AI Robots Biodiversity Mapping: स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगांमधील खडकाळ आणि उताराचा भाग… किंवा हिमालयाच्या शिखरावर… बर्फ वितळण्याच्या सीमारेषेवर उगवलेल्या काही नाजूक आणि दुर्मीळ वनस्पती. इथे माणसाने पाऊल ठेवणं म्हणजे थेट मृत्यूशी गाठच! बर्फाचे निसरडे क्षेत्र, अचानक होणारा हवामानातील बदल आणि श्वास घेणंही कठीण जावं अशी उंची… पण याच ठिकाणी चार पायांवर चालणारा एक रोबोट थांबतो, कॅमेऱ्याच्या माध्यमातून झाडांकडे पाहतो आणि काही सेकंदांत त्या वनस्पतींची ओळख पटवतो… हा विज्ञानकथेतील प्रसंग नाही, तर ही आहे पर्यावरणीय संशोधनाची नवी वास्तवकथा… जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि चालते-फिरते रोबोट्स जैवविविधतेचा नवा नकाशा तयार करत आहेत.
पर्यावरणाच्या अभ्यासातील अडचणी
डोंगराळ आणि दुर्गम प्रदेशात जैवविविधतेचा अभ्यास हा नेहमीच संशोधकांसाठी अडचणीचा भाग राहिला आहे. कारण…
- मानवी सर्वेक्षण वेळखाऊ असते
- प्रसंगी जीव धोक्यात घालावा लागतो.
- हवामानावर अवलंबून राहावे लागते
परिणामी, हिमालय, आल्प्स, अँडीज किंवा सह्याद्रीसारख्या परिसंस्थांमधील अनेक दु्र्मीळ आणि संवेदनशील वनस्पती- प्रजातींच्या माहितीची नोंदच होत नाही. हवामानबदलाचा परिणाम कुठे, किती वेगाने आणि कशा प्रकारे होत आहे, याचं अचूक चित्रण हवं असेल तर हा जैववैविध्याचा डेटा हाती असणं संशोधकांसाठी महत्त्वाचं आहे.
…जेव्हा रोबोट्स मैदानात उतरतात
ही पोकळी भरून काढण्यासाठी युरोपमधील काही संशोधन संस्थांनी चार पायांवर चालणारे (quadruped) रोबोट्स पर्यावरण अभ्यासासाठी वापरायला सुरुवात केली.
हे रोबोट्स…
- खडकाळ चढ- उतार सहज पार करतात
- बर्फ, माती आणि माती व दगडांवर तोल ढळू देत नाहीत
- मानवी हस्तक्षेपाशिवाय ठरावीक मार्गावर चालू शकतात
- त्यांच्या अंगावर बसवलेले हाय-रिझोल्यूशन कॅमेरे आणि सेन्सर्स दररोज हजारो प्रतिमा टिपतात. ही दृश्य माहिती नंतर AI प्रणालीकडे पाठवली जाते.

खरी क्रांती रोबोट्समध्ये नाही तर AI मध्ये
या प्रकल्पाचा कणा म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. AI मॉडेल्स वनस्पती ओळखताना केवळ “फोटो” पाहत नाहीत, तर… पुढील बाबींचा एकत्रित अभ्यास करतात.
- पानांचा आकार
- रंगातील सूक्ष्म फरक
- फुलांची रचना
- वाढीचा नमुना आणि घनता
काही सेकंदांत ही प्रणाली सांगते की, सदरहू वनस्पती कोणत्या प्रजातीची आहे, तिचा आढळ किती आहे आणि गेल्या वर्षाच्या तुलनेत तिची स्थिती बदलली आहे का. विशेष बाब म्हणजे, AI स्वतः शिकते. जितका अधिक डेटा, तितकी तिची अचूकता वाढते. मानवी निरीक्षणात होणाऱ्या चुका इथे मोठ्या प्रमाणावर कमी होतात.
आल्प्समधील प्रयोग
आल्प्समध्ये सुरू झालेला हा प्रयोग केवळ युरोपपुरता मर्यादित नाही.
- संशोधक स्पष्ट करतात की,…
- हवामान बदलाचा परिणाम सर्वप्रथम डोंगराळ परिसंस्थांवर दिसतो
- तिथे वनस्पतींचं स्थलांतर अधिक वेगाने होतं
- आणि ते बदल पुढे संपूर्ण अन्नसाखळीवर परिणाम करतात
रोबोट्समुळे दरवर्षी त्याच ठिकाणी, त्याच कोनातून आणि त्याच पद्धतीने डेटा गोळा करता येतो. ही सातत्यपूर्ण तुलना मानवी सर्वेक्षणात जवळपास अशक्यच होती.
भारतासाठी याचे महत्त्व काय?
हा प्रश्न भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतातील पुढील भौगोलिक ठिकाणे महत्त्वाची आहेत.
- हिमालय
- सह्याद्री
- अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, लडाखसारखी दुर्गम जैवविविध क्षेत्रे आहेत.
या ठिकाणी जैवविविधता प्रचंड आहे, पण वैज्ञानिक अभ्यास तुलनेने मर्यादित.
हिमालयात सध्या…
- हिमरेषा झपाट्याने वर सरकत आहे
- अल्पाइन वनस्पती आता अधिक उंचीवरती आढळतात
- काही स्थानिक प्रजाती नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत
अशा ठिकाणी AI-सुसज्ज रोबोट्स वापरल्यास…
- सातत्यपूर्ण निरीक्षण शक्य होईल
- मानवी धोका कमी होईल
- हवामान तसेच पर्यावरण बदलांचा अचूक डेटा मिळेल
- भारतासाठी हे केवळ तंत्रज्ञान नाही, तर पर्यावरण संरक्षणाचं धोरणात्मक साधन ठरू शकतं.
- जैवविविधतेचं ‘डिजिटल संग्रहालय’
- या संशोधनाचा पुढचा टप्पा अधिक महत्त्वाचा आहे, तो म्हणजे वनस्पतींचा जागतिक डिजिटल डेटाबेस
- भविष्यात नामशेष होऊ शकणाऱ्या प्रजातींची नोंद
- संवर्धन धोरणांसाठी ठोस वैज्ञानिक आधार
म्हणजेच, निसर्गाचा इतिहास आता केवळ पुस्तकांत नाही, तर डेटामध्ये जतन केला जात आहे.
धोके आणि प्रश्न
- या प्रयोगातील काही महत्त्वाचे प्रश्न
- AI कधी चुकू शकते का?
- स्थानिक व पारंपरिक ज्ञानाला दुय्यम स्थान मिळेल का?
- तंत्रज्ञानावर असलेले अवलंबित्व वाढेल का?
- संशोधक सांगतात… रोबोट्स मानवाची जागा घेत नाहीत तर ते मानवी बुद्धिमत्तेची व्याप्ती वाढवतात.
निसर्ग समजून घेण्याची नवी भाषा
AI आणि रोबोट्समुळे निसर्ग अभ्यासाची भाषा बदलते आहे. जिथे मानव पोहोचू शकत नाही, तिथे आता डेटा पोहोचतो आहे. आल्प्समधील हा प्रयोग उद्याच्या हिमालयासाठी, सह्याद्रीसाठी आणि संपूर्ण पृथ्वी वाचविण्यासाठीची एक नवी संधीच आहे.
आल्प्सपासून हिमालयापर्यंत: हवामान बदल समजून घेण्यासाठी रोबोट्स का गरजेचे ठरत आहेत?
हिमरेषा सरकतेय आणि वनस्पतींचेही आता स्थलांतरच AI रोबोट्स काय सांगू पाहाताहेत?
- संदर्भ:
- ETH Zurich – Autonomous Robots for Alpine Plant Monitoring
- Nature Ecology & Evolution (2023–24)
Machine learning for large-scale biodiversity monitoring - Science Robotics (2023)
Field deployment of quadruped robots in extreme terrains - Frontiers in Plant Science (2024)
Deep learning models for plant species identification - IPCC AR6 – Working Group II
Impacts of climate change on mountain and alpine ecosystems - UNEP – Mountain Ecosystems & Climate Change (2024 Update)
- GBPNIHESD (Govt. of India)
Climate change impacts on Himalayan biodiversity - ICIMOD Reports (2023–24)
Hindu Kush Himalaya Assessment - Indian Institute of Science (IISc) – Ecological Informatics Research
- UNESCO – Digital Documentation of Natural Heritage

