Ancient Egyptian doctor: कैरोच्या (Cairo) दक्षिणेस मिन्या (Minya) भागात अलीकडेच झालेल्या एका पुरातत्त्वीय उत्खननामुळे इजिप्तच्या इतिहासात आणखी एक अद्भुत प्रकरण जोडले गेले आहे. इजिप्तशियन आणि स्पॅनिश चमूने संयुक्तरित्या केलेल्या उत्खननात काही दफनं उघडकीस आली आहेत. या दफनांमध्ये सोन्याच्या जिभा आढळून आल्या आहेत. इतकंच नाही तर या दफनांमध्ये पवित्र ताईत आणि इतर गोष्टीही सापडल्या आहेत. याशिवाय याच चमूला इजिप्तमधील सक्कारा येथे फॅरोवर स्वतः उपचार करणाऱ्या डॉक्टरची ४,१०० वर्षे जुनी कबर सापडली आहे. या कबरीचा संबंध टेटिनेबेफू (Tetinebefou) नावाच्या एका डॉक्टरशी आहे, असे शोध लावणाऱ्या स्विस-फ्रेंच पथकाने त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. जरी दफनांमधीलतील वस्तूंची लूट झालेली असली तरी, पुरातत्त्वशास्त्रज्ञांना या स्थळावरील भिंतीवरील चित्रे आणि हायरोग्लिफिक शिलालेखांचा अभ्यास करता आला. या शिलालेखांमध्ये डॉक्टरच्या पदाचा उल्लेख आहे आणि त्याच्या वैद्यकीय उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध वस्तूंचे चित्रण केले आहे.

अधिक वाचा: Lady of the House: मृत्यूनंतर ४,००० वर्षांनी लागला तिचा शोध; कोण होती इजिप्तची ‘lady of the house’?

Sugar Commissionerate is committed to go above and beyond to ensure human rights of sugarcane workers
ऊसतोड कामगारांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी कटिबद्ध, साखर आयुक्त कुणाल खेमनर यांची ग्वाही
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
NamdevShastri
महंत नामदेवशास्त्रींचा निवृत्तीनाथ संस्थानच्या विश्वस्तांकडून निषेध
Ancient Egyptian Screaming Mummy
Egyptian Screaming Mummy: ३५०० वर्षे प्राचीन किंचाळणाऱ्या बाईचे रहस्य उलगडले; इजिप्तमधील नवे संशोधन नेमके काय सांगते?
right to die with dignity
‘सन्मानाने मरण्याचा अधिकार’ म्हणजे काय? ‘हे’ राज्य ठरणार इच्छा मरणाचा अधिकार देणारं देशातील दुसरं राज्य
Tata Hospital to start super specialty hospital for cancer
कर्करोग रुग्णांसाठी टाटा रुग्णालय सुरू करणार अतिविशेषोपचार रुग्णालय
The helmet
२४५० वर्षे जुन्या अस्सल सोन्याच्या शिरस्त्राणाची चोरी; का आहे हे शिरस्त्राण महत्त्वाचे?
Advertisements claiming to cure ailments through Ayurveda and Unani medicines are increasing fraud rates
आयुर्वेदिक औषधींच्या जाहिरातीत भ्रामक दावे, २४ हजारांवर….

या वैद्य किंवा डॉक्टरला देवी सेर्केटचा जादूगार (सेर्केट किंवा सेल्केट असेही म्हणतात) ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले होते. या देवीचा संबंध विंचवांशी होता. ती विंचवाच्या डंखांपासून संरक्षण करते असे मानले जात होते. या पदवीच्या विशेषणावरून असा संदर्भ लक्षात येतो की, हा वैद्य विषारी दंशांवरील उपचारांमधील तज्ज्ञ होता, असे स्विस-फ्रेंच पथकाचे नेते आणि जिनिव्हा विद्यापीठातील इजिप्तचे अभ्यासक फिलिप कोलॉम्बर्ट (Philippe Collombert) यांनी सांगितले.

देवी सेर्केट

देवी सेर्केट ही संरक्षण, आरोग्य आणि विषबाधेमुळे होणाऱ्या त्रासांवर उपचार यासाठी प्रसिद्ध आहे. प्राचीन इजिप्तमध्ये ती विंचवांच्या डंखांपासून आणि इतर विषारी प्राण्यांच्या दंशांपासून संरक्षण देते, असे मानले जात असे. सेर्केटला विष आणि विषारी पदार्थांपासून होणाऱ्या दुष्परिणामांवर उपचार करणारी देवी मानले जाई. ती आरोग्य आणि सुरक्षा प्रदान करते, असा विश्वास होता. सेर्केटला मृत्यूनंतरच्या जीवनात महत्त्वाची भूमिका होती. ती कॅनोपिक जारचे (मृताच्या अवयव ठेवण्यासाठी वापरली जाणारी पात्रे) रक्षण करणाऱ्या चार देवतांपैकी एक होती. ती विशेषतः आतड्यांसाठी असलेल्या पात्राचे रक्षण करत असे. या पत्रावर क्येबेहस्नेवेफ (Qebehsenuef) या देवाचा अधिकार होता.

सेर्केटचे दैनंदिन जीवनातील महत्त्व

सेर्केटला प्रामुख्याने डोक्यावर विंचवाच्या प्रतिमेसह स्त्रीच्या रूपात दर्शवले जाते. कधीकधी ती विंचवाच्या रूपात किंवा विंचवाच्या वैशिष्ट्यांसहही दर्शवली जाते. सेर्केटला फिरऔनांचे संरक्षण करणारी देवी मानले जात असे. ती त्यांना शारीरिक आणि आध्यात्मिक धोक्यांपासून सुरक्षित ठेवत असे. सेर्केटसाठी कोणतेही विशेष मंदिर आढळलेले नाही, तरी ती वैद्यकीय आणि मृत्यूनंतरच्या जीवनातील संरक्षणासाठी पूजनीय होती. तिच्या उपचारात्मक आणि संरक्षणात्मक गुणधर्मांमुळे ती प्राचीन इजिप्तच्या दैनंदिन जीवनात आणि धार्मिक विधींमध्ये महत्त्वाची ठरली. सेर्केट ही घातक आणि संरक्षक अशा दोन्ही स्वरूपात आढळते. प्राचीन इजिप्तमधील निसर्गातील संतुलन आणि दैवी हस्तक्षेपाचे महत्त्व प्रतिबिंबित करते. तिची पूजा लोकांमध्ये भिती आणि आदराचे प्रतीक होती.

दंतचिकित्सक

डॉक्टरच्या थडग्यावर आढळलेल्या शिलालेखांमध्ये असेही नमूद केले आहे की, हा वैद्य ‘औषधी वनस्पतींना हाताळत’ होता. अशा स्वरूपाची पदवी प्राचीन इजिप्तमधील केवळ एकाच स्थळावर आढळून आली आहे, असे कोलॉम्बर्ट यांनी सांगितले. या पदव्यांव्यतिरिक्त शिलालेखांमध्ये नमूद केले आहे की, तो मुख्य दंतचिकित्सक होता. ही आणखी एक दुर्मिळ पदवी आहे. “प्राचीन इजिप्तमध्ये ‘दंतचिकित्सकां’साठी पुरावे अत्यंत दुर्मिळ आहेत,” असे मँचेस्टर विद्यापीठातील केएनएच सेंटर फॉर बायोमेडिकल इजिप्टोलॉजीचे सन्माननीय व्याख्याते रॉजर फोर्शॉ यांनी लाइव्ह सायन्सला सांगितले.

राजवैद्यांचा प्रमुख

या पदव्या सूचित करतात की, टेटिनेबेफू आपल्या व्यवसायाच्या शिखरावर होता. “तो नक्कीच राजदरबारातील मुख्य वैद्य होता, त्यामुळे त्याने स्वतः फॅरोंवर उपचार केले असावेत,” असे कोलॉम्बर्ट यांनी सांगितले. टेटिनेबेफूच्या थडग्याला रंगीबेरंगी भिंतींच्या चित्रांनी सजवले आहे. यात जारसारख्या कंटेनर आणि वास्यासारख्या वस्तूंचे चित्रण केले आहे. त्याचबरोबर रंगीबेरंगी अमूर्त चित्रे आणि भूमितीय आकारसुद्धा दाखवले आहेत. भिंती ताज्या आणि तेजस्वी रंगांनी सजलेल्या चित्रांनी पूर्णपणे सुशोभित आहेत! ही चित्र ४००० वर्षे जुन्या आहेत हे विसरायला होतं!” असे संशोधक पथकाने ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले आहे.

अधिक वाचा: ४५०० वर्षांपूर्वी कोणी बांधले इजिप्तमधले पिरॅमिड?

टेटिनेबेफूचा कालखंड

टेटिनेबेफू नेमके कोणत्या फॅरोंची सेवा करत होता, हे स्पष्ट नाही. त्यामध्ये (Pepi II) पेपी दुसरा (अंदाजे इसवीसन पूर्व २२४६ ते २१५२ दरम्यान सत्तारूढ होता) किंवा त्यानंतर थोड्याच कालावधीत सत्तेवर असलेले एक किंवा अधिक फॅरों/ फिरऔन असू शकतात, असे कोलॉम्बर्ट यांनी सांगितले. पेपी दुसऱ्याच्या कारकीर्दीत इजिप्त एकसंघ होते आणि पिरॅमिडचे बांधकाम सुरू होते. मात्र, त्याच्या शासनानंतर देशाचे तुकडे-तुकडे होऊ लागले आणि नोमार्क (प्रांतप्रमुख) अधिक ताकदवान झाले. यामुळे हा वैद्य पहिला मध्यवर्ती कालखंड (First Intermediate Period) असावा असे इजिप्तशास्त्रज्ञ म्हणतात. हा कालखंड अंदाजे इसवीसन पूर्व २१५० ते २०३० पर्यंत टिकला. थडग्यात कोणतेही मानवी अवशेष सापडले नाहीत. भिंतीवरील चित्रे आणि शिलालेखांशिवाय, “थडग्याची जवळजवळ पूर्णपणे लूट झाली होती,” असे कोलॉम्बर्ट यांनी सांगितले. थडग्याचे विश्लेषण सध्या सुरू आहे.

Story img Loader