केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण या कार्यक्रमा अंतर्गत विविध सर्वेक्षण गेल्या काही महिन्यात केली होती. त्यावर आधारीत काहींची माहिती प्रसिद्ध केली आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ५ च्या अहवालानुसार देशातील मद्यसेवन करण्याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यानुसार १५ वर्षापेक्षा जास्त वयोगटात मद्यसेवनाची जी संख्या आहे त्यामध्ये महिलांचे प्रमाण हे १.३ टक्के तर पुरुषांचे प्रमाण हे १८.७ टक्के एवढे नोंदवण्यात आले आहे. या आकडेवारीत शहरातील महिलांची मद्यसेवनाची टक्केवारी शहरातील १.६ टक्के तर ग्रामीण भागात ०.६ टक्के एवढी आहे, तर ग्रामीण भागात १९.९ टक्के तर १६.५ टक्के पुरुष मद्यसेवन करतात.

इतर सर्व राज्यांच्या तुलनेत अरुणाचल प्रदेशमध्ये पुरुष आणि महिलांमध्ये मद्यसेवनाचे प्रमाण सर्वात जास्त आहे. या राज्यात ५३ पुरुष आणि २४ टक्के महिला मद्यसेवन करतात अशी माहिती आकडेवारीनुसार समोर आली आहे. त्याखालोखाल सिक्कीममध्ये महिलांमध्ये मद्यसेवनाचे प्रमाण १६ टक्के एवढे आहे. तर तेलंगणामध्ये पुरुषांमध्ये मद्यसेवनाचे प्रमाण हे ४३ टक्के एवढे जास्त आहे. सर्वेक्षणात सर्वसाधारण असं आढळून आलं आहे की आसामचा ब्रम्हपुत्रा नदीचा परिसर, झारखंड आणि छत्तीसगड इथला बस्तर भागात, झारखंड आणि ओरिसा इथला छोटा नागपूर भागांत मद्यसेवनाचे प्रमाण हे जास्त आहे.

छत्तीसगड, उत्तराखंड, मणिपूर, मेघायल, त्रिपुरा आणि ओरिसातील काही जिल्ह्यात पुरुषांमध्ये मद्यसेवनाचे प्रमाण हे ३० ते ४० टक्के एवढे आहे. इतर सर्व राज्यात हे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा कमी असून सर्वात कमी हे लक्षद्वीप भागात ०.४ टक्के एवढे अल्प आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार मद्यसेवनाच्या एकुण आकडेवारीमध्ये इतर जमातींच्या तुलनेत अनुसूचित जमातीमध्ये मद्यसेवनाचे प्रमाण हे सर्वात जास्त आहे. यामध्ये महिलांचे प्रमाण हे ६ टक्के तर पुरुषांचे प्रमाण हे ३३ टक्के एवढे जास्त आहे. तर मद्यसेवनाच्या आकडेवारीची धर्मानुसार जर विभागणी केली तर यामध्ये हिंदू २० टक्के, मुस्लिम ५ टक्के, ख्रिश्चन २८ टक्के, शिख २३.५ टक्के, बौद्ध/नव-बौद्ध २४.५ टक्के आणि जैन ५.९ टक्के असे प्रमाण आढळते.

More Stories onदारुAlcohol
मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alcohol consumption in india trends across states age groups asj
First published on: 17-05-2022 at 20:36 IST