जवळपास सहा महिन्यांआधी एका धार्मिक कट्टरतावादी युवकांने प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर हल्ला करुन त्यांना जखमी केले होते. त्यानंतर आता रश्दी आपल्या नव्या कांदबरीसह पुन्हा वाचकांसमोर येत आहेत. व्हिक्टरी सिटी (Victory City) या कांदबरीमध्ये रश्दी यांनी विजयनगर राज्याची काल्पनिक कथा चितारली आहे. त्यांच्या कांदबरीमधील एक पात्र, जादूगार आणि कवी असलेला पम्पा कंपना हा विजयनगरच्या जय-पराजयाचा दोन शतकापेंक्षा अधिकच्या काळाचा साक्षीदार आहे. विजयनगर राज्य हे फार पूर्वीपासूनच ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्या सर्वांच्या कुतुहलाचा विषय राहिलेले आहे. विजयनगरची राजधानी असलेले हंपी शहर तुंगभद्रा नदीच्या तीरावर वसलेले आहे. याच ठिकाणाहून विजयनगरने जवळपास ३ लाख ६० हजार चौरस किमीपेक्षा अधिकच्या प्रदेशावर राज्य केले. १३३६ साली स्थापन झालेले विजयनगरचे राज्य तीन शतकांहून अधिक काळ टिकले. परकीय आक्रमण झेलून देखील कला आणि अर्थव्यवस्थेत विजयनगरने उल्लेखनीय प्रगती केली होती. रश्दी यांच्या कांदबरीच्या निमित्ताने विजयनगर साम्राज्याचा घेतलेला हा आढावा.

भारतीय उपखंडातील सर्वात शक्तीशाली राज्य

१३३६ ते १६४६ या तीन शतकांच्या काळात विजयनगरने अनेक चढउतार पाहिले. संगमा घराण्यातील हरिहर यांनी स्थापन केलेल्या या राज्याचा विस्तार विजयनगरच्या तुंगभद्रा नदीच्या काठापासून झाला. १५ व्या शतकात विजयनगर एक शक्तीशाली राज्य बनले. कृष्णदेवराय (कार्यकाळ १५०९ – १५२९) यांच्या नेतृत्वाखाली विजयनगर शिखरावर पोहोचले. भारतीय उपखंडातील इतर राज्य जसे की, बहमनी, गोलकोंडा, ओडिशामधील गजपती यासांरख्या प्रतिस्पर्धी राज्यावर त्यांनी लष्करी प्रभुत्व गाजवले. कृष्णदेवराय यांच्या काळात कोकण किनारपट्टीतील गोव्यापासून पूर्वेकडील दक्षिण ओडिशाच्या काही भागापर्यंत आणि दक्षिणेकडील उपखंडाच्या अगदी टोकापर्यंत हे राज्य पसरले होते.

Know about This Seven Indian royal families heritage source of income and how they live a luxurious life
आलिशान राजवाडे, गडगंज संपत्ती; ‘ही’ आहेत भारतातील सात श्रीमंत राजघराणी; पण त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत काय?
Muslim League, Hindu Mahasabha, coalition government, pre independence alliance
मुस्लीम लीग आणि हिंदू महासभेने मिळून स्थापली होती प्रांतिक सरकारे… स्वातंत्र्यपूर्व काळातील आघाडीबद्दल इतिहास काय सांगतो?
Katchatheevu Island
पोर्तुगीजांकडून ब्रिटिशांकडे, ब्रिटिशांकडून भारताकडे, भारताकडून श्रीलंकेकडे… कचाथीवू बेटाचा वादग्रस्त प्रवास!
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!

हे वाचा >> विश्लेषण : जीवघेण्या हल्ल्यातून कसे बचावले सलमान रश्दी? नव्या पुस्तकात काय?

व्यापरावर विजयनगरचा पाया भक्कम होता

विजयनगरची अर्थव्यवस्था मुख्यत्वे शेतीवर अवलंबून होती. दोन्ही किनारपट्टीवर अनेक बंदरे होती. त्यामुळे व्यापाराची चांगलीच भरभराट झाली. प्रवासी अब्द अल-रझाक समरकंदी यांनी मंगळूर, होनावर, भटकळ, बारकुर, कोचीन, कॅन्नोर, मछलीपट्टनम आणि धर्मदाम या बंदरावरुन आफ्रिका, अरबस्तान, एडन, लाल समूद्र, चीन आणि बंगालमधील व्यापारी पाहिले. तसेच याठिकाणी जहाजबांधणीचेही केंद्र बनले होते. विजयनगरहून मिरपूड, आले, दालचिनी, वेलची, चिंचेचे लाकूड, मौल्यवान आणि अर्ध मौल्यवान दगड, मोती, कस्तुरी, एम्बरग्री, कोरफड, सूती कापड यांची निर्यात होत होती. रझाकने विजयनगरच्या अर्थव्यवस्थेचे वर्णन केले आहे. के. ए. नीलकांत शास्त्री यांनी त्यांच्या क्लासिक हिस्ट्री ऑफ साऊथ इंडियामध्ये लिहिले आहे की, राज्य आणि व्यापारी संस्था सोने, चांदी, तांबे आणि पितळ वापरुन नाणी तयार करत होते. नाण्यांची किंमत त्याच्या वजनावर ठरत असे.

विजयनगरचे संस्कृती आणि स्थापत्यकलेतील मोलाचे योगदान

विजयनगरमध्ये काव्य, विद्वतेची धार्मिक भावना आणि धर्मनिरपेक्षता अशा दोन्ही अंगानी भरभराट झाली होती. तामिळ, तेलगू, कन्नड तसेच संस्कृत भाषेतील साहित्य राज्यामध्ये निर्माण झाले. नवीन लेखन शैली उद्यास आली. तसेच स्थापत्यशास्त्रातही विजयनगरने महत्त्वपूर्ण योगदान दिले. इतिहासकार पर्सी ब्राऊन यांच्यामते, विजयनगरचे स्थापत्यशास्त्र हे चालुक्य, होयसाळ, पांड्या आणि चोल शैलीच्या स्थापत्याचे एक अतिशय उत्तम असे संयोजन होते. बुक्का येथील प्रसन्न विरुपाक्ष मंदिर आणि कृष्णदेवरायाचे हजारा राम मंदिर ही विजयनगरच्या वैशिष्टपूर्ण शैलीची आणि क्लिष्ट कलात्मकतेची उल्लेखनीय उदाहरणे आहेत.

विजयनगरची राजधानी हंपी हे आज युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट आहे. अत्याधुनिक तंटबंदी आणि चमत्कारीक वास्तुशिल्पीय कलेसाठी आजही इथली असंख्य मंदिरे ओळखली जातात. आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार १६ व्या शतकाच्या सुरुवातीस हंपी-विजयनगर हे जगातील दुसरे (पहिले बीजिंग) सर्वात मोठी नागरी वस्ती आणि समृद्ध असे शहर होते.

दक्षिणेतील हिंदू राजवटीचा शेवटचा बुरुज

इतिहासकार फिलिप बी वॅगनर यांनी लिहिले की, विजयनगरच्या इतिहासलेखनात या साम्राज्याचे चरित्र समोर येतं. ते असं की, मोहम्मदाच्या आक्रमणाविरोधात उभा राहिलेला कडवट हिंदू. रॉबर्ट सेवेलच्या क्लासिक ए फॉरगॉटन एम्पायर (१९००) पासून ते नीलकांत शास्त्रीच्या मॅग्न ओपस (१९५५) पर्यंत अनेक इतिहासकारांच्या लेखनात हे चरित्र प्रभावशालीपद्धतीने डोकावतं. जेव्हा आक्रमणकारी कृष्णा नदीच्या काठावर पोहोचले तेव्हा दक्षिणेतील हिंदूनी दिलेल्या झुंजीमुळे त्रस्त झाले. तेव्हा जीर्ण झालेली जुनी राज्ये उध्वस्त झाली आणि विजयनगरचे लढाऊ राजे अडीच शतके दक्षिणेचे तारणहार बनले, असे रिचर्ड सेवेल यांनी लिहिले.