हे बंदर का सोडले असावे

ओहायोमधील मियामी विद्यापीठातील रोमन इतिहासकार स्टीव्हन टक त्यांनी ‘लाइव्ह सायन्स’ला सांगितले की, नबातियन हा व्यापाऱ्यांचा समुदाय म्हणून पुतेओलीमध्ये होता हे गृहीतक आता सिद्ध झाले आहे. कारण पुतेओली हे त्यावेळेस रोमन इटलीतील दुसरे सर्वात मोठे शहर आणि मुख्य बंदर होते. आणि म्हणूनच नबातियन तेथे आले असावेत आणि त्यांनी त्यांच्या धार्मिक प्रथा स्वतःबरोबर आणल्या असाव्यात. युनिव्हर्सिटी libre de Bruxelles मधील पुरातत्त्वशास्त्रज्ञ लॉरेंट थॉल्बेक यांनी सांगितले की “पुतेओली येथे “डुशारा/ दुसारेसचे मंदिर सापडणे यात आश्चर्यकारक काहीही नाही. थॉल्बेक म्हणतात की, नबातियन लोकांना नजीकच्या पूर्व भागात रोमन साम्राज्याच्या विस्तारामुळे फायदा झाला. तोपर्यंत ट्राजनच्या कारकिर्दीत (इसवीसन पूर्व ९८ ते ११७) अरब प्रांताची स्थापना झालेली नव्हती. स्टेफनिले आणि त्यांच्या टीमने शोधून काढले मंदिर इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात उध्वस्त झाले असावे. स्टेफानिले म्हणतात की, कदाचित इसवी सन १०६ मध्ये ट्राजनने अरब प्रदेश जिंकल्यानंतर नबातियन लोकांना पुटेओली या बंदरात मुक्त व्यापार करण्याची संधी राहिली नाही, कदाचित त्यामुळेच त्यांनी ते बंदर सोडले असावे…

Story img Loader