सध्या देशभरात चर्चा रंगतेय ती म्हणजे निवडणुकांच्या निकालाची. पंजाब, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणारा पंजाब आता मात्र आम आदमी पक्षाच्या हातात जात असल्याची चिन्हं दिसू लागली आहेत.


शिरोमणी अकाली दल आणि काँग्रेस या वर्षानुवर्षे पंजाबात सत्ता गाजवत आलेल्या पक्षांच्या तुलनेत आम आदमी पक्ष तसा नवखाच. मात्र तरीही यंदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्षच पंजाबमध्ये बाजी मारत असल्याचं दिसून येत आहे. काय आहेत या मागची संभाव्य कारणं? जाणून घ्या…

2024 Lok Sabha elections
उत्तराखंडमध्ये भाजपाच्या निर्भेळ यशाचे लक्ष्य
Gujarat Congress chief Arjun Modhwadia joins BJP and attacks on congress leader
“पक्ष चालवणं म्हणजे अर्धवेळ नोकरी नव्हे”; गुजरात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी पक्ष सोडताना दिल्या कानपिचक्या!
Bhiwandi lok sabha
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडाचे वारे ? काँग्रेस लढण्यावर ठाम
Naxalites active again in Lok Sabha election hype Brutal killing of tribal citizen in Gadchiroli
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत नक्षलवादी पुन्हा सक्रिय; गडचिरोलीत आदिवासी नागरिकाची निर्घृण हत्या

१. बदलाची गरज


शिरोमणी अकाली दल आणि सध्या सत्तेवर असलेला काँग्रेस, या दोन पक्षांभोवतीच पंजाबचं राजकारण फिरत होतं. राज्यातील कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर अकालींशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला, कारण ते बादलांच्या विरोधातल्या आरोपांबाबत आक्रमक झाले नव्हते. त्यामुळे काँग्रेस आणि अकाली दल एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा समज निर्माण झाला होता. यावेळी पंजाब, विशेषतः माळव्यातील लोकांनी परिवर्तनासाठी मतदान केले. दोन मोठ्या पक्षांची सत्ता ७० वर्षे मतदारांनी पाहिली, पण निकाल लागलेला नाही, असा संदेश राज्यभर घुमला. त्यामुळे दुसऱ्या पक्षाला संधी देण्याची वेळ आली आहे.


“इस बार ना खानांगे धोखा, भगवंत मान ते केजरीवाल नू दिवांगे मौका (आम्ही या वेळी फसणार नाही, भगवंत मान आणि केजरीवाल यांना संधी देऊ)” ही आपची घोषणा राज्यभर गाजली कारण लोक या राजकीय परिस्थितीला कंटाळले होते.

पाचही राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाविषयीच्या ताज्या अपडेट्ससाठी येथे क्लिक करा.


२. आपचं दिल्ली मॉडेल


आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांच्या दिल्लीच्या कारभाराच्या मॉडेलच्या चार स्तंभांमुळे मतदारांच्या पसंतीस पडले. हे चार स्तंभ म्हणजे – दर्जेदार सरकारी शिक्षण, आरोग्य, वीज आणि स्वस्त दरात पाणी. एक राज्य ज्याला विजेसाठी कमालीचे उच्च दर मिळत होते आणि जिथे आरोग्य आणि शिक्षणाचे बहुतेक खाजगीकरण केले जाते, त्या राज्यातले लोक या मॉडेलकडे आकर्षित झाले.

३. महिला आणि तरुणांविषयीचं धोरण


नवीन पक्ष आणि ‘आम आदमी’ला संधी देऊ इच्छिणाऱ्या तरुण आणि महिला मतदारांचा पाठिंबा ‘आप’ला मिळाला. केजरीवाल यांचं भ्रष्टाचाराची पाळंमुळं उपटून काढण्याचं वचन राज्यातल्या संवेदनशील आणि सरकारी प्रणाली बदलण्याची स्वप्न पाहणाऱ्या तरुणाईला अधिक भावलं. नवीन सरकार आपल्याला शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल, अशी आशा या तरुणांच्या मनात पल्लवीत झाली.
महिलांच्या बँक खात्यात दरमहा १००० रुपये जमा करणार हे आश्वासन पूर्ण होणार नाही, हे माहित असूनही अनेक महिला याकडे आकर्षिल्या गेल्या. महिलांना केवळ आपला पती अथवा वडिलांच्या बाजूने न धरता महिलांचा मतदार म्हणून विचार झाला, तेही या पितृसत्ताक राज्यात…हे फार महत्त्वाचं ठरलं.

हेही वाचा – Election Results: भाजपा सत्ता राखणार तर काँग्रेसच्या ‘हातून’ पंजाबही जाणार; केवळ इतक्या राज्यांपुरता राहणार पक्ष

४. भगवंत मानः मुख्यमंत्री पदाचा चेहरा


भगवंत मान यांची मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केल्याने पक्षाला त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी दिलेला ‘बाहेरचा पक्ष’ हा टॅग काढून टाकण्यास मदत झाली. आपल्या राजकीय आणि सामाजिक व्यंगाने अनेक पंजाबी लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारा लोकप्रिय विनोदी अभिनेता मान, स्वच्छ, मातीचा पुत्र अशी प्रतिमा असलेल्या कोणत्याही पारंपारिक राजकारण्यापेक्षा वेगळा आहे. आणि ते भाड्याच्या घरात कसे राहतात आणि लागोपाठच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांची निव्वळ संपत्ती कशी कमी होत आहे हे सांगितल्यानं त्याचाही फायदा पक्षाला झाला.

५. शेतकरी आंदोलन आणि माळवा


वर्षभराहून अधिक काळ चाललेल्या शेतकरी आंदोलनाने तीन वादग्रस्त शेती कायदे रद्द करण्यासाठी केंद्राला भाग पाडले. सरकारने भूतकाळातील मतदानाचे निकाल ठरवणारी ‘धारा’ प्रणाली (गट) मोडून सरकार बदलण्यासाठी मैदान तयार केले.
त्यामुळे नेत्यांना प्रश्न विचारणाऱ्या मतदारांची संख्या वाढली. स्वातंत्र्याला ७० हून अधिक वर्ष लोटल्यानंतरही तुम्ही केवळ ठराविक भागापुरताच विचार का करता? अधिक व्यापक विचार का करत नाही, असे प्रश्न मतदारांना पडले. या प्रश्नांची उत्तरं आम आदमी पक्षाकडे आहेत, त्यामुळे त्यांना फायदा झाला असं मत बीकेयू(उग्रहण) या पंजाबमधल्या माळवा भागातल्या एका मोठ्या संघटनेचे अध्यक्ष जोगिंदर सिंग उग्रहण यांनी व्यक्त केलं.